अस्वल प्राण्याची माहिती | Bear information in marathi

5] Information about Bear in Marathi | अस्वलाची  संपूर्ण माहिती


मराठी नाव : अस्वल

हिंदी नाव : भालू

इंग्रजी नाव : BEAR

 

अस्वल  माहिती मराठी  Aswal vishay mahiti  Aswal mahiti marathi  Bear information in marathi for student | Bear information for school project  | Bear information in marathi

            अस्वल हा प्राणी जंगलामध्ये राहतो. इतर जंगली प्राण्यांपेक्षा हा प्राणी वेगळा दिसतो. अस्वल गुदगुल्या करून प्राणी व माणसांना हैराण करतो.


अस्वलाचे वर्णन :

अस्वल हा प्राणी केसाळ आहे. त्याचा रंग काळा असतो, अस्वलाला चार पाय, दोन डोळे व दोन छोटे कान असतात. अस्वलाचे पाय व पंजे पण केसाळ असतात.


अस्वलाचे अन्न  :

अस्वल हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारीसुद्धा आहे. अस्वलाला ताजी फळे-बोरं, मधमाश्यांच्या पोळ्यातला मध या गोष्टी आवडतात. हरिण, घोडा यांसारख्या प्राण्यांचे मांसही खायला आवडते.


शिकार :

अस्वल शिकार करताना समोर आलेल्या सावजाला आधी खूप गुदगुल्या करून हैराण करते आणि मग आपल्या नखांनी फाडून खाते. अस्वल प्राण्यांची हाडेसुद्धा आपल्या दाढांनी कडाकडा फोडून खाते. अस्वलाची सगळी शक्ती त्याच्या जबड्यात असते. अस्वल हे मध, फळे खाण्यासाठी झाडावर भराभर चढते; परंतु त्याचा देह स्थूल असल्याने तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारू शकत नाही.


अस्वलाची इतर माहिती :

अस्वल हा प्राणी कळपाने कधीही राहात नाही. अस्वलाचे वजन फार असते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची घ्राणेंद्रिये फार तीक्ष्ण असतात. अस्वलाला  माणसाचा वास चटकन येतो. अस्वलाची मादी एका वेळी २-३ पिलांना जन्म देते. ही पिले जन्मल्यानंतर ३-४ आठवड्यांनंतर डोळे उघडतात, पिलांचे संगोपन अस्वल मादीच करते. हा प्राणी थंडीच्या दिवसांत सहा महिने स्वस्थपणे शीतनिद्रा घेतो. जेव्हा जागा होतो तेव्हा शिकार करतो. अस्वले हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा शीतनिद्रा घेतात तेव्हाच मादी अस्वल पिल्लांना जन्म देते. या प्राण्याच्या केसांचा उपयोग दोरखंड तयार करण्यासाठी, लोकर काढण्यासाठी करतात.

Bear information in marathi for student | Bear information for school project  | Bear information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.