8. इयत्ता दहावी पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय | Paryatan Aani Itihas swadhyay PDF

Class 10 History Marathi Maharashtra Board इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF Maharashtra Board Class 10 History Notes Download. Paryatan Aani Itihas
Admin

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय  प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board

 


Class 10 History Marathi Maharashtra Board इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF Maharashtra Board Class 10 History Notes Download. Paryatan Aani Itihas PDF Class 10

इयत्ता दहावी इतिहास आठवा धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 8 Swadhyay

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

 

(१) कुकने ..................विकण्याच्या एजन्सी व्यवसाय सुरु केला.

(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू

(ब) खेळणी

(क) खाद्यवस्तू

(ड) पर्यटन तिकिटे


उत्तर: कुकने पर्यटन तिकिटे विकण्याच्या एजन्सी व्यवसाय सुरु केला.

 

(२) महाबळेश्वरजवळील भिलार हे...................गाव  म्हणून प्रसिद्ध आहे.

(अ) पुस्तकांचे

(ब) वनस्प्तींचे

(क) आंब्याचे

(ड) किल्ल्यांचे


उत्तर: महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

 

दहावी इतिहास पाठ स्वाध्याय | History Guide class 10 pdf 


(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


(१) माथेरान - थंड हवेचे ठिकाण

(२) ताडोबा - लेणी

(३) कोल्हापूर - देवस्थान

(४) अजिंठा - जागतिक वारसास्थळ


उत्तर: ताडोबा - लेणी

 


२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर:

(१) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

(२) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

(३) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक जगभरातील ठिकाणांना भेटी देतात.

(४) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात.

त्यामुळे भाजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वपिक्षा वाढत आहे.

 

(२) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

उत्तर:  भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण

(१) आपल्या ऐतिहासिक वास्तू किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

(२) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया पर्वत, जंगले अभयारण्ये समुद्रकिनारे आहेत व ते ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात

(३) भारतीय नृत्य, नृत्य, साहित्य, विविध कला व्रत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात.

(४) आपला नैसर्गिक आणि पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले, वैभव त्याचे पुढील पिढ्यांसाठी जतन केले पाहिजे.

 

Paryatan Aani Itihas in Marathi PDF | दहावी इतिहास स्वाध्याय प्रश्नोत्तर पर्यटन आणि इतिहास

३. टीपा लिहा.

 

(१) पर्यटनाची परंपरा

उत्तर:

१) अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.

२) भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते.

(३) व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विदयापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.

(४) मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.

 

पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय | 10th History Chapter 8 Question Answer

(३) कृषी पर्यटन

उत्तर:

(१) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय.

(२) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.

(३) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित झाले आहे.

(४) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझाएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विदधार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.

 

History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Paryatan Aani Itihas Study Material

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.


(१) पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?

उत्तर:

            आधुनिक काळात पर्यटन ही रोजगारभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेणे महत्वाचे आहे.

1) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक यांकडे लक्ष देणे.

2) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. ऐतिहासिक व प्रेक्शिनीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत.

3) पर्यटकांना प्रेक्षणीयस्थळांची माहितीपुस्तिका नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

4) दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

(२) पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते ?

उत्तर:

(१) पर्यटनस्थळांच्या परिसरात परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते.

(२) पर्यटकांना आवडणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीत वाढ होते स्थानिक हस्तोदयोग व कुटीरोद्योगांचा विकास होतो, स्थानिक खादद्यपदार्थ, हॉटेल व्यवसाय व निवासी व्यवस्था या व्यवसायांचा विकास होतो.

(३) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतूक क्षेत्रातील व्यवसाय वाढतात.

(४) प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक, फोटोग्राफर असे नवे रोजगार निर्माण होतात.

थोडक्यात पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होते.

 

(३) आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल ?

उत्तर:  आपला परिसर कसा आहे, हे विचारात घेऊन त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायला हवा. त्या दृष्टीने पुढील बाबी करायला हव्यात-

(१) परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जतन केली पाहिजेत, त्यांची माहिती फलकावर लावणे, स्वच्छतेकडे लक्ष देणे या घ्याव्यात. समुद्रकिनारे स्वच्छ करून पर्यटन वाढवता बाबी विचारात घ्याव्यात.

(२) गांडूळ प्रकल्प प्रकल्प शून्य कचरा प्रकल्प, जैविक शेती असे विविध प्रकल्प राबवल्यास ते पाहण्यासाठी पर्यटक येतील.

(३) परिसरातील कला, संस्कृती, हस्तोद्योग, कुटीरोद्योग यांना चालना दिल्यास हे उद्योग पाहण्यासाठी, खरेदीसाठी पर्यटक सेतील आपल्या परिसराचा औदयोगिक, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास केल्यास पर्यटन निश्चितच वाढेल, असे मला वाटते.

 

इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी पर्यटन आणि इतिहास प्रश्नोत्तर

५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 

 उत्तर:

8. इयत्ता दहावी पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय | Paryatan Aani Itihas swadhyay PDF



६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

 

(१) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.


उत्तर:  पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत-

(१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग.

(२) खादय पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग, हस्तोदद्योग व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची कार्य.

(४) हॉटेलांशी संबंधित दूध भाज्या, किराणा इत्यादी शेतीविषयक पशुउद्योग.

(५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी उद्योग.

(६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात.

त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

 

(२) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

उत्तर:  

(१) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रमे अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.

(२) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.

(३) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, धार्मिक स्थळांना भेटी इत्यादी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.


************

महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.

Post a Comment