१२.पर्यटन स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Paryatan 9vi Bhugol Swadhyay Prashn Uttare

9vi bhugol swadhyay 12 Paryatan | स्वाध्याय पर्यटन इयत्ता नववी भूगोल

  • पर्यटन प्रश्न उत्तरे
  • स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 12
  • इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 12
  • पर्यटन स्वाध्याय 9वी       प्रश्न १. पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

 

(अ) मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.

उत्तर: परदेशी पर्यटन

 

(आ) गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक  गोव्यात आले होते.

उत्तर: परदेशी पर्यटन


 

Paryatan Swadhyay class 9  Std 9 geography chapter 12 question answer in marathi  Chapter 8 geography 9th 12 Paryatan question answer  9th std bhugol chapter 12 quesiton answer  Geography chapter Paryatan question answer in marathi


(इ) नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.

उत्तर: वैद्यकीय पर्यटन

 

(ई)        पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.

उत्तर: धार्मिक पर्यटन


(उ) पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.

उत्तर: कृषी पर्यटन


(आ)     सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेला.

उत्तर: धार्मिक पर्यटन

 

 Paryatan Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 12 question answer in marathi | Chapter 8 geography 9th 12 Paryatan question answer

प्रश्न २. ‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.

अ’ गट

‘ब’ गट (उत्तर)

‘क’ गट

(उत्तर)

(१) ताडोबा

(९) चंद्रपूर

(१०) वाघ

(२) पक्षी अभयारण्य

(४) नान्नज

(७) माळढोक

(३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

(६) मुंबई

(८) कान्हेरी लेणी

(४) ताजमहाल

(२) आग्रा

(५) जगप्रसिद्ध आश्चर्य

(५) रामोजी फिल्म सिटी

(७) हैदराबाद

(४) चित्रनगरी

(६) राधानगरी

(८) कोल्हापूर

(९) रानगवा

(७) भिमबेटका

(१) मध्यप्रदेश

(६) प्राचीन गुंफाचित्रे

(८) प्राचीन लेणी

(५) वेरूळ

(३) कैलास लेणे

(९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण्य

(१०) अरुणाचल प्रदेश

(२) फुलपाखरे

१०) लोकटक

(३) मणिपूर

(१) सरोवर

 

 

प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.

 


(अ) धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.

उत्तर:

१) धार्मिक पर्यटन हे देवदर्शन, यात्त्र इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन होय. तर सांस्कृतिक पर्यटन हे संकृतींचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन होय.

२) देवदेवतांच्या मंदिरांना, साधूसंतांच्या समाधी स्थानांना भेटी देणे आणि त्या ठिकाणाची विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश हा धार्मिक पर्यटनात होतो.याउलट एखाद्या ठिकाणच्या चालीरीती, लोककला, रूढी-परंपरांची माहिती मिळविणे आणि तेथील लोकजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यांसारख्या बाबींचा समावेश सांस्कृतिक पर्यटनामध्ये होतो.

 

(आ) पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?

उत्तर: पर्यटनाचे विविध उद्देश असतात ते पुढीलप्रमाणे :

१)  आनंद मिळविणे २) मनोरंजन करणे ३) व्यापार करणे ४) निवास करणे ५) वैद्यकीय सेवा प्राप्त करणे ६) धार्मिक कार्ये करणे ७) ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे. इत्यदी.

 


(इ) पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.

उत्तर:

१) काही पर्याटकांकडून पर्यटन करत असताना पर्यावरणास हानी पोहचू शकते, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकल्याने त्या ठिकाणी प्रदूषण होते.

२)   पर्यावरणस्नेही पर्यटनाच अवलंब केल्यास पर्यावरणास कोणतीही हानी पोहोचणार नाही.

३)  पर्यावरणस्नेही पर्यटन केल्यामुळे, ध्वनी प्रदूषण टाळले जाते, त्तील वृक्ष व वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते. व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ व निटनेटके राहते.

४) पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो.

 

9th std bhugol chapter 12 quesiton answer | Geography chapter Paryatan question answer in marathi


(ई) पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात?

