५. भारत व अन्य देश स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Bharat v Anya Desh Swadhyay Prashn Uttare

भारत व अन्य देशइयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 5

भारत व अन्य देश इयत्ता नववी स्वाध्याय | भारत व अन्य देश प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf



प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा  देश -

(अ) पाकिस्तान

(ब) बांगलादेश

(क) नेपाळ

(ड) म्यानमार

उत्तर: नेपाळ

 

भारत व अन्य देश इयत्ता नववी स्वाध्याय भारत व अन्य देश प्रश्न उत्तरे इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा ५ स्वाध्याय इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय संयुक्त राष्ट्रे

(२) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश -

(अ) पाकिस्तान व चीन

(ब) नेपाळ व भूटान

(क) म्यानमार व मालदीव

(ड) अफगाणिस्तान व अमेरिका

उत्तर: पाकिस्तान व चीन

 

(३) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर  प्रभाव असणाऱ्या बाबी -

(अ)दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील  फरक

(ब) काश्मीर समस्या

(क) अण्वस्त्रविषयक संघर्ष

(ड) वरील सर्व समस्या

उत्तर: वरील सर्व समस्या

 



Class 9 history questions and answers| History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 5

२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट  करा.


(१) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान  महत्त्वाचे आहे.

उत्तर: बरोबर; कारण:

१) समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे.

२) या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत.

३) भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे.

म्हणून , दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान  महत्त्वाचे आहे.

 

(२) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.

उत्तर: चूक; कारण :

१) भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे.

२) १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.

३) तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशांतील संघर्षाला कारणीभूत ठरली आहे.

४) चीनने पास्कीस्तान ला अण्वस्त्रे आणी शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा केल्याने भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. या कारणांमुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण आहेत.

 

(३) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना  पाठवली.

उत्तर: बरोबर; कारण:

१) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.

२) त्या वेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.

 



प्रश्न ३. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

 

१. पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

क्र.

झालेले करार/देवाणघेवाण

संबंधित देश

१.

सिमला करार

भारत-पाकिस्तान

२.

मॅकमोहन रेषा

भारत-बांग्लादेश

३.

पाणीवाटप व सिमेसंबंधी करार

भारत-बांगलादेश

४.

नैसर्गिक वायूची आयात

भारत-म्यानमार

५.

नागरी अणुसहकार्य करार

भारत-अमेरिका

६.

 पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य.

भारत-मालदीव

७.

शिखर परीषद-२०१५

भारत-आफ्रिका

 



Bharat v Anya Desh swadhyay prashn uttare | Bharat v Anya Desh Swadhyay Iyatta Navavi

प्रश्न ४. पुढील संकल्पना स्पष्ट करा.


(१) सिमला करार

उत्तर:

१) सिमला करार १९७२ साली तत्कालील पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तान चे प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झाला.

२)या करारामागे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवर सोडवावेत ही भारताची भूमिका होती.

३) १९७२ साली याच तत्वावर भारत आणी पाकिस्तान यांच्यात सिमला करार झाला.

४)या कराराद्वारे भारत आणी पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाण-घेवाण करण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला. परंतु पाकिस्तान ने या कराराचे पालन केले नाही.

 

(२) भारत-नेपाळ मैत्री करार

उत्तर:

१) नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूंनी डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत.

२) भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५० साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला.

३)या करारामुळे नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.

४)पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यांसाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळला भारताने मदत करावी असेही या मैत्री करारात ठरवण्यात आले.

 

(३) मॅकमोहन रेषा

उत्तर:

१) मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही.

२) अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा यांच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भूभाग आहे असे चीनचे मत आहे.

३) चीनला ही सीमारेषा मान्य नाही. यामुळे चीन व भारत यांच्यात वाद आहेत.

४) हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.

 

(४) भारत-अफगाणिस्तान संबंध

उत्तर:

तालिबान या दहशतवादी संघटनेच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. भारत अफगाणिस्तान ला पुढील गोष्टींमध्ये मदत करतो.

१) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे.

२) लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे.

३) युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्तेबांधणी , विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसेच शाळा आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य करणे.

 



इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf | इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा ५ स्वाध्याय | इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय संयुक्त राष्ट्रे

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण  होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.

उत्तर:

१) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत.

२) अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील या अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले.

३) शीतयुद्धानंतर भारत आणिअमेरिका यांच्या तील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले.

४) भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला.

 

(२) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी  उदाहरणासह माहिती लिहा.

उत्तर:

१) समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे.

२)अफगाणीस्तान ला लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने मदत केली.

३) बांग्लादेश ला पाकिस्तान च्या वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारताने मदत केली.

३) श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारताने श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी शांतीसेना पाठवली.

४) नेपाळ, भूतान या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकराची मदत करून तेथील लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला.

५) अनेकदा आक्रमणे, घूसघोरी करून देखील भारत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद करतो.

 

(३) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना  कोणते कार्य करत आहे.

उत्तर: दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना  पुढील कार्य करत आहे:

१) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास करणे.

२) क्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे.

३) संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापारक्षेत्र निर्माण करणे.

४) आशियायी देशांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यांसारख्या संस्था सुरु करणे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.