महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 6 question answers
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) इ.स.१९९२
मध्ये ....... या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
(अ)
महाराष्ट्र
(ब) गुजरात
(क) आंध्र
प्रदेश
(ड) उत्तराखंड
उत्तर: इ.स.१९९२
मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात
आली.
Mahila V Anya Durbal Ghatkanche Sakshamikran Swadhyay Iyatta Navavi | Class 9 history questions and answers
(२) भारत
सरकारने १९७५ मध्ये ........ यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
(अ)
डॉ.फुलरेणू गुहा
(ब) उमा भारती
(क) वसुंधरा
राजे
(ड) प्रमिला
दंडवते
उत्तर: भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ.फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
History class 9 chapter 6 solution | 9th history chapter 6 question answers
२. पुढीलपैकी
चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) सौदामिनी
राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती
(२) विद्या
बाळ - नारी समता मंच
(३) प्रमिला
दंडवते - महिला दक्षता समिती
(४) ज्योती
म्हापसेकर - महिला आयोग
उत्तर: ज्योती
म्हापसेकर - महिला आयोग
३. पुढील
विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्त्री
मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
उत्तर: स्त्री
मुक्ती चळवळीस सुरुवात झाली कारण ,
1. पूर्वापार चालत आलेली बंधने, जोखडं झुगारून देऊन
स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा,
स्वप्नं पूर्ण कटायचा हक्क मिळावा.
2. स्त्रीकडे एक माणूस म्हणून तिच्याकंडे बघितले जावे .
3. पूर्वी स्त्रियांची परिस्थिती अत्यंत र्बिकट होती. ही परिस्थिती
बदलण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
(२) १९८४
मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला
उत्तर: १९८४
मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला कारण,
1. भारतात
हुंडा बंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा
मृत्यू',
'धुणे धुताना पाय घसरुन विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू' अशा बातम्या येत असत.
2. याच्या
खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते.
3. पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या.
यातून जागृती घडली.
4. यामुळे
1984 मध्ये 'हुंडाबंदी सुधारणा कायदा' अस्तित्वात
आला.
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण इयत्ता नववी स्वाध्याय | महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण प्रश्न उत्तरे
(३)
अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
उत्तर: अस्पृश्यतेच्या
रूढीवर कायद्याने बंदी आणली कारण,
1.
स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा
पुरस्कार केला.
2.
संविधानाच्या 17 व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य
वर्गाचा ममावेश अनुसूचित जातींमध्ये कारण्यात आला.
3. अनुसूचित
जातींचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा
विकास साधता
यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले.
4. त्याला
अनुसरुन अस्पृश्यतेच्या रुढीवर कायद्याने बंदी आणली.
इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता नववी इतिहास धडा सहावा स्वाध्याय
(४)
संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक
हक्क दिले आहेत.
उत्तर: संविधानाने
अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक
हक्क दिले आहेत कारण,
1. एखाद्या
समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदष्ट्या संख्येने कमी असलेल्या
व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्यांक म्हणतात.
2. आपल्या
देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात
सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत.
3. या
सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्टयपूर्ण भाषेचा विकास
करता यावा. म्हणून संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले
आहेत.
४. टीपा लिहा.
(१) चिपको
आंदोलन
उत्तर:
1. चिपको
आंदोलन हे 1973 मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जंगलांचे रक्षण करण्यासाठी सुरु
झालेले एक सामाजिक आंदोलन होते. यात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि "एक-एक
हाथ पकड़ो, एक-एक पेड़ घेरो" या रणनीतीचा वापर करुन
जंगलांचे रक्षण केले.
2. चंडीप्रसाद
भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांसारख्या पर्यावरणवादी नेत्यांनी या आंदोलनाला
सुरुवात केली.
3. महिलांनी प्रत्येकी एका झाडाला मिठी मारुन आणि एकमेकांचे हात धरुन मानवी साखळी तयार करुन झाडांचे रक्षण केले. या तंत्रामुळे झाडांचे रक्षण करण्यावर भर देण्यात आला, त्यामुळे या आंदोलनाला चिपको आंदोलन असे नाव मिळालं.
(२) मानव
अधिकार संरक्षण कायदा
उत्तर:
1) स्त्री आणि
पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये हा कायदा करण्यात आला.
2) यासाठी
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली.
3) त्याच
धर्तीवर काही राज्यांमध्ये 'राज्य मानवाधिकार आयोग' स्थापन झाले.
4) या
कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती,
स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने
प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली.
इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | Mahila V Anya Durbal Ghatkanche Sakshamikran swadhyay prashn uttare
५. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
स्त्रियांची
एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
उत्तर:
स्त्रियांची
एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते उदा.:
1.लाटणे मोर्चा (1972)- समाजवादी
नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन
दिवाळीत तेल, तूप, साखर, टवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. टॉकेल महाग झाले
होते.
चिपको
आंदोलन (1973)- चिपको आंदोलनात महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि झाडांच्या
व्यापारी तोडी रोखण्यासाठी एकमेकांचे हात धरुन त्यांना वेढा घालून ठेवले.
मद्यपानविरोधी
आंदोलन (1992)- आंध्र प्रदेशात महिलांनी दारुच्या वाढत्या समस्यविरुद्ध
आवाज उठवला आणि राज्य सरकारने त्यांना साथ दिली.
या क्षणांनी
मोठी यशस्वीता मिळवली आणि महिलांचे एकसंघ बल समाजात सकारात्मक बदल घडवू शकते हे
पुन्हा अधोरेखित केले.
***********