उत्तर: पर्यटन विकासातून पुढील संधी निर्माण होतात:

१) वाहतूक सेवा २) उपहार गृहे ३) मनोरंजन ४) निवासस्थाने ५) बँकिंग सेवा ६) वैद्यकीय सेवा ७) व्यापार इत्यादी.


 इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 12 | पर्यटन स्वाध्याय 9वी | Paryatan Swadhyay class 9

 

(उ) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.

उत्तर:

१] पर्यटन ठिकाणी येणाऱ्या समस्या :

१) निवासस्थानांच्या अभावाची समस्या

२) वाहतुकीची साधने उपलब्ध नसण्याची समस्या

३) पर्यावरणीय समस्या

४) वैद्यकीय सेवांचा अभाव

५) संपर्क साधनांच्या सेवांचा आभाव.


२] पर्यटन ठिकाणी येणाऱ्या समस्यांवर उपाय:

१) शासनाने पर्यटन स्थळी रास्त दारात निवस्थानांची सोय उपलब्ध करून द्यावी.

२) वाहतुकीच्या सेवा उपलब्ध कराव्यात.

३) पर्यटन स्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणे.

४) संपर्क साधण्यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे.

 

(ऊ) आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा.

उत्तर:

अ) आपल्या जिल्ह्यातील पुढील पर्यटनस्थळे विकसित करता येतील.

१)    गणपतीपुळे २) आरेवारे ३) जयगड ४) प्राचीन कोंकण ५) भाट्ये बीच ६) कुणकेश्वर इत्यादी .

 

ब) आपल्या जिल्ह्यात पर्यटन स्थळे विक्सिक करता येण्यामागची कारणे :

१) गणपतीपुळे येथे गणपतीचे मंदिर व सुंदर समुद्र किनारा आहे. हे धार्मिक पर्यटन आहे.

२) आरे-वारे आणि भाट्ये बीच येथे मोठा समुद्रकिनारा आणि आजूबाजूला मनमोहक निसर्गसंपन्नता लाभलेला परिसर आहे.

३) जयगड येथे ऐतिहासिक किल्ला आणि जयविनायक मंदिर आहे.

४) कुणकेश्वर हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे.

 

(ए) पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.

उत्तर:

१) पर्यटन विकासामुळे दुकाने, उपहार गृहे, वाहतूक, संदेशवहन, वैद्यकीय, बँकिंग , व्यापार, मनोरंजन, वस्तीगृहे यांसारख्या सेवांच्या गरजा निर्माण होतात.

२) पर्यटकांना या सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

 


 

प्रश्न ४. पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही  मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.

उत्तर:


१)    येथे कचरा टाकू नका.

२)   ऐतिहासिक वास्तूंवर कोणतेही कोरीव काम करू नका.

३)   ऐतिहासिक वस्तूंची काळजी घ्या.

४) पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्या.

 

 

प्रश्न ५. पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवोभव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.

उत्तर:


१)  पर्यटन विकासामुळे दुकाने, उपहार गृहे, वाहतूक, संदेशवहन, वैद्यकीय, बँकिंग , व्यापार, मनोरंजन, वस्तीगृहे यांसारख्या सेवांच्या गरजा निर्माण होतात यातूनच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

२)   पर्यटनामुळे पायाभूत सुविधांचा विकास होतो.

३)   पर्यटनामुळे देशास परकीय चलन प्राप्त होते.

४)  पर्यटनामुळे राष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

त्यामुळे पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवोभव’ ही भूमिका योग्य आहे.

 

Paryatan Swadhyay class 9 | Std 9 geography chapter 12 question answer in marathi | Chapter 8 geography 9th 12 Paryatan question answer


प्रश्न ६. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारेखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ) गरम पाण्याचे झरेअसलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.

उत्तर: १) वज्रेश्वरी २) उन्हवरे ३) उनपदेव ४) सव ५) कापेश्वर ५) उनकेश्वर इत्यादी.

या ठिकाणी भूअंतरंगात अधिक उष्णता असल्याने येथे गरम पाण्याचे झरे आहेत.

 

(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?

उत्तर: वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंध पुढील ठिकाणी दिसून येतो.

१)    मुंबई २)पुणे ३) कोल्हापूर ४) नाशिक ५) नागपूर ६) शेगाव ७) रत्नागिरी ८) सोलापूर.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.