२.भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Bhartachya Parrashtra Dhornachi Vatchal Swadhyay Prashn Uttare

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 2

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल इयत्ता नववी स्वाध्याय | भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf


प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१)  अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख उद्देश........... हा होता.

(अ) लष्करी क्षमता निर्माण करणे

(ब) अणुचाचणी करणे

(क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे

(ड) ऊर्जेची निर्मिती

उत्तर: ऊर्जेची निर्मिती


 

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल इयत्ता नववी स्वाध्याय भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल प्रश्न उत्तरे इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf


(२) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट ........ बनले आहे.

(अ) आण्विक विकास

(ब) आर्थिक विकास

(क) अणुचाचणी

(ड) सुरक्षा व्यवस्था

उत्तर: आर्थिक विकास

 

(३) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील  बाब महत्त्वाची आहे.

(अ) मुक्त आर्थिक धोरण

(ब) परस्परावलंबन

(क) अलिप्ततावाद

(ड) आण्विक विकास

उत्तर: अलिप्ततावाद

 

(४) इ.स.१९७४ साली भारताने........... या  ठिकाणी अणुचाचणी केली.

(अ) श्रीहरीकोटा

(ब) थुंबा

(क) पोखरण

(ड) जैतापूर

उत्तर: पोखरण

 

इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा २  स्वाध्याय | इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय


प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

 

(१) पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.

उत्तर: बरोबर ,कारण:

१) चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या देशांत भारत आघाडीवर होता.

२)१९५४ साली चीनचे पंतप्रधान चौ-एन लाय व भारताचे पं. नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिक दृढ झाले.

३) या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला. अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.

 

(२) अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.

उत्तर: बरोबर, कारण :

१)तत्कालीन पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांशी दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतात निर्माण करण्यासाठी चर्चा केली.

२) वाजपेयी यांनी १९९९ साली पाकिस्तान ला भेट देऊन लाहोर करार केला.

३) वाजपेयी यांच्याच प्रयत्नामध्ये लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली.

 



प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

 

(१) भारताचे परराष्ट्र धोरण

उत्तर:

१) आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास परराष्ट्र धोरण असे म्हणतात.

२) १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली.

३) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता आणि मानवाधिकार या मुल्यांवर भारताचे परराष्ट्र धोरण आधारलेले आहे.

४) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे भारताच्या  परराष्ट्र धोरणाचे उद्‌दिष्ट मानले आहे.

५)भारताच्या संविधानातील कलम ५१ मध्ये सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांत नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण ठरवले जाते.

 

Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 2

(२) राष्ट्रीय हितसंबंध

उत्तर:

१) आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उपाययोजना कराव्या लागतात, त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात.

२) आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे म्हणतो.

३) आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधांत समावेश होतो.

४) आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे ही बाब देखील राष्ट्रीय हितसंबंधामध्ये जोपासली जाते.

५) राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून केली जाते.

 

(३) जागतिक शांतता

उत्तर:

१)राष्ट्राराष्ट्रांमध्ये तणावाचे, हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे , म्हणजेचे जागतिक शांतात होय.

२) फक्त आपल्या देशात शांतता निर्माण होऊन उपयोग नाही तर शेजारील देशांत जर शांतात असेल तर जागतिक शांतात निर्माण होण्यास मदत होते.

३) शशास्त्र वाढ आणि अण्वस्त्रे यांमुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होतो.

४) वंशवाद, आक्रमकता, दारिद्र्य, धर्मांधता आणि अतिरेकी राष्ट्रावाढ यामुळे जागतिक शांतात भंग पावते.

५) सामंजस्याचे धोरण, आर्थिक विकास, सहकार्याची वृत्ती, लोकशाही समाज आणि इतर राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर या बाबी जागतिक शांतता जोपासण्यास सहाय्यक ठरतात.

 



प्रश्न ४. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते?

उत्तर:

१) अमेरिकेने जपानच्या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यावर जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना आली.

२) रशिया, भारत, फ्रान्स, चीन, उत्तर कोरिया , पाकिस्तान आणि भारत ही राष्ट्रे आज अण्वस्त्र सज्ज आहेत.

३) जगात अनेक ठिकाणी अण्वस्त्रांच्या वाढीमुळे तणाव वाढत चालला आहे.

४) शीतयुद्धाच्या काळाप्रमाणे युद्धसदृश्य परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत आहे.

या सर्व कारणांमुळे अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे असे मला वाटते.

 



प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

 

(१) भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर  आधारित आहे?

उत्तर: भारताचे परराष्ट्र धोरण पुढील  मूल्यांवर  आधारित आहे:

१) अंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे.

२) राष्ट्राराष्ट्रांत न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे.

३) आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्‌धिंगत करणे.

४) मानवी हक्कांचे संरक्षण करणे.

 

(२) भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?

उत्तर:

१) भारत-चीन संबंध सुधारण्यास पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला.

२)अटलबिहारी वाजपेयी यांचेदेखील भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान आहे.

३) यानंतर आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांनी देखील भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले .

 

(३) भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्‌दिष्टे लिहा.

उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्‌दिष्टे पुढील प्रमाणे आहेत:

१) शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे.

२) राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे.

३) भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे.

४) दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे.

५) भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे.

 



प्रश्न ६. पुढील संकल्पनाचित्र तयार करा.

उत्तर:

परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक

१)  देशाचे भौगोलिक स्थान

२)    प्रशासकीय घटक

३)  अर्थव्यवस्था

४)     राजकीय नेतृत्व

५)     राजकीय व्यवस्था

Bhartachya Parrashtra Dhornachi Vatchal swadhyay prashn uttare | Bhartachya Parrashtra Dhornachi Vatchal Swadhyay Iyatta Navavi



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.