६. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता ९वी भूगोल | Sagarjalache Gundharma Swadhyay class 9

9vi bhugol swadhyay 6 Sagarjalache Gundharma | स्वाध्याय सागरजलाचे गुणधर्म इयत्ता नववी भूगोल

  •  इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 6
  • सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी    
  • Sagarjalache Gundharma Swadhyay class 9
  • Std 9 geography chapter 6 question answer in marathi

 

प्रश्न  १.   खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत  खूण करा.


 

क्षारता

जास्त

मध्यम

कमी

(अ) तिरपी सूर्यकिरणे, वितळणारेबर्फ.

 

 

(आ) अधिक काळ ढगाळलेलेआकाश, वर्षभर पर्जन्य.

 

 

(इ) बहुतेक दिवस निरभ्र आकाश, लंबरूप सूर्यकिरणे.

 

 

(ई)गोड्या पाण्याचा पुरवठा कमी, सभोवती वाळवंटी प्रदेश.

 

 

(उ)तापमान कमी, नदीजलाचा मुबलक पुरवठा.

 

 

()खंडांतर्गत स्थान, सभोवती वाळवंट, कमी पर्जन्य.

 

 


 

Sagarjalache Gundharma Swadhyay class 9  Std 9 geography chapter 6 question answer in marathi  Chapter 6 geography 9th class marathi  9th class bhugol chapter 6 Sagarjalache Gundharma question answer  9th std bhugol chapter 6 quesiton answer  Geography chapter Sagarjalache Gundharma i question answer in marathi



प्रश्न २.कारणे लिहा.


(अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

उत्तर:

१) बाल्टिक समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा भाग आहे. युरोपच्या उत्तरेस समशीतोष्ण कातीबंधात येतो.

२)   बाल्टिक समुद्र हा भूवेष्टित समुद्र असल्याने अटलांटिक महासागरातील प्रवाहांचा या समुद्रावर फारसा प्रभाव पडत नाही.

३) येथील तापमान कमी तापमान आणि कमी बाष्पीभवन आणि वितळणाऱ्या बर्फामुळे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा या सर्व कारणांमुळे बाल्टिक समुद्र भूवेष्टित असूनही त्याची क्षारता कमी आहे.  

 


(आ)  तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

उत्तर:

१) तांबडा समुद्र हा ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्ये असलेला एक अत्यंत चिंचोळा, लांब समुद्र आहे.

२) या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूवेष्टित असल्याने हिंदी महासास्गारातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेच  येथील क्षरातेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते.

३)   या समुद्राचा उत्तरेकडील भाग हा सहारा वाळवंटाच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने या ठिकाणी जास्त तापमान आणि जास्त बाष्पीभवन यांमुळे या ठिकाणी क्षारता अधिक आढळते.

 


(इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

उत्तर:

१) तापमान, गोड्या पाण्याचा पुरवठा आणि सागराचे खुले किंवा बंदिस्त स्वरूप या घटकांवर सागरजलाची क्षारता अवलंबून असते.

२)  त्यामुळे महासागर समान अक्षवृत्तावर असले तरीही त्यांची क्षारता एकसमान आढळत नाही.

३) उदा: अटलांटिक आणि हिंदी महासागर समान अक्षवृत्तावर असूनदेखील त्यांची क्षारता सारखी आढळत नाही.


Chapter 6 geography 9th class marathi | 9th class bhugol chapter 6 Sagarjalache Gundharma question answer | 9th std bhugol chapter 6 quesiton answer  | Geography chapter Sagarjalache Gundharma i question answer in marathi


(ई) वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उत्तर:

१) सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.

२) परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

 


(उ)  भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरेआढळतात.

उत्तर:

१)    भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे.

