१६. आकाशी झेप घे रे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Aakashi Zep Ghe Re swadhyay question answer

Class 10 marathi Aakashi Zep Ghe Re question answer 10th std marathi digest इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download दहावी मराठी आकाशी झेप घे रे स्वाध्याय
Admin

Iyatta Dahavi Aakashi Zep Ghe Re Marathi  Swadhyay आकाशी झेप घे रे स्वाध्याय इयत्ता दहावी


 

Swadhyay class 10 marathi Aakashi Zep Ghe Re question answer 10th marthi Aakashi Zep Ghe Re swadhyay Class 10 marathi Aakashi Zep Ghe Re question answer 10th std marathi digest इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download दहावी मराठी आकाशी झेप घे रे स्वाध्याय

प्र.(१) योग्य पर्याय ओळखा.

 

(अ) सुखलोलुप झाली काया म्हणजे........

(१) सुखाचा तिरस्कार वाटतो.

(२) सुखाबद्दल प्रेम वाटते.

(३) सुखाचे आकर्षण वाटते.

(४) सुख उपभोगण्याची सवय लागते.

उत्तर: सुखलोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते.

 

(आ) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ........

(१) काया सुखलोलुप होते.

(२) पाखराला आनंद होतो.

(३) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.

(४) आकाशाची प्राप्ती होते.

उत्तर: पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.

 

Swadhyay class 10 marathi | Aakashi Zep Ghe Re question answer


प्र.(२) तुलना करा.

उत्तर:


पिंजऱ्यातील पोपट

पिंजऱ्याबाहेरील पोपट

पारतंत्र्यात राहतो.

स्वातंत्र्य उपभोगतो

लोकिक सुखात रमतो

स्वबळाने संचार करतो.

कष्टाविण राहतो.

कष्टाने आनंद घेतो.

जीव कावराबावरा होतो.

सुंदर जीवन जगतो.

मनात खंत करतो.

मन प्रफुल्लित असते.

 

 

प्र.(३) पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

उत्तर:

तुज पंख दिले देवाने

कर विहार सामर्थ्याने

 

प्र.(४) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.

उत्तर:

1) तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.

2) कष्टाविण फळ मिळत नाही.

 

 

Aakashi Zep Ghe Re   swadhyay pdf download | Aakashi Zep Ghe Re swadhyay pdf



प्र. (५) काव्यसौंदर्य.



(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले

श्रमदेव घरी अवतरले’

उत्तर:

आशयसौंदर्य

सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे’ ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. ‘स्वसामर्थ्यावर आदम्य विश्वास ठेवून कर्तुत्वाने मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे’ , ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तुत्वाने यशाचे शिखर घाटावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमुल्य संदेश या कवितेतून कवींनी दिला आहे.

काव्यसौंदर्य

वरील ओळींमध्ये कवी श्रमाचे महत्व सांगताना म्हणतात. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही . अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतात राबतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पिक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते. त्याचे घर प्रसन्नतेने नटते. तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेवच त्याच्या घरी अवतरतात.

भाषिक वैशिष्ट्ये

ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.

 

 

(आ) ‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.

उत्तर:

'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे.

प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तुत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून देण्यात आली आहे.

 

आकाशी झेप घे रेस्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय
आकाशी झेप घे रे या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


(इ) ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.

उत्तर:

स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजेच स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्यवान गुणांची स्वतःला जाणीव होणे. जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी माणूस हतबल होऊन जातो. स्वतः मध्ये असलेले सामर्थ्य तो विसरून जातो आणि मग तो नशिबाला दोष देतो. जे काही करेल ते देवच करेल असे म्हणून मोकळा होतो. हतबल होवून दैवावर विसंबून रहातो. पण हे असे करणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. स्वतः मधील सामर्थ्य, स्वतः मधील गुण स्वतःला ओळखता येणे गरजेचे आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा.

'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' याची जाणीव माणसाला व्हायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शास्त्रज्ञ एडिसन इत्यादींनी परिस्थितीवर मात करून स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःचा व पर्यायाने समाजाचा विकास केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.

 

 (ई) ‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा

उत्तर:

'आकाशी झेप घे रे' या कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसाला उपदेश करताना असे सांगितले आहे की घर प्रसन्नतेने नटवायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातूनच मोती फुलवावे लागतील. ज्याप्रमाणे कष्टाने मिळवलेली भाकरी गोड असते त्याचप्रमाणे घरामध्ये नंदनवन फुलवायचे असेल तर कष्टाचा पैसा घरात खेळायला हवा. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. देवाची प्रार्थना आणि पुजा, अर्चना करून 'दे रे हरी, खाटल्यावरी' असे म्हणले तर तसा चमत्कार होणारच नाही.

'घर प्रसन्नतेने कसे नटते,'याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव इथे मी तुम्हाला सांगते. माझ्या आई लादीवरून पाय घसरून पडली होती. पायाला दुखापत झाल्याने  डॉक्टरांनी आईला सक्त आराम देण्याची ताकीद दिली होती. मी शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यानंतर घरातील सगळी कामे करत असे. आईला एकाही कामाला हात लावू दिला नाही. त्यामुळे माझ्या आईला लवकरच बरे वाटू लागले. डॉक्टरांनी जेव्हा महिन्यानंतर आईला तपासले तेव्हा इतक्या कमी वेळात आईची इतकी चांगली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. माझ्या बाबांनी मला जवळ घेऊन माझे लाड केले. आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. त्या दिवशी माझे घर प्रसन्नतेने नटले. कष्टाने मिळणारा आनंद काय असतो हे मला समजले.


*******

Post a Comment