साळिंदर प्राण्याची माहिती | Indian purcupine information in marathi

12 ] Information about Indian purcupine in Marathi | साळिंदर संपूर्ण माहिती


साळिंदर माहिती मराठी  Salindar vishay mahiti  Salindar  mahiti marathi  Indian purcupine information in marathi for student  Indian purcupine information for school project  Indian purcupine information in marathi


        साळिंदर हा एक जंगली प्राणी असून तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांना परिचित आहे.


साळींदर प्राण्याचे वर्णन : 

        या प्राण्याला चार पाय असतात. दोन डोळे व एक शेपटी असते. या प्राण्याच्या तोंडाची रचना उंदीर या प्राण्याच्या तोंडाशी मिळती-जुळती असते. या प्राण्याचा रंग काळपट तपकिरी असतो.

 

साळिंदर प्राण्याचे वर्णन :

साळिंदर हा प्राणी पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याला गवत, कंदमुळे, गाजर, ऊस इ. खायला खूप आवडते.

साळींदर प्राण्याची वैशिष्ट्ये :

प्रत्येक प्राण्याला स्वतःच्या संरक्षणासाठी काही ना काही देणगी परमेश्वराने दिली आहे. या प्राण्यालासुद्धा देवाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक देणगी दिली आहे. ती म्हणजे त्याच्या अंगावरील तीक्ष्ण काटे होत.


साळींदर प्राण्याची इतर माहिती :

    साळिंदर हा प्राणी सहसा कोणत्याही प्राण्याच्या वाटेला जात नाही; परंतु आपल्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्याला मात्र आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी जखमी करून घायाळ करतो. हा प्राणी अतिचपळ असतो.

    या प्राण्याच्या अंगावर सर्वसाधारणपणे एक इंचापासून ते जवळ जवळ पंधरा इंच लांब काटे असतात. हा प्राणी आकाराने छोटा असतो. परंतु सिंह, वाघ, चित्ता, कोल्हा यांसारखे हिंस्र प्राणीसुद्धा याच्यावर हल्ला करीत नाहीत; कारण हा प्राणी आपल्या अंगावरील तीक्ष्ण काट्यांनी त्यांच्यावर हल्ला करतो आणि ते काटे त्या प्राण्याच्या अंगात शिरतात व मोडतात. असा हा छोटासा साळिंदर प्राणी मोठ्या बिळांत राहतो. तो डोंगराळ भागात व जंगलात आढळतो


Salindar vishay mahiti | Salindar  mahiti marathi | Indian purcupine information in marathi for student

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.