३. भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Bhartachi Suraksha Vyavstha Swadhyay Prashn Uttare

भारताची सुरक्षा व्यवस्था इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 3

भारताची सुरक्षा व्यवस्था इयत्ता नववी स्वाध्याय | भारताची सुरक्षा व्यवस्था प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf


प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) भारताचे ........ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

(अ) प्रधानमंत्री

(ब) राष्ट्रपती

(क) संरक्षण मंत्री

(ड) राज्यपाल

उत्तर:राष्ट्रपती

 

(२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची  जबाबदारी असणारे दल -

(अ) भूदल

(ब) तटरक्षक दल

(क) सीमा सुरक्षा दल

(ड) जलद कृतिदल

उत्तर: तटरक्षक दल

 

Bhartachi Suraksha Vyavstha swadhyay prashn uttare Bhartachi Suraksha Vyavstha Swadhyay Iyatta Navavi Class 9 history questions and answers History guide for class 9 maharashtra board 9vi Rajyashastra swadhyay chapter 3

(३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ........ ची स्थापना  करण्यात आली.

(अ) बी.एस.एफ.

(ब) सी.आर.पी.एफ.

(क) एन.सी.सी.

(ड) आर.ए.एफ.

उत्तर: एन.सी.सी.

 



प्रश्न२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

 

(१) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे  आवश्यक आहे.

उत्तर: बरोबर ; कारण:

१) सामान्य माणसांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो.

२)दहशत निर्माण करून आपली राजकीय आणि आर्थिक उद्दिष्ट्ये दहशदवादी लोक साध्य करत असतात.

३) दहशत पसरवून आपला प्रभाव निर्माण करणे, गैरकृत्ये करणे हे हेतू या दहशतवादी कारवायांमागे दडलेले असतात; त्यामुळे सुरक्षितता धोक्यात येते.

म्हणून दहशत वाद नष्ट करणे आवश्यक आहे.

 

 

(२) प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

उत्तर: बरोबर ; कारण :

१) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणीवाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात.

२) राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्परविरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकारण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते; परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते.

३) कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असते.

म्हणून, प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

 

इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा 3 स्वाध्याय | इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय

(३) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच  वादग्रस्त प्रश्न नाहीत.

उत्तर: चूक ; कारण :

१) स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

२)पाकिस्तान नेहमी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो.

३) सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षे तंटा चालू आहे.

४) भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सीमावादाचे अनेक वादग्रस्त तंटे चालू आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच  वादग्रस्त प्रश्न नाहीत हे विधान चूक आहे.

 



प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

 

(१) जलद कृतिदलाचे कार्य

उत्तर:

भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात, त्यामध्ये जलद कृतिदलाचा समावेश होतो. जलद कृतीदल पुढील कार्य करते.

१) बाँबस्फोट, दंगे अशा परिस्थितीमध्ये सापडलेल्या निरपराध जनतेला मदत करणे.

२)देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते.     

 

(२) मानवी सुरक्षा

उत्तर:

१) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार शीतयुद्धानंतर उदयास आला.

२) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो.

३)अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

४) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे, या बाबीचा देखील समावेश केला जातो.

 

(३) गृहरक्षक दल

उत्तर:

१) स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल (होमगार्ड) ही संघटना स्थापन करण्यात आली.

२)गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात.

३)वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकांस या दलात भरती होता येते.

४)पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.

 

Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 3



प्रश्न ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो?

उत्तर: राष्ट्राच्या सुरक्षेला खालील बाबींपासून धोका निर्माण होतो:

१)दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास.

२) राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास .

३) देशात दहशवाद वाढल्यास .

४) धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास.

 

(२) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.

उत्तर: सीमा सुरक्षा दलाची कार्ये खालील प्रमाणे आहेत:

१) शत्रूंपासून देशाच्या सीमांचे संरक्षण करणे.

२) सीमाभागातील तस्करी रोखणे.

३) देशाच्या सीमेवर गस्त घालणे.

४)सीमाभागात राहणाऱ्या लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.

 

(३) मानवी सुरक्षा म्हणजे काय?

उत्तर:

१) देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलें सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय.

२)निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो.

३)अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

४) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे, या बाबीचा देखील समावेश केला जातो.

 



प्रश्न ५. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.


१. सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.

सुरक्षा दलाचे नाव

कार्ये

प्रमुख

सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव

भूदल

भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे.

जनरल

मनोज पांडे (२०२३)

नौदल

भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे.

ॲडमिरल

वी. आर. चौधरी (२०२३)

वायुदल

भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे  रक्षण करणे.

 

एअर चीफ मार्शल

आर. हरि कुमार. (२०२३)

 

२. भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा.

उत्तर:

सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने.

१)    दहशत वाद

२)   पाकिस्तानचे आव्हान

३)   भारत-चीन यांच्यातील तणाव

४) अंतर्गत हिंसक चळवळी.

Bhartachi Suraksha Vyavstha swadhyay prashn uttare | Bhartachi Suraksha Vyavstha Swadhyay Iyatta Navavi



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.