7. इयत्ता दहावी खेळ आणि इतिहास स्वाध्याय | Khel Aani Itihas swadhyay PDF

इयत्ता दहावी इतिहास सहावा धडा स्वाध्याय Std 10 History Chapter 7 Swadhyay दहावी इतिहास पाठ 7 स्वाध्याय History Guide class 10 pdf
Admin

खेळ आणि इतिहास स्वाध्याय  प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board

 

इयत्ता दहावी इतिहास सहावा   धडा स्वाध्याय Std 10 History Chapter 7 Swadhyay दहावी इतिहास पाठ 7 स्वाध्याय History Guide class 10 pdf


Khel Aani Itihas in Marathi PDF | दहावी इतिहास स्वाध्याय प्रश्नोत्तर खेळ आणि इतिहास
खेळ आणि इतिहास स्वाध्याय | 10th History Chapter 7 Question Answer


() ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ........... येथे सुरू झाली.

() ग्रीस

() रोम

() भारत

() चीन


उत्तर: ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली.

 

 

() महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला .......... म्हणत.

() ठकी

() कालि चंडि का

() गंगावती

() चंपावती


उत्तर: महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


(१) मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ

(२) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ

(३) स्केटींग - साहसी खेळ

(४) बुद्धिबळ - मैदानी खेळ

उत्तर: बुद्धिबळ - मैदानी खेळ

 

History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Khel Aani Itihas Study Material


2. टीपा लिहा.


(१) खेळणी आणि उत्सव

उत्तर:

1) खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात.

2) महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात.

3) महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे.

4) बैलपोळा, नागपंचमी अशा सणाप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अश्या प्रकारची खेळणी तयार केली जातात. मुळे या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात.

 5) संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात.

 

इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी खेळ आणि इतिहास प्रश्नोत्तर


(२) खेळ व चित्रपट

उत्तर:

1)   अलीकडच्या काळातखेळआणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

2)   मेरी कोम आणि फोगट भगिनी यांच्या जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत.

3)   प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवर देखील चित्रपट निघाले आहे.

4)   एकूणच खील व चित्रपट यांचा संबंध अगदी घनिष्ट राहिलेला आहे.

 

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

उत्तर:

1)   विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.

2)   सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात.

3)   निवृत्त खेळाडूंना समालोचानासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणाच्या वेळी करीत असतात.

4)   या सर्व बाबींमुळे खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

 

(२) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

उत्तर:

1)   मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्वाचे भौतिक साधन आहे.

2)   महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे.

3)    इटलीतील पाँपेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येते.

4)   अशा रीतीने खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात.

 

Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF


४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.


(१) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.

उत्तर:

1)   खेळांशी संबंधित अनेक पुस्तके आणि आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळाविषयी चे कोश लिहिले जात आहेत.

2)   व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.

3)   खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगासाठी राखून ठेवलेली असतात.

4)   खेळ या विषयाला वाहिलेले ‘षट्कार’ नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते.

5)   इंग्रजीमध्ये ‘खेळ’ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे.

6)   अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. हे सर्व माहित म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.

 

(२) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

उत्तर:

1)   खेळांचे लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या  खेळांचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते.

2)   खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या कौशल्य माहित असावे लागते.

3)   ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा व माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

4)   विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शन वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास,  गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादीसंबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.

 

(३) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

उत्तर:


मैदानी खेळ

बैठे खेळ

1)   मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात.

1)   बैठे खेळ वासून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत कोठेही बसून खेळता येतात.

2)   मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते.

2)बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतींची व कौशल्याची गरज असते.

3)   मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची आवश्यकता असते.

3)या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते.

4)   शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो.

4)शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.

5)   मैदानी खेळांत रोमांच असतो. आनंदही अधिक असतो.

5)     बैठ्या खेळांत रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.

6)मैदानी खेळांत, कबड्डी, खोखो, क्रिकेट यांसारख्या केलंच समावेश होतो.

6) बैठ्या खेळांत बुद्धिबळ, सारीपाट, कॅरम यांसारख्या खेळांचा समावेश होतो.


Maharashtra Board Class 10 History Notes Download.| Khel Aani Itihas PDF Class 10




*************

महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.

Post a Comment