८. अर्थशास्त्रीय परिचय स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Arthashastriy parichay Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 8 Arthashastriy parichay | स्वाध्याय अर्थशास्त्रीय परिचय इयत्ता नववी भूगोल

  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 8
  • अर्थशास्त्रीय परिचय स्वाध्याय 9वी     
  • Arthashastriy parichay Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 8 question answer in marathi


 

प्रश्न १. वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर:



१)भांडवलशाही अर्थव्यवस्था

समाजवादी अर्थव्यवस्था

मिश्र अर्थव्यवस्था

२)जर्मनी, जपान, अमेरिका

चीन, रशिया

भारत , स्वीडन व युनायटेड किंगडम

३)व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे

व्यवस्थापन सरकारकडे

व्यवस्थापन खासगी व्यक्ती व सरकारकडे

४)कमाल नफा मिळविणे.

समाजकल्याण साधने

नफा व समाजकारण यांचा समन्वय

 
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय8 अर्थशास्त्रीय परिचय स्वाध्याय 9वी      Arthashastriy parichay Swadhyay class 9 Std 9 geography chapter 8 question answer in marathi

Arthashastriy parichay Swadhyay class 9

अर्थशास्त्रीय परिचय स्वाध्याय 9वी     

 

प्रश्न २. स्पष्टीकरण लिहा.


(अ) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

उत्तर:

१) उत्पन्न व खर्चाचा योग्य ताळमेळ बसावा यासाठी  कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कारण, कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात.

२)उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.

३) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसचे साम्य असते. याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन , जगाचे व्यवस्थापन यांतून येते. त्यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात.

 

Chapter 8 geography 9th class marathi
9
th class bhugol chapter 8 Arthashastriy parichay question answer


(आ) भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

उत्तर:

१)सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व भारतीय अर्थव्यवस्थेत आहे.

२) खासगी उद्योजक व सरकार यांच्यात भारतातील  उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन विभागली गेली आहे.

३)खासगी क्षेत्रातील उद्योजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात,  तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक काल्यासाठी प्रयत्नशील असते.

४) अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतामध्ये आढळून येतात. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरुपाची आहे.

 


(इ) अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

उत्तर:

१) भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय.

२) अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी ही काही देशांमध्ये खाजगी व्यक्तींकडे, तर  काही देशात सरकार कडे असते. तर काही देशांत सरकारी व खाजगी मालकी एकत्र आढळून येते.

३)  काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू हा नफा मिळवणे असतो तर काही अर्थव्यवस्थांचा हेतू हा समाजकल्याण साधने हा असतो.  तर काही अर्थ व्यवस्थांमध्ये या दोन्हीचेही अस्तित्व दिसून येते.

४)अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थ व्यवस्था असे तीन प्रकार पडतात.

या अर्थानं जगातील देशांचे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात.


9th std bhugol chapter 8 quesiton answer
Geography chapter Arthashastriy parichay question answer in marathi


प्रश्न ३. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन  कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते?

उत्तर: व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन  हे उत्पन्न व खर्च या  आर्थिक घटकांशी संबंधित असते.

 

(आ) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक  शब्दापासून बनली आहे?

उत्तर: अर्थशास्त्र ही संज्ञा OIKONOMIA (ओईकोनोमिया) या  ग्रीक  शब्दापासून बनली आहे.

 

अर्थशास्त्रीय परिचय प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 8


(इ) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन  कोणाकडे असते?

उत्तर: भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन  खासगी व्यक्तींकडे असते.


(ई)        जागतिकीकरण म्हणजे काय?

उत्तर: देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जगतिकिकरण होय.


************

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.