१७. सोनाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Sonali swadhyay question answer 10 vi marathi

Sonali swadhyay pdf download Sonali swadhyay pdf Swadhyay class 10 marathi Sonali question answer 10th marthi Sonali swadhyay
Admin

Iyatta Dahavi Sonali  Marathi  Swadhyay सोनाली स्वाध्याय इयत्ता दहावी


सोनाली स्वाध्याय १०वी  इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय  सोनाली या धड्याचे प्रश्न उत्तर  मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


प्र. (१) आकृत्या पूर्ण करा.

Class 10 marathi Sonali question answer  10th std marathi digest  इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download  दहावी मराठी काळे केस स्वाध्याय





 Sonali  swadhyay pdf download  Sonali swadhyay pdf  Swadhyay class 10 marathi  Sonali question answer 10th marthi Sonali swadhyay



 प्र.(२) तुलना करा.


सोनाली

रूपाली

1.                रुपालीपेक्षा सात दिवसांनी लहान. दिसायला लहानखुरी.

वयाने सोनालीपेक्षा मोठी. सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी.

2.               रुपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे.

सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची . तिला दमात घ्यायची

3.                वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट-चौपट वाढली.

वय वाढल्यावर लहनखुरीच राहिली.

4.                रुपालीला तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत.

रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरुन सोनालीअला दटावीत असे.


 

प्र.(३) खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.


(अ) सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत-

उत्तर: सोनाली प्रेमळ होती.

 

(आ) रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी-

उत्तर: सोनाली रुपालीवर मैत्रिणीसारखे प्रेम करत होती.

 

(इ) सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली-

उत्तर: जेवणाच्या वेळी फसवले, तर तिला संताप येई.

 

(ई) सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली-

उत्तर: झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते.

 

(उ) मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली-

उत्तर: आपल्या माणसाच्या संरक्षणासाठी धावते.

 

(ऊ) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती-

उत्तर: आपल्या माणसापासून आपण दूर जात आहोत, याचे तिला दुःख होते.


Sonali  swadhyay pdf download
Sonali swadhyay pdf



प्र.(४) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

 

घटना

घटना केव्हा घडली

(अ) सोनाली अण्णांवर रागावली.

जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा.

(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.

सोनालीला दुध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा.

(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.

त्या गृहस्थाने सोनालीला उचलून घेतले, तेव्हा.

(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.

ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा.

 


प्र.(५) सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.

उत्तर:

1)   सोनाली व रुपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत.

2)   एकत्र जेवण घेत.


Swadhyay class 10 marathi
Sonali question answer


प्र.(६) खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

 

(अ) डोळे विस्फारून बघणे-

उत्तर: अर्थ: आश्चर्याने पाहणे.

वाक्य : छोट्या रोपाला लागलेल्या आंब्याकडे सार्वजन डोळे विस्फारून पाहू लागले.

 

(आ) लळा लागणे-

उत्तर: अर्थ: जीव लागणे/ माया लागणे/खूप आवडणे.

वाक्य: कुत्र्याच्या छोट्या पिल्ल्याचाथोड्याच दिवसांत मुलांना लळा लागला.

 

(इ) तुटून पडणे-

उत्तर:अर्थ : त्वेषाने हल्ला करणे.

वाक्य : भारतीय सैनिक त्या आतंकवाड्यावर तुटून पडले.

 

(ई) तावडीत सापडणे-

उत्तर:अर्थ : कचाट्यात सापडणे.

वाक्य: चोर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडले.

सोनाली स्वाध्याय १०वी
इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय

प्र.(७) स्वमत.


(अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

        एकदा दिपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशंट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दिपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या काल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिस्कारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकीकत समजली.

प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दिपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.

 

(आ) ‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत  सांगा.

