व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Vyutpatti Kosh swadhyay 10vi Marathi

व्युत्पत्ती कोश स्वाध्याय १०वी इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय व्युत्पत्ती कोश या धड्याचे प्रश्न उत्तर Class 10 marathi Vyutpatti Kosh question answer
Admin

Iyatta Dahavi Vyutpatti Kosh Marathi  Swadhyay | व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) स्वाध्याय इयत्ता दहावी

Vyutpatti Kosh  swadhyay pdf download Vyutpatti Kosh  swadhyay pdf Swadhyay class 10 marathi Vyutpatti Kosh  question answer

 

प्र.(१) टिपा लिहा.


(अ) व्युत्पत्ती कोशाचे कार्य

उत्तर:

व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश!

व्युत्पत्ती कोशाचे कार्य :

(१) मराठी भाषेतील - प्रमाण व बोली - शब्दांचे मूळ रूप दाखवणे.

(२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.

(३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.

(४) भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.

 

10th marthi Kale Kesswadhyay

मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

(आ) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार

उत्तर:

1) दुसऱ्या भाषेच्यासंपर्कातून.

उदा., इंग्रजीतूनआलेले ऑफिस,पेन, टेबल इत्यादी शब्द.

 

2) दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांतून.

उदा., 'डॅम बीस्ट' याचे जुन्या मराठीतले डँबीस' हे रूप

 

3) दोन वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून.

उदा., फारसी ना हा उपसर्ग + पास हा इंग्रजी शब्द = नापास

 

4) प्रत्यय आणि उपसर्ग लागून.

उदा . वारकरी, प्रतिसाद

 

इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download
दहावी मराठी व्युत्पत्ती कोश स्वाध्याय
 


प्र.(२) खालील मुद्‌द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)

व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) स्वाध्याय  प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी  | Vyutpatti Kosh swadhyay 10vi Marathi

 

उत्तर:

एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्धोधक ठरेल.

१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बँ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.

 

इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download
दहावी मराठी व्युत्पत्ती कोश स्वाध्याय
 


प्र.(३) पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

उत्तर:

 

व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) स्वाध्याय  प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी   Vyutpatti Kosh swadhyay 10vi Marathi
उत्तर: 


शब्द अनेक

अर्थ एक

माय, माता, जननी, जन्मदात्री

आई

जल, नीर, जीवन, तोय

पाणी

 

शब्द एक

अर्थ अनेक

पाठ

1)माणसाची पाठ

2)पाठ म्हणजे धडा

 

 

खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

 

इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब, आंबटचिंबट ,मुलूखगिरी, धबाधब, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर, हिरवाहिरवा, मधूनमधून, रस्तोरस्ती, दांडगाई, उपाहार, तिळतिळ, शिलाई, लुटूलुटू, वटवट, संशयित, बेशक, मागोमाग,


उपसर्गघटीत शब्द

प्रत्ययघटीत शब्द

अभ्यस्त शब्द

अचूक

अनाकलनीय

उपाहार

बेशक

इनामदार

धारदार

मुलूखगिरी

शिष्टाई

दांडगाई

शिलाई

संशयित

गल्लोगल्ली

घमघम

हुबेहूब

आंबटचिंबट

धबाधब

हुरहुर

हिरवाहिरवा

मधूनमधून

रस्तोरस्ती

तिळतिळ

लुटूलुटू



*********

Post a Comment