१०.नागरीकरण स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Nagarikaran Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 6 Nagarikaran | स्वाध्याय नागरीकरण इयत्ता नववी भूगोल

  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10
  • नागरीकरण स्वाध्याय 9वी
  • Nagarikaran Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 10 question answer in marathi
  • Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answerप्रश्न १. पुढील समस्येवर उपाय सुचवा.

 

(अ) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.

उत्तर:

१) नागरीकरणामुळे शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था वाढत नाही, यातूनच शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते.

२)   या समस्येवर उपाय म्हणून लोकसंख्येचे खेड्याकडून शहराकडे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारेचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. 

३) कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर शासनाने घरबांधणीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

४) राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांद्वारा घरांसाठी रास्त दराने कर्जपुरवठा करण्यात यावा.


 

नागरीकरण प्रश्न उत्तरे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 10 इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10 नागरीकरण स्वाध्याय 9वी Nagarikaran Swadhyay class 9 Std 9 geography chapter 10 question answer in marathi Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer 9th std bhugol chapter 10 quesiton answer Geography chapter Nagarikaran question answer in marathi(आ) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.

उत्तर:

१)  भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमुख कारण आहे.

२) खासगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी.

३)   वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करण्यात यावे.

 


(इ) नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उत्तर:

१)    स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे अवैध मार्गांचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.

२)   गुन्हेगारीसदृश्य कृत्ये करणाऱ्या व्यक्ती या तरुण वयोगटातील बेरोजगार व्यक्ती असतात. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे छोटे उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रवृत्त करावे.

३)   बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या संघटीत टोळ्या उध्वस्त कराव्यात.


 इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10 | नागरीकरण स्वाध्याय 9वी
Nagarikaran Swadhyay class 9 \ Std 9 geography chapter 10 question answer in marathi


(ई) नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

उत्तर:

१)    प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे.

२)   प्रदूषणनियंत्रण कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी.

३) मोठ्या प्रमाणवर प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत किंवा त्यांचे अन्यत्रस्थलांतर करावे.

 


(उ) नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत

उत्तर:

१)    शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा, तसेच नियमांचे उल्लंघन यांमुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते यातूनच आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात.

२)   ज्या मानवी व्यवहारांमुळे जलप्रदूषण घडून येते, त्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यावे.

३)   प्रदूषणनियंत्रण कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी.

४) सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक व्यापक व कार्यक्षम करण्यात यावी .

५)  आरोग्यविषयक जन-जागृती करावी.

 


प्रश्न २. योग्य जोड्या जुळवा.

 

 

अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

(ई) नागरीकरण

(२) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे.

(इ) स्थलांतर

(३) ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत.

(अ) नागरीप्रदेश

(४) कचऱ्याची समस्या

(आ) नियोजनाचा अभाव

 

 


प्रश्न ३. महत्त्व सांगा/फायदे लिहा.


(अ) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण

उत्तर:

१)    यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान हे दोन्ही घटक नागरीकरणासाठी साहाय्यभूत ठरतात.

२)   शेतीमध्येतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे.

३)   शेती मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने केल्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले.

४) अतिरिक्त झालेला कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला आणि त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले.

 


(आ) व्यापार

उत्तर:

१)  एखाद्या प्रदेशातील ठिकाण, मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापारात वाढ होते.

२)   व्यापाराशी निगडीत असणाऱ्या सेवा जसे की व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. वाढीस लागतात.

३) व्यापाराच्या ठिकाणी ठिकाणी रस्ते, उपाहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात.

४)  व्यापारवाढ ही देशाच्या आर्थिक विअकासाला पोषक असते.

५) व्यापारामुळे रोजगारात वाढ झाल्याने लोकांचे उत्पन्न सुधारून त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडून येते.

 


(इ) औद्योगिकीकरण

उत्तर:

१)  औद्योगिकीकरण हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे.

२)   उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे बेरोजगारीची समस्या कमी होण्यास मदत होते.

३) औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे.

४) औद्योगिकीकरणामुळे देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते.

 

 

(ई) शहरातील सोईसुविधा

उत्तर:

१) नागरीक्षेत्रामध्ये अनेकसोईसुविधा उपलब्ध होतात. वाहतूक संदेशवहन, शिक्षण व आरोग्य या त्यातील महत्वाच्या सुविधा आहेत.