उत्तर:

            एकदा माइया दारात एक गाय आली. मी घरात जाऊन चपाती आणली. गाईपासून थोड्या अंतरावर फेकली. गाय पटकन त्या बाजूला वळली आणि तिने खाली पडलेली चपाती पटकन खाऊन घेतली. मी परत गाईला हातातली चपाती दाखवली आणि दूरवर फेकली, तिने परत चपाती खाऊन घेतली. मला मजा वाटू लागली. यावेळी गाईची मजा घेण्याचे मी ठरवले. परत गाईला चपाती दाखवली आणि फेकल्यासारखे केले, पण खरं तर हातातील चपाती मी फेकलीच नाही. पण बिचारी गाय चपाती खाण्यासाठी गडबडीने वळली. पण तिला तिथे चपाती दिसलीच नाही. मी परत तसेच केले. आता मात्र गाईच्या लक्षात आले आणि ती सरळ माझ्या बाजूने वळली. मी भीतीने हातातली चपाती तिथेच टाकली आणि घरात पळाले. ज्याप्रमाणे माणसांना राग येतो त्याचप्रमाणे पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना पण राग येतो. ही गोष्ट मी या प्रसंगातून शिकलो.

 

सोनाली या धड्याचे प्रश्न उत्तर
मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

भाषाअभ्यास


द्‌वंद्‌व समास


खालील वाक्येवाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.


(अ) ती दोघे बहीणभाऊ आहेत.

उत्तर: बहीणभाऊ

 

(आ) खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये.

उत्तर: खरेखोटे

 

(इ) कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते.

उत्तर: मीठभाकर

 

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात, त्याला ‘द्‌वंद्‌व समास’ असे म्हणतात.


द्‌वंद्‌व समासाचे एकूण तीन प्रकार आहेत.

(१) इतरेतर द्वंद्व समास

(२) वैकल्पिक द्वंद्व समास

 (३) समाहार द्वंद्व समास

 

इतरेतर द्‌वंद्‌व समास

·       खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

उदा., आईवडील-आई आणि वडील.

(अ) नाकडोळे

उत्तर: नाक आणि डोळे.


(आ) सुंठसाखर

उत्तर: सुंठ आणि साखर  


(इ) कृष्णार्जुन

उत्तर: कृष्ण आणि अर्जुन


(ई) विटीदांडू

उत्तर: विटी आणि दांडू

 

ज्या समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा  लागतो, त्या समासाला ‘इतरेतर द्वंद्‌व’ समास म्हणतात.

 

·       इतरेतर द्वंद्‌व समासाची वैशिष्ट्ये

(अ) अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते.

(आ) या समासाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ ही समुच्चयबोधक अव्यये वापरावी लागतात.

 

(२) वैकल्पिक द्वंद्व समास-

· खालील वाक्ये वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

उदा., बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात.

बरेवाईट-बरे किंवा वाईट


(अ) कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्थासत्थाचा विचार करावा.

उत्तर: सत्यासत्य


(आ) सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती.

उत्तर: चारपाच

 

ज्या समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' या विकल्पबोधक उभयान्वयी अव्यवाचा उपयोग करावा लागतो, त्यास 'वैकल्पिक द्वंद्व समास' असे म्हणतात.


• वैकल्पिक समासाची वैशिष्टये

(अ) दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते.

(आ) समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' यांपैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यथ वापरावे

लागते.

 

(३) समाहार द्‌वंद्‌व समासउदा., सहलीला जाताना पुरेसे अंथरुण-पांघरुण सोबत घ्यावे.

अंथरुण-पांघरुण- अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे.

 

·       खालील वाक्येवाचा व त्यांतील सामासिक शब्द ओळखा.

(अ) कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो.

उत्तर: भाजीपाला


(आ) गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे.

उत्तर: कपडालत्ता , अन्नपाणी

 

        ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास ‘समाहार द्वंद्‌व समास’ असे म्हणतात.

 

·       समाहार द्वंद्‌व समासाची वैशिष्ट्ये


(अ) समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो.

(आ) समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास  एकवचनी असतो.

 

तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

पालापाचोळा

पाला, पाचोळा वगैरे

समाहार द्वंद्व

केरकचरा

केर, कचरा वगैरे

समाहार द्वंद्व

तीनचार

तीन किंवा चार

वैकल्पिक द्वंद्व

खरेखोटे

खरे किंवा खोटे

वैकल्पिक द्वंद्व

कुलूपकिल्ली

कुलूप आणि किल्ली

इतरेतर द्वंद्व

स्त्रीपुरुष

स्त्री आणि पुरूष

इतरेतर द्वंद्व

 

**********

Post a Comment