१. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी राज्यशास्त्र | Mahayudhotar rajkiy ghadamodi Swadhyay Prashn Uttare

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र स्वाध्याय | Iyatta 9 vi Rajyashastra swadhyay chapter 1

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf | इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा १  स्वाध्याय| इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय


प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१) स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था -

(अ) राजकीय व्यवस्था

(ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

(क) सामाजिक व्यवस

(ड) यांपैकी नाही

उत्तर: आंतरराष्ट्रीय व्यवस्था


Mahayudhotar rajkiy ghadamodi swadhyay prashn uttare Mahayudhotar rajkiy ghadamodi Swadhyay Iyatta Navavi Class 9 history questions and answers History guide for class 9 maharashtra board 9vi Rajyashastra swadhyay chapter 1


(२) राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी -

(अ) युद्ध टाळणे

(ब) वसाहतींचे स्वातंत्र्य

(क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे

(ड) नि:शस्त्रीकरण करणे

उत्तर: युद्ध टाळणे

 

(३) शीतयुद्ध ........... या घटनेमुळे संपले.

(अ) संयुक्त राष्ट्रांची स्थापना

(ब) सोव्हिएत रशियाचे विघटन

(क) लष्करी संघटनांची निर्मिती

(ड) क्यूबाचा संघर्ष

उत्तर: सोव्हिएत रशियाचे विघटन

 


इयत्ता नववी राज्यशास्त्र  स्वाध्याय pdf  | इयत्ता नववी राज्यशास्त्र धडा १  स्वाध्याय | इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र  स्वाध्याय

प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.


(१) पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.

उत्तर: बरोबर

कारण, १) पहिल्या महायुद्धात जगात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

२) अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले.

३)  आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे, या विचारांतून  ‘राष्ट्रसंघ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली.

 

(२) शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.

उत्तर: चूक कारण,

१) जगाचे एकध्रुवीकर्ण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एकाच गटात सामील होणे.

२) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते.

३) राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्‌विध्रुवीकरण होय.

म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नाही तर द्विध्रुवीकरण झाले.

 

(३) मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

उत्तर: बरोबर कारण,

१) सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली.

२) या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले.

३) राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली.

४)परिणामी  लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

 

Class 9 history questions and answers | History guide for class 9 maharashtra board | 9vi Rajyashastra swadhyay chapter 1



प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

(१) शीतयुद्ध

उत्तर:

१) दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली.

२) या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता.

३)प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या युद्धसदृश्य परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हटले जाते.

 

(२) अलिप्ततावाद

उत्तर:

१) शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्‌विध्रुवीकरण होत होते.

२)पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले.

३)या अलिप्त राहण्याच्या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात.

४)अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.

 

(३) परस्परावलंबन

उत्तर:

१) जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात.यालाच परस्परावलंबन असे म्हणतात.

२) राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असू शकत नाही.

३) मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते.

४) म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

 

(४) द्‌विध्रुवीकरण

उत्तर:

१)शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते.

२)राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्‌विध्रुवीकरण होय.

 

Mahayudhotar rajkiy ghadamodi swadhyay prashn uttare | Mahayudhotar rajkiy ghadamodi Swadhyay Iyatta Navavi

(५) जागतिकीकरण

उत्तर:

१) शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला.

२) भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्येविचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली.

३)माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या.

४)देशांच्या सीमारेषांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात.

 


प्रश्न ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

 

(१) पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात  पुढील मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा

मुद्दे

पहिले महायुद्ध

दुसरे महायुद्ध

१. कालखंड

इ.स. १९१४ ते १९९८

इ.स. १९३९  ते १९४५

२. सहभागी राष्ट्रे

ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, बल्गेरिया, तुर्कस्तान.

ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन, अमेरिका, जर्मनी, जपान, इटली.

३. परिणाम - (राजकीय व आर्थिक)

अ) आर्थिक :  १) मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी झाली. २) सहभागी राष्ट्रांचे मोठ्या प्रमाणवर आर्थिक नुकसान झाले. ३) विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या.

ब)राजकीय : १) पूर्वीची साम्राज्ये नष्ट झाली.२) नवीन राष्ट्रांचा उदय झाला. ३) स्वातंत्र्य चळवळी सुरु झाल्या.

अ) आर्थिक : १) पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक हानी झाली. २) आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले.

३) महागाई, टंचाई यामुळे लोकांच्या हालअपेष्टा वाढल्या .

ब) राजकीय : १) आशिया आणि अफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या.

२) शीतयुद्धास प्रारंभ झाला.

४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना

 

राष्ट्रसंघ

१)               संयुक्त राष्ट्र संघटना

२)         नाटो लष्करी संघटना.

३)         वॉर्सा करार ही लष्करी संघटना.


(२) शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?

उत्तर: शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या:

१) सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.

२) सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल.झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

(३) पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.

४) सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली.

 

(३) शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?

उत्तर: शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले:

१)    जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.

२) राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले.

३) सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी  आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले.

४) पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

**************

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.