जिराफ प्राण्याची माहिती | Giraffe information in marathi

11]  Information about Giraffe in Marathi | जिराफ संपूर्ण माहिती


मराठी नाव : जिराफ

हिंदी नाव : जिराफ

इंग्रजी नाव : GIRAFFE

 

जिराफ माहिती मराठी   Giraffe vishay mahiti  Giraffe mahiti marathi  Giraffe information in marathi for student  Giraffe information for school project  Giraffe information in marathi


        जिराफ हासुद्धा जंगली प्राणी आहे. लहान मुलांना चटकन ओळखता येणारा प्राणी आहे. जिराफाची उंची सर्वात जास्त असते.


जिराफ प्राण्याचे वर्णन :

जिराफ हा प्राणी सगळ्या जंगली प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याची मान सगळ्या प्राण्यांपेक्षा खूप उंच असते. जिराफाला चार पाय असतात. पुढचे दोन पाय लांब आणि मागचे दोन पाय आखूड असतात. जिराफाचे अंग मोठे आणि डोके लहान असते. डोक्यावर दोन्ही कानांच्या मध्ये एक उंचवटा असतो. याला दोन लहान शिंगे असतात. याला एक शेपटी असते. अंगावर पांढऱ्या-पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. याची जीभ लांब असते.

 

जिराफ प्राण्याचे अन्न :

झाडाची पाने हे जिराफाचे आवडते खाद्य होय. हा काटेरी व खूप उंचीवरचा झाडपालासुद्धा खातो. हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे.


जिराफ प्राण्याची वैशिष्ट्ये :

जिराफ या प्राण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त लहानपणीच गाईच्या वासरासारख्या आवाज काढू शकतो, मोठे होईल तसे जिराफाच्या स्वरयंत्राची वाढ होत नाही. त्यामुळे जिराफ हा प्राणी ओरडू शकत नाही.


जिराफ प्राण्याची इतर माहिती :

जिराफ प्राण्याला पाणी पिताना फार त्रास होती; परंतु उंचीवरील झाडांची पाने तोडण्यासाठी त्याला जिभेचा उपयोग होतो. जिराफाला मागचा दोन लांब पायांचा उपयोग शत्रूपासून बचाव करण्यासाठी होतो. तसेच याला जास्त उंची व लांब मानेमुळे दूरचे दिसते त्यामुळे तो शत्रूपासून सावध होतो.

            जिराफ हा प्राणी कधी एकटा राहत नाही, नेहमी कळपाने राहतो. कळपावर हल्ला झालाच तर आपल्या शिंगाने तो शत्रूला परतवून लावतो. वजनाने सुद्धा हा प्राणी मजबूत असतो. तसेच जिराफाली लांब पायामुळे वेगाने पळू शकतो; पण त्याला लांब पायामुळे उठता-बसताना त्रास होतो. म्हणून हा प्राणी उभ्या- उभ्याच झोप घेतो. हा प्राणी स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकतो. तसेच हा प्राणी पूर्व आशिया व आफ्रिका (केनिया) मध्येसुद्धा आढळतो. ताडमाड उंची, लांब पाय, उंच मान यामुळे हा प्राणी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

Giraffe information in marathi for student | Giraffe information for school project | Giraffe information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.