इतिहास लेखन इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board
१.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
१)
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक……………हे होते.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
उत्तर:
१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर
कनिंगहॅम हे होते.
इयत्ता दहावी इतिहास दुसरा धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 2 Swadhyay | दहावी इतिहास पाठ 2 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
(२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ...............यांनी केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
उत्तर:
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर
यांनी केला.
(ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१)
हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
(२)
स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
(३) द
इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
(४)
ग्रँड डफ - वसाहतवादी इतिहास
उत्तर:
(३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
Maharashtra Board Class 10 History Notes Download.
२.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर:
1) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.
2) ब्रिटिशांनी लिहलेल्या भारताच्या पूर्वग्रहदुषित इतिहासाचा भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी तीव्र विरोध दर्शवला.
3) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.
4) त्यातूनच राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली.
(२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर:
(1)
ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने
इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
(2) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात, तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
(3)
तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र
रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात,
म्हणून
'बखर' हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे.
३.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१)
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर:
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात, त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे.
1) मार्क्सवादात
वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले
गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात.
2) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
3) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Itihas Lekhan Study Material
(२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर:
भाषाशास्त्र, व्युत्पात्तशास्त्र आणि
इतिहासलेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि.का.राजवाडे
यांचे इतिहासलेखनातील योगदान खालीलप्रमाणे
आहे:
1.
टाजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले.
2.
इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार राजवाडे यांनी मांडला.
3.
केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि
युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत
होते.
4. आपला
इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
5.
अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी इतिहासलेखन भारतीय परंपरा प्रश्नोत्तर
४.
(अ) पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
जेम्स मिल |
द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ |
‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ |
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे |
प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सलेव्हरी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
हू वेअर द शूद्राज |
(ब)
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:
५.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) प्राच्यवादी इतिहासलेखन
उत्तर:
1) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील
अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील
संस्कृती
आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा
अभ्यास करणाया युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात.
2) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास,
येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करुन इतिहासलेखन केलैं. या
लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात.
3) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
Itihas Lekhan bharatiy parampara swadhyay PDF Class 10 | History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Itihas Lekhan Study Material
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन
उत्तर:
1)
एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरु झाली. या पद्धतीत शिकून तयार
झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली.
2)आत्मजाणीव
निर्माण झांलेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
3) या
राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला
विरोध केला.
4)
त्यांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर लिखाण केले.
5) राष्ट्रवादी इतिहासलेखांमुळे ब्रिटिशविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली.
(३) वंचितांचा इतिहास
उत्तर:
1)
समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले,
अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात.
2)
मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा मुरु
झाली.
3)
इटालियन तत्त्वज अटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी
असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
4) भारतात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो.
5)लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
6) वंचितांच्या इतिहासलेखनातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
*******
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.