४. संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Sanyukta Rashtre Swadhyay Prashn Uttare

संयुक्त राष्ट्रे इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 4

Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 4



प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?

(अ) अमेरिका

(ब) रशिया

(क) जर्मनी

(ड) चीन

उत्तर: जर्मनी

 

संयुक्त राष्ट्रे इयत्ता नववी स्वाध्याय संयुक्त राष्ट्रे प्रश्न उत्तरे इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा ४  स्वाध्याय इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय संयुक्त राष्ट्रे

(२) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना  करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित  करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.

(अ) युनिसेफ

(ब) युनेस्को

(क) विश्वस्त मंडळ

(ड) रेडक्रॉस

उत्तर: युनिसेफ

 

(३) संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या -

(अ) १९०

 (ब) १९३

(क) १९८

(ड) १९९

उत्तर: १९३


संयुक्त राष्ट्रे इयत्ता नववी स्वाध्याय | संयुक्त राष्ट्रे प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf



प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.


(१) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

उत्तर: बरोबर; कारण :

१) संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात.

२) पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर आमसभेत चर्चा होते.

३) सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी  आमसभा हे महत्वाचे व्यासपीठ आहे.

 

(२) संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.

उत्तर: चूक; कारण:

१)जगातील सर्व राष्ट्रे ही संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत, ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात .

२) देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो.

३) प्रत्येक राष्ट्राला एक मत असते.

म्हणून , संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.

 

(३) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर  करूनही ठराव संमत होऊ शकतो.

उत्तर: चूक; कारण:

१)चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे.

२) सुरक्षा परिषदेतील कायम असणाऱ्या पाच राष्ट्रांना नकाराधिकार आहे.

३) नकाराधिकार असलेल्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला, तरीही एखादा ठराव मंजूर होऊ शकत नाही. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही.

 

(४) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

उत्तर: बरोबर ; कारण :

१)संयुक्त राष्ट्रांच्या परिषदांमध्ये भारताचा सहभाग होता.

२) निर्वासाह्तीकरण, निःशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न भरताना संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले.

३) भारताने आपले सैन्य संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत पाठवले आहे. अशा रीतीने भारताने संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.

 



प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

 

(१) नकाराधिकार

उत्तर:

१) सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर नकार देण्याचा अधिकार असतो त्याला नकाराधिकार असे म्हणतात.

२)एखाद्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेत निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे गरजेचे असते.

३) कायम सदस्य राष्ट्रांपैकी जर एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरीही तो निर्णय अमान्य ठरतो.

 

(२) युनिसेफ

उत्तर:

१)आंतरराष्ट्रीय स्तरावर बालकांसाठी विकास निधी उभारण्यासाठी ‘युनिसेफ’ ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न संस्था आहे.

२) लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते.

३) सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

४) युनिसेफ चे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

 



Sanyukta Rashtre swadhyay prashn uttare | Sanyukta Rashtre Swadhyay Iyatta Navavi

प्रश्न ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा.

उत्तर: संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली कारण :

१) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली.

२)या महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

३)यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक होते.

४) या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.

 

(२) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका  बजावते?

उत्तर: संघर्षग्रस्त भागात संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना पुढील भूमिका बजावते:

१) ज्या राष्ट्रांमध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांमध्ये हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते.

२)शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे.

३) शांतता टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते.

४)सुरक्षेबरोबर राजकीय आणि शांतात बांधणीसाठी सहकार्य करते.

 


(३) संयुक्त राष्ट्रांचे उद्‌दिष्ट लिहा.

उत्तर: संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत:

१) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

२)आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्‌धिंगत करणे.

३)मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

४)आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे.

 



प्रश्न  ५. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.


(१) संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

क्र.

शाखा

सदस्य संख्या

कार्ये

१.

आमसभा

१९३

१)पर्यावरणासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे.

२) सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे.

३) संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास स्वीकृती देणे.

२.

सुरक्षा समिती

१५

१)आंतरराष्ट्रीय शांतात आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे.

२)शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे.

३)आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करणे.

३.

आंतरराष्ट्रीय न्यायालय

१५

१)सदस्य राष्ट्रांमधील तंटे सोडविणे.

२)आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे.

४.

आर्थिक व सामाजिक परिषद

५४

१)आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षीन व सांस्कृतिक सहकार्य निर्माण करणे.

२)संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संघटनाच्या कामात सुसूत्रता व समन्वय साधणे.

३) दारिद्र्य, बेरोजगारी , आर्थिक व सामाजिक विषमता यांसारख्या प्रश्नावर चर्चा करणे आणी उपाययोजना सुचवणे.

४) स्त्रियांचे प्रश्न, मुलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करणे.

 

इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा ४  स्वाध्याय | इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय संयुक्त राष्ट्रे

 (२) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील  कालरेषेवर दाखवा.

उत्तर:

इ.स.१९४१

इ.स.१९४४

इ.स.१९४५

अटलांटिक करार

आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा

संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना.

 





(३) संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा.

उत्तर:

संयुक्त राष्ट्रे

मुख्यालय : न्यूयॉर्क

१)मुख्य शाखा घटक

·       आमसभा

·       सुरक्षा परिषद

·       आर्थिक आणी सामाजिक परिषद

·       सचिवालय

·       आंतरराष्ट्रीय न्यायालय


२)संलग्न संस्था

·       आंतरराष्ट्रीय कामगार संघटना

·       अन्न व शेती संघटना

·       जागतिक आरोग्य संघटना

·       आंतरराष्ट्रीय नाणे निधी

·       संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.