२) उच्च दर्जाच्या वाहतूक व्यवस्थेमुळे ,मालाची वाहतूक आणि व्यापार व बाजारपेठांची वाढ झालेली दिसून येते.

३) उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवांमुळे दुर्धर आजारांवर उपचार करणे शक्य होते.

 


(उ) शहरातील सामाजिक ऐक्य

उत्तर:

१)    नागरीकरणामुळे द्‌वितीय, तृतीय व चतुर्थश्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते.

२)  या प्रदेशांचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते.

३)   यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो.

 


 

प्रश्न ४. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा.

 

(अ) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.

उत्तर:

१) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरांत लोक निवास करतात.

२) शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादींसाठी रोज उपनगरांतून लोकांना शहरांतून प्रवास करावा लागतो.

३) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी

४) परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो.

५)  उदा. मुंबईत होणारी वाहतूककोंडी

 


(आ) औद्योगिकीकरण व वायुप्रदूषण.

उत्तर:

१)   औद्योगिकीकरण हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे.

२)  उर्जासंसाधने व यंत्रांच्या सहायाने मोठ्या प्रमाणावर उत्पादन कार्य केले जाते.

३) उत्पादन कार्य आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होते.

 


(इ) स्थलांतर व झोपडपट्टी.

उत्तर:

१) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक रोजगाराच्या शोधात देशाच्या अविकसित भागाकडून मुंबईसारख्या औद्योगिक महानगरांत नोकरी – व्यवसायाच्या शोधात स्थलांतर करतात.

२) शहरातील ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात.

३)   असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत तात्पुरती व कच्च्या स्वरुपाची घरे बांधतात, अशा वस्तीला झोपडपट्टी असे म्हणतात.

 

 

(ई) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी

उत्तर:

१)    शहरातील ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात.

२)   झोपडपट्ट्यांत किमान नागरी सुविधांचा देखील अभाव असतो.

३)   स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात; परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही.

४) रोजगार न मिळाल्यामुळे ते अवैध मार्गांचा वापर करून अनेक वेळा पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.

 

 

नागरीकरण प्रश्न उत्तरे \ स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 10 | इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 10 \ नागरीकरण स्वाध्याय 9वी


प्रश्न  ५.खालील तक्ता पूर्णकरा.

उत्तर:

 

नागरीकरण प्रक्रिया

परिणाम

झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थाने अपुऱ्या सोईसुविधा

प्रदूषण

उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळेलोकसंख्या वाढली.

हेअल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचेअसते.

प्रदूषण

नागरी जीवनावर विपरीत परिणाम शहरंचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा तसेच नियमांच्या उल्लंघनामुळे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण व जलप्रदूषणात वाढ होते.

 

नोकरीच्या संधी निर्माण झाल्या.

सुखसुविधांमध्ये वाढ

ग्रामीण तेशहर – बदल

 

वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय तसेच अग्निशमन दल यांसारख्या सोईसुविधा विकसित होतात. प्रवासातील सूलभतेमुळे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींत वाढ होते.

 

 

Std 9 geography chapter 10 question answer in marathi \ Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer | 9th std bhugol chapter 10 quesiton answer | Geography chapter Nagarikaran question answer in marathi


प्रश्न ६. स्पष्ट करा.


(अ) शहरांची वाढ विशिष्ट पद्‌धतीने झालेलीआढळते.

उत्तर:

१) आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, उर्जाप्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरु झाले.

२)   आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली.

३)   शहराचा क्षेत्रीय विष्ट्र झाल्याने शहरांच्या बह्यावर्ती भागात उपनगरे विकसित झाली.

४) लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला.

५) ग्रामपंचायतींची जागा नगरपरिषदेने घेतली, नगरपरिषदांची जागा महानगरपालिकेने घेतली.

६)   अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरांत रुपांतर झाले.

 

(आ) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर.

उत्तर:

१) नवी मुंबई, चंदीगड, नवीदिल्ली या शहरांचा विकास हा सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता.

२) अशा शहरांमध्ये निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजारक्षेत्र, शैक्षणिक व आरोग्यसंस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते.

