इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पूर्ण करा.
(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ........... यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेनेदेकार्त (क) लिओपोल्डरांके
(ड) कार्ल मार्क्स
उत्तर:
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
Maharashtra Board Class 10 History Notes Download. | Itihas Lekhan Paschatya Parampara swadhyay PDF Class 10
(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ..........याने लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको (क) लुसिआँ फेबर
(ड) व्हॉल्टेअर
उत्तर:
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) जॉर्ज विल्हे मफ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी
अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हि रोडोटस – द हिस्टरिज्
(४) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन
द मेथड
उत्तर:
(४) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन
द मेथड
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) द्वंद्व वाद
उत्तर:
१) जॉर्ज
हेगेल यांनी द्वंद्व वाद या सिद्धांताची मांडणी केली.
२) एखाद्या
घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य
तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे
म्हणतात.
२)
दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलट-सुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील
सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे
नीट आकलन होत नाही.
३)
थोडक्यात दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात
(२) ॲनल्स प्रणाली
उत्तर:
1) 'ॲनल्स' म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे; असे मानणारी ॲनल्स प्रणाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये उदयाला आली.
2) इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे,
महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी,
युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार,
तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची
साधने,
सामाजिक
विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले
जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच अॅनल्स प्रणाली असे म्हणतात.
इयत्ता दहावी इतिहास पहिला धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 1 Swadhyay
दहावी इतिहास पाठ 1 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
उत्तर:
१)
इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमॉं-द-बोव्हा या फ्रेंच
विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
२)
त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
३) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टीकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
४)
सीमॉ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत
विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
उत्तर:
१)
मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची
ठरवली.
२)
त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे
पूरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे
स्पष्टीकरण देण्याचा पूरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
३)
फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व'
असे म्हटले आहे.
Itihas Lekhan Paschatya Parampara in Marathi PDF | दहावी इतिहास स्वाध्याय प्रश्नोत्तर
इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय | 10th History Chapter 1 Question Answer
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
युरोपातील
महत्त्वाचे विचारवंत
उत्तर:
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
उत्तर:
जर्मनीच्या
कार्ल मार्क्स यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला.
(१) त्यांच्या
मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
(२)
मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर
माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
(३)
समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन
साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष
सुरू होतो.
(४)
उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो.
(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर:
आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत :
(१)
या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मोंडणी करण्यापासून होते.
(२)
हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजसंघटकांनी विशिष्ट कालावधीत
केलेल्या कृतींसंबंधी असतात, त्या कृर्तीचा संबंध दैवी घटनांशी
वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.
(३)
या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासाई पुराव्यांचा आधार असल्याने
त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
(४)
मानवाने केलेल्या भूतकालीन कृर्तीच्या आधारे इतिहासात मानवजानीच्या वाटचालीचा वेध
घेतला जातो.
History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Itihas Lekhan Study Material
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी इतिहास पाश्चात्य परंपरा प्रश्नोत्तर
(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
उत्तर:
(१)
स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची
पूनर्रचना होय.
(२)
इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर
पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा यांनी मांडली.
(३)
त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
(४)
स्त्रियांशी संबंधित नोकन्या, रोजगार, ट्रेड
युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री
संस्था ह्या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले.
(५) १९९०
नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर
भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन'
असे म्हणतात.
(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
उत्तर:
लिओपॉल्ड
व्हॉन राके यानी इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या
मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते-
(१)
इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे,
(२)
इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून
शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यत पोहोचता
येते.
(३)
इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी.
(४)
जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.
********
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.