विज्ञान व तंत्रज्ञान इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 7 question answers
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ...........
यांची नेमणूक झाली.
(अ) डॉ.होमी भाभा
(ब) डॉ.होमी
सेठना
(क)
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
(ड) डॉ.राजा
रामण्णा
उत्तर: अणुऊर्जा
आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा यांची नेमणूक झाली.
(२) इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला .........हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
(अ) आर्यभट्ट
(ब) इन्सॅट १
बी
(क) रोहिणी-७५
(ड) ॲपल
उत्तर: इस्रोनेपूर्णतः
भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला
दूरसंचार उपग्रह होय.
इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा सातवा स्वाध्याय
(ब) पुढीलपैकी
चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) पृथ्वी -
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र.
(२) अग्नी -
जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र.
(३) आकाश -
जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र.
(४) नाग -
शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र.
उत्तर: अग्नी - जमिनीवरुन पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र
इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | Vidnyan v Tantradnyan swadhyay prashn uttare
प्र.२ (अ)
दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.
भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.
उत्तर :
प्र.२(ब) टिपा लिहा.
(१) अवकाश
संशोधन
उत्तर:
1. केरळ
राज्यातील थुंबा येथील 'थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटर वरून
इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे
।961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले.
2. 1967 मध्ये
थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या 'रोहिणी-75' अग्निबाणाचे
यशस्वी प्रक्षेपण केले गेले.
3. याच्या
पुढचा टप्पा म्हणने 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय 'आर्यभट्ट' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
4. या यशामुळे
अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध
झाले.
5.
भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या
संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे
मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान
अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.
Vidnyan v Tantradnyan Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers
(२) टेलेक्स
सेवा
उत्तर:
1. देशाच्या
एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी
टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने मुरु केली.
2. 1969 मध्ये
देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरु झाली.
3. पुढे तिचा
विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत मुरु झाला.
4. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.
History class 9 chapter 7 solution | 9th history chapter 7 question answers
(३) पोखरण
अणुचाचणी
उत्तर:
1. शांतता व
स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरुन भारताने 18 मे 1974 रोजी
राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
2. पोखरण
चाचण्या अणुबॉम्ब स्फोटांच्या मालिका होत्या, ज्या भारत सरकारने मे 1998
मध्ये भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी श्रेणी येथे केल्या.
3. हे भारताने
केलेल्या अणुचाचण्यांचे दुसरे उदाहरण होते. या चाचण्यांचे उद्दिष्ट शांततामय
उद्देशांसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी परमाणु ऊर्जा वापरणे हा होता.
4. अणुऊर्जा
आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे
संचालक
डॉ.राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्वाचा वादा होता
(४)भास्कर-१
उपग्रह
उत्तर:
1. 1979 मध्ये
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींची निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य
व्हावे,
यासाठी इस्रोने तयार केलेला 'भास्कर-1'
हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून
पाठवला.
2. देशातील
पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा
अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पड़णारे होते.
3. या
तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती.
4. या
उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनॉग्राफी) मध्ये झाला.
विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा सातवा स्वाध्याय
३. पुढील
विधाने सकारण स्पष्ट करा.
(१)
पं.नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
उत्तर:
1.
अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रजान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी
विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती.
2. भारताचे
प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची
प्रगती साधायची होती म्हणून पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
(२)
भारतानेअणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
उत्तर:
1. शांतता व
स्वयंपूर्णतेसाठी अणुऊ्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी
राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
2. भारताने हा
निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्रसज्जता आणि पाकिस्तानची
च नच्या
मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती.
(३) अमेरिकेने
भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
उत्तर:
1. 11 मे 1998
रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी
केली.
2. या दिवशी
तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.
3.
प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 'भारताकडून
अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही' अशी ग्वाही दिली.
4. मात्र
कोणत्याही देशाने अशी चाचणी केल्यास अमेरिका विरोधात्मक होता आणि त्यानुसार त्याने
भारतावर आर्थिक निर्बंध लादून प्रत्युत्तर दिले.
४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) तुमच्या
वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो?
उत्तर:
1. मी इंटरनेट
द्वारे जगभरातील माहिती आणि डेटा ऍक्सेस करू शकतो. हे उपग्रह द्वारे जगभरात
इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यामुळे शक्य आहे.
2. मी इतर
लोकांशी ईमेल, सोशल मीडिया आणि व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद
साधू शकतो. हे उपग्रह द्वारे जगभरात दळणवळण शक्य झाल्यामुळे शक्य आहे.
3. मी जीपीएस
तंत्रजानाचा वापर करून माझे स्थान निश्चित करु शकतो आणि मार्गदर्शन मिळवू शकतो. हे
उपग्रह द्वारे जीपीएस तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे शक्य आहे.
4. मी
उपग्रहाद्वारे हवामानाचे चित्रण आणि डेटा गोळा करून अचूक हवामान अंदाज मिळवू शकतो.
5. मी
उपग्रहांद्वारे जगभरातील विविध विषयांवरील माहिती आणि शैक्षणिक साहित्य मिळवू
शकतो.
(२)
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते?
उत्तर:
1. भारत
सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (DRDO) स्थापना झाली.
2. संरक्षणाची
साधने,
उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतींत देशाला स्वावलंबी बनवणे हा य
संस्थेचा उद्देश होता.
3. 1983 नंतर
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे
विकसित केली.
4.
क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. यांना डॉ. कलाम
यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच 'मिसाईल मॅन' असे संबोधले जाते.
(३) संगणकीकृत
रेल्वे आरक्षण कसे करता येते?
उत्तर:
1. IRCTC च्या वेबसाइटवर जा आणि लॉगिन करा.
2. प्रवासाची
तारीख,
स्थानके, प्रवासी वर्ग आणि इतर आवश्यक माहिती
निवडा.
3. उपलब्ध
तिकिटांची यादी पहा आणि तुमच्या आवडीनुसार तिकिट निवडा.
4. पेमेंट
गेटवेद्वारे तिकिटाचे पैसे भरा.
5. तिकिटाची
पुष्टी करा, डाउनलोड कटा आणि प्रिंट घ्या.
(४) कोकण
रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
उत्तर:
1. 1998 मध्ये
कोकण रेल्वे मुरु झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या
चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत.
2. या
मार्गावर एकूण 92 बोगदे आहेत. या मार्गावरील करबुडे येथील 6.5 किमी लांबीचा बोगदा
सर्वात मोठा बोगदा आहे.
3. 179 मोठे
आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील शरावती नदीवरील 2065.8
मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे.
4.
रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे.
5. दरडी कोसळणाय्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
********