३)   भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारच्या सोई – सुविधांची आखणी नगर नियोजनामध्ये करण्यात येते.

४) मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास व्हावा यासाठी अलीकडील काळात स्मार्त सिटी योजना आकाराला आली आहे.

५)  अशा सुनियोजित शहरामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या  निवास, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, वाहतूकव्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल.

 (इ) औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.

उत्तर:

१)    औद्योगिकीकरण हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे.

२)   उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे बेरोजगारीची समस्या कमी होण्यास मदत होते.

३)   औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे.

४) औद्योगिकीकरणामुळे देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते.

 


(ई) प्रदूषण - एक समस्या.

उत्तर:

१)    इंग्रजी भाषेतील to Pollute या शब्दापासून प्रदूषण या संकल्पनेचा उदय झाला आहे. 

२)   to Pollute याचा अर्थ दुषित करणे आणि जे घटक वातावरण दुषित करतात त्यांना प्रदूषके असे म्हणतात.

३)   हवा, जमीन आणि पाणी यांमध्ये ही प्रदूषके मिसळल्याने जलप्रदूषण, मृदाप्रदूषण, आणि हवाप्रदूषण यांसारख्या समस्या उद्भवतात.

४) या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर घातक परिणाम होत असतो.

५) शहरी भागामध्ये प्रदूषणाचे प्रमाण हे अधिक असते. म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे.

 

 

(उ) स्वच्छ भारत अभियान.

उत्तर:

१)    भारत सरकारने सन २००६ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

२)   ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे.

३)   ‘हागणदारी मुक्त’ गाव व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते.

४) त्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत शुल्क द्वारा उभारण्यात येतो.

 प्रश्न ७. खालील छायाचित्रांतील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा

उत्तर:Nagarikaran Swadhyay class 9 Std 9 geography chapter 10 question answer in marathi Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer 9th std bhugol chapter 10 quesiton answer Geography chapter Nagarikaran question answer in marathiवरील चित्र हे वायूप्रदूषण या समस्येचे आहे, यावरील उपाय पुढीलप्रमाणे:

१)    सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा.

२)   जास्त प्रदूषण करणाऱ्या उद्योगधंद्यांचे स्थलांतर करावे.

३)   इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर द्यावा.

४) वायूप्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

Nagarikaran Swadhyay class 9 Std 9 geography chapter 10 question answer in marathi Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer 9th std bhugol chapter 10 quesiton answer Geography chapter Nagarikaran question answer in marathiवरील चित्र हे ध्वनीप्रदूषण या समस्येचे आहे, यावरील उपाय पुढीलप्रमाणे:

१)    धार्मिक सण / उत्सव साजरे करत असताना ध्वनीक्षेपकांचा आवाज कमीत कमी ठेवावा.

२)   विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवू नयेत.

३)   विविध प्रकारच्या मिरवणुकांच्या वेळी डीजेचा वापर करण्यावर बंदी घालावी.

Nagarikaran Swadhyay class 9 Std 9 geography chapter 10 question answer in marathi Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer 9th std bhugol chapter 10 quesiton answer Geography chapter Nagarikaran question answer in marathi


वरील चित्र हे कचऱ्याच्या समस्येचे आहे ,यावरील उपाय पुढीलप्रमाणे:

१)    कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

२)   शासकीय यंत्रणे द्वारे नियमितपणे सुका कचरा गोळा करण्यात यावा आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
Nagarikaran Swadhyay class 9 Std 9 geography chapter 10 question answer in marathi Chapter 8 geography 9th 10 Nagarikaran question answer 9th std bhugol chapter 10 quesiton answer Geography chapter Nagarikaran question answer in marathi


वरील चित्र हे जलप्रदूषण या समस्येचे आहे ,यावरील उपाय पुढीलप्रमाणे:

१) कारखान्यातील दुषित पाण्यावर प्रक्रिया करून नंतरच ते कारखान्याबाहेर सोडण्याची सक्ती करावी.

२)   दुषित पाणी नदी, नाले,तलाव , कालवे यांमध्ये सोडण्यास बंदी करावी.

३)   सार्वजनिक पाणवठ्यावर कपडे धुण्यास, आंघोळ करण्यास , जनावरे धुण्यास बंदी करावी.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.