२)   अरबी समुद्राचा बराचसा भाग हा उष्णकटीबंधीय प्रदेशात येतो. वर्षभर बहुतांश दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश आणी जास्त तापमान यामुळे येथे बाष्पीभवनाचा वेग देखील जास्त आहे. भारतातील केवळ नर्मदा आणि तापी या दोनच नद्या अरबी समुद्राला गोड्या पाण्याचा पुरवठा करतात. या सर्व कारणांमुळे अरबी समुद्राची क्षारता ३६ % इतकी आहे.

३)   अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरावरील आकाश हे बहुतांश दिवस ढगाळ असते. शिवाय भारतातील सर्व प्रमुख नद्या बंगालच्या उपसागरास गोड्या पाण्याचा पुरवठा करतात. त्यामुळे बंगालच्या उप्सागाराची क्षारता ३२% इतकी आहे. म्हणजे अरबी समुद्रापेक्षा ४ % कमी आहे.

४) मिठागरांना पोषक अशी परिस्थिती जास्त क्षारता, जास्त तापमान हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने भारताच्या पूर्व किनार्यापेक्षा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मिठागरे जास्त आहेत.

 

(ऊ)  मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

उत्तर:

१) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण कमी असते.तसेच नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो.

२) जगातील प्रमुखवाळवंटी प्रदेश देखील याच पट्ट्यांत येतात त्यामुळे या ठिकाणी बाष्पीभवनाच वेग देखील जास्त आहेत.

३)   या सर्व कारणांमुळे  मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.


प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते?

उत्तर:

१) विषुववृत्तापासून धृवापर्यंत तापमानातील अक्षवृत्तीय बदल, बाष्पीभवनाचे कमी – अधिक प्रमाण, सागराला मिळणाऱ्या नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे सागरजलक्षरातेच्या भिन्न्तेस कारणीभूत ठरणारे घटक आहेत.

 

(आ)  कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.

उत्तर:

१)    कर्कवृत्ताच्या आसपास सागरजलाची क्षारता ३६% आहे .

२)   जास्त तापमान, बाष्पीभवनाचा अधिक वेग आणि समुद्रांचे भूवेष्टित स्वरूप यांमुळे सागरी प्रवाहास असणारे अडथळे यांमुळे इथे क्षारता मकरवृत्तापेक्षा अधिक आढळते.

 

(इ)  सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.

उत्तर:

        सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, प्रदूषण, ऋतू, सागरजलसाक्षरता, सागरी लाटा , हे घातक परिणाम करतात.

 

सागरजलाचे गुणधर्म प्रश्न उत्तरे | स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल धडा 6
इयत्ता नववी भूगोल स्वाध्याय 6 | सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय 9वी  
 


(ई)  खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

उत्तर:

१)  सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.

२) परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

३) अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते.

४) विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५° से., मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६° से., तर ध्रुवीय प्रदेशात २° से. पर्यंत असते.

 

 

(उ) क्षारतेवर परिणाम करणारेघटक लिहा.   

उत्तर:

१) बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होते; परंतु क्षार तेवढेच राहतात, त्यामुळे उरलेल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढते, म्हणजेच पाण्याचा खारटपणा वाढतो.

२) बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागरजलाची क्षारता जास्त असते.

३)   पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागरजलाची क्षारता कमी आढळते.

४) पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्यापाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागरजलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही

 

प्रश्न ४. पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.


(अ) सागरी जलाची घनता

उत्तर: सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात, म्हणजेच तापमान कमी झाले, की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते, तर उष्ण पाण्याची घनता कमी असते. मात्र विशिष्ट खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असल्न्ये सागरी जलाची घनता देखील सारखीच असते.

 

(आ) सागरी जलाची क्षारता

उत्तर: तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे पाण्याची क्षारता वाढते. म्हणून उष्ण कटिबंधात तसेच ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असते. त्यामुळे बाष्पीभवन देखील कमी होते. म्हणून क्षारता कमी असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी –कमी होत जाते, म्हणूनक्षारता देखील कमी कमी होत जाते. 


************ 



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :