९. व्यापार स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Vyapar Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 10 Vyapar | स्वाध्याय व्यापार इयत्ता नववी भूगोल

  • व्यापार स्वाध्याय 9वी       
  • Vyapar Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 9 question answer in marathi
  • Chapter 8 geography 9th 9 Vyapar question answerप्रश्न १. खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा.

उत्तर:


देशांतर्गत व्यापार

आंतरराष्ट्रीय व्यापार

(अ) महाराष्ट्र व पंजाब

(ई) चीन व कॅनडा

(इ) लासलगाव व पुणे

(आ) भारत व जपान

 

(उ) भारत व युरोपीय संघ

 प्रश्न २. खालील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.


(अ) भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज  तेल खरेदी करतो.

उत्तर: आयात

 

(आ) कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी  पाठवला जातो.

उत्तर: निर्यात

 

(इ) जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो.

उत्तर: निर्यात

 

स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 9 | इयत्ता नववी भूगो| ल स्वाध्याय व्यापार स्वाध्याय 9वी  | Vyapar Swadhyay class 9

प्रश्न ३. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.


(अ) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.

उत्तर: अयोग्य

भारत हा स्वयंपूर्ण देश नाही.(आ) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते.

उत्तर: अयोग्य

ज्या ठिकाणी वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो.

 


(इ) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.

उत्तर: अयोग्य

स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा अंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कानीन व गुंतागुंतीची असते.

 


(ई) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी  सार्क ही संघटना कार्य करते.

उत्तर: अयोग्य

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी  आसियान  ही संघटना कार्य करते.

 

Std 9 geography chapter 9 question answer in marathi | Chapter 8 geography 9th 9 Vyapar question answer | 9th std bhugol chapter 9 quesiton answer | Geography chapter Vyapar question answer in marathi

 

प्रश्न ४. पुढील उदाहरणांतील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.


(अ) सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.

उत्तर: किरकोळ व्यापार

 

(आ) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील  व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

उत्तर: देशांतर्गत व्यापार

 

(इ) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.

उत्तर: आंतरराष्ट्रीय व्यापार

 

(ई) सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत आणले.

उत्तर: घाऊक व्यापार

 

 

Std 9 geography chapter 9 question answer in marathi | Chapter 8 geography 9th 9 Vyapar question answer | 9th std bhugol chapter 9 quesiton answer | Geography chapter Vyapar question answer in marathiप्रश्न ५. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा  ओघतक्ता तयार करा.

उत्तर:

 
(आ) व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा.

उत्तर:

१)प्रतिकूल  व्यापार संतुलन: जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय.

२)अनुकूल व्यापार संतुलन : जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते.

३) संतुलित व्यापार:  जेव्हा आयात व निर्यातमूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.

 

 

(इ) जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.

उत्तर:

१)    आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे.

२)   व्यापारविषयक मतभेद हाताळणे.

३)   राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे.

४)  विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.(ई) ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा.

उत्तर:

ओपेक

आपेक

१. ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणी निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे.

१.आपेक हे आरीया-प्रशांत महासागर क्षेत्रांतील देशांची प्रादेशिक संघटना आहे.

२. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते.

२. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते.

३. सदस्य देशांतील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करते.

३. सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते.

४. तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखण्याचे कार्य करते.

४.सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सुसूत्रता आणते.

 


(उ) आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार  संघटनेचे कार्य लिहा.

उत्तर: 

            आसियान ही आशिया खंडातील महत्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेची कार्ये खालीलप्रमाणे आहेत.

१)  आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे.

२)   प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे.

३)   सदस्य देशांना अधिक व्यापारवाढीसाठी कर सवलती देणे.

 

(ऊ) शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा.

उत्तर:

१)    पारंपारिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल विकतो. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणी यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असे.

२)   विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो. त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो. आणि शहरातील सुपर मार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो.

३)   सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात.

४) अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. त्यांच्या मालाला पूर्वीपेक्षा अधिक चांगला भाव मिळतो.

५)  नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते.

६)   म्हणजेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे.

 

स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 9 | इयत्ता नववी भूगो| ल स्वाध्याय व्यापार स्वाध्याय 9वी  | Vyapar Swadhyay class 


प्रश्न ६. खालील तक्त्यात सन २०१४-१५ सालातील काही  देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जोड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व  सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा. देश निर्यात मूल्य आयात मूल्य

उत्तर:


देश

निर्यात मुल्य

आयात मूल्य

चीन

२१४३

१९६०

भारत

२७२

३८०

ब्राझील

१९०

२४१

संयुक्त संस्थाने

१५१०

२३८०


अनुकूल संतुलन - चीन

प्रतिकूल संतुलन - भारत, ब्राझील, संयुक्त संस्थाने 

सर्वाधिक व्यापार - चीन

जागतिक व्यापारावर वर्चस्व – चीन

जागतिक व्यापारात नगण्य – भारत, ब्राझील.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.