२. भारत : १९६० नंतरच्या घडामोडी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी | Bharat: 1960 Nantarachya Ghadamodi Swadhyay Prashn Uttare 9vi

भारत : १९६० नंतरच्या घडामोडी इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 2 question answers

भारत : १९६० नंतरच्या घडामोडी इयत्ता नववी स्वाध्याय | भारत : १९६० नंतरच्या घडामोडी प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा दुसरा स्वाध्याय

 

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून  विधाने पूर्ण करा.


(१) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ............. होते.

(अ) राजीव गांधी

(ब) श्रीमती इंदिरा गांधी

(क) एच.डी.देवेगौडा

(ड) पी.व्ही.नरसिंहराव

उत्तर: श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.

 

Bharat: 1960 Nantarachya Ghadamodi swadhyay prashn uttare Bharat: 1960 Nantarachya Ghadamodi Swadhyay Iyatta Navavi Class 9 history questions and answers History class 9 chapter 2 solution 9th history chapter 2 question answers

(२) भारतीय हरितक्रांतीचे जनक ............ होत.

(अ) डॉ. वर्गीस कुरीयन

(ब) डॉ.होमी भाभा

(क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन

(ड) डॉ. नॉमेन बोरलॉग

उत्तर: भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस.स्वामीनाथन होते.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


(१) इंदिरा गांधी - राष्‍ट्रीय आणीबाणी

(२) राजीव गांधी - विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा

(३) पी.व्ही.नरसिंहराव - आर्थिक सुधारणा

(४) चंद्रशेखर - मंडल आयोग

उत्तर: चंद्रशेखर - मंडल आयोग

दुरुस्त केलेली योग्य जोडी : चंद्रशेखर – देशाची आर्थिक परिस्थिती बिकट.

 

२. (अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.

पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.

उत्तर:

 

अ.क्र

प्रधानमंत्र्यांचे नाव

कालावधी (इ.स.)

१.

पंडित जवाहरलाल नेहरू

१९४७ ते १६६४

२.

लालबहादूर शास्त्री

१९६४ ते १९६६

३.

इंदिरा गांधी

१९६६ ते १९७७

आणि

१९८० ते १९८४

४.

मोरारजी देसाई

१९७७ ते १९७९

५.

चरणसिंग

१९७९ ते १९८०

६.

राजीव गांधी

१९८४ ते १९८९

७.

विश्वनाथ प्रतापसिंह

१९८९ ते १९९०

८.

चंद्रशेखर

१९९० ते १९९१

९.

पी.व्ही. नरसिंहराव

१९९१ ते १९९६ 

१०

एच.डी. देवेगौडा  

१९९६ ते १९९७

११.

इंदकुमार गुजराल

१९९७ ते १९९८

१२.

अटलबिहार वाजपेयी.

१९९८ ते २००४

History class 9 chapter 2 solution | 9th history chapter 2 question answers


(ब) टीपा लिहा.

 

(१) जागतिकीकरण

उत्तर:

१)जगातील सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे . यालाच जगतिकिरण असे  म्हणतात.

२)जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राव्यातिरिक्त इतरही देशांशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. यामुळे व्यापारावरील नियंत्रणे नष्ट होऊन आर्थिक उदारीकरण घडून येण्यास मदत झाली.

३) जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले.

 

(२) धवलक्रांती

उत्तर:

१) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने स्वावलंबणासाठी जे प्रयत्न केले त्यामध्ये धवलक्रांतीचा समावेश होतो.

२)डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले.

३) डॉ. वर्गीस कुरियन यांनी दुध उत्पादन क्षेत्रात घडवून आणलेल्या या क्रांतीला ‘धवलक्रांती’ असेही म्हणतात

.

Bharat: 1960 Nantarachya Ghadamodi Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers


३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच  टिकले.

उत्तर:

१) आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली.

२)नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला.

३)मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले.

४) आपापसातील मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही.

 

(२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर  पाठवावे लागले.

उत्तर:

१)  १९८० च्या दशकात शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.

२)   या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले.

३)   या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता.

४) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात या आंदोलनातील अतिरेक्यांनी आश्रय घेऊन हिंसाचार सुरु केला होता. या  अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले.

 


(३) भारतात नियोजन आयोग निर्माण  करण्यात आला.

उत्तर:

१)ब्रिटीश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता.

२)भारतासमोर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवण्याचे आव्हान होते.

३) देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. आणि भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होतो.

४)नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.


 

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

 

(१) जग आणि भारताच्या इतिहासात १९९१  हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले?

उत्तर:

१) सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले.

२) भारतात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.

३)याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी  मशीदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले.

अशा प्रकरे जग आणि भारताच्या इतिहासात १९९१  हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.

 

(२) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर: भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

१)    अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण

२)   आर्थिक स्वावलंबन

३)   सामाजिक न्याय४) समाजवादी रचना

 


५. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची  बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.

उत्तर:

 

भारतापुढील आव्हाने

बलस्थाने

उदा., भारत-पाकिस्तान युद्ध

विविधतेतही एकता

दुर्बल घटकांचा विकास

सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना

शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण

अण्वस्त्र सज्जता

फुटीरतावाद

सशस्त्र लष्करी ताकद



✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.