Iyatta 9vi Vishay Vishwakosh swadhyay | इयत्ता ९वी मराठी विश्वकोश स्वाध्याय
प्र. १. टीप लिहा.
(१) विश्वकोशाचा उपयोग-
उत्तर:
भाषेचा व शिक्षणाचा प्रसार
खूप झपाट्याने झाला. औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या.
विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील
माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्यावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली.
मनव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्राहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात
समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोषाचा
उपयोग होतो.
(२) विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया-
उत्तर:
विज्ञान व तंत्रज्ञान व इतर सर्व विषयांचे
अद्ययावत ज्ञान संकलित करण्यासठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ञांच्या
समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले मुख्य, मध्यम व
लहान नोंदी. त्यांतील मुद्यांची टाचणे काढण्यात आली. नोंदीच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये
तशा सुस्चना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदीच्या त्यांच्या प्रकारांनुसार याद्या तयार
करण्यात आल्या. आकारविल्ह्ह्यानुसार या याद्या क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे
१९७६ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड
प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत.
इयत्ता नववी मराठी गाईड pdf | विश्वकोश मराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय विश्वकोश | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
प्र. २. 'शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते', याविषयी
तुमचे मत लिहा.
उत्तर:
विविध मासिकांमधून, वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या
द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने-नवे शब्द कळतात.
आपली शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा
माहित होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दाचे भिन्न अर्थ,
प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो. उदा. जंगल या शब्दाला
– अरण्य, रान, वन, कानन, विपिन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो.
शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो.
कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा रुंदावल्या व फैलावल्या याची जाण शब्दकोड्यांमुळेच
होते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.
प्र. ३. विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तर:
आपल्याला माहित नसलेल्या विषयाची सांगोपांग
माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्याला मदतनीस होतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषयसाखळीमुळे त्या विषयाचे
सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमविण्याचे विश्वकोश हे एक उत्तम
साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितीज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना
मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी
भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात.
yatta 9vi Vishay Vishwakosh swadhyay | 9th standard Marathi digest pdf Vishwakosh swadhyay | 9th class marathi question answer pdf download 2026
प्र. ४. केशभूषेचे उद्देश
सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
उत्तर:
मोकळे केस इतरांना दिसू नयेत, म्हणून पुरातन
स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा.
लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण
भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढविणे
हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे, हा केशभूषेचा सामाजिक उद्देश
ठरतो. केशभूषेत केस कापणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव
होतो.
प्र. ५. विश्वकोशाचा उपयोग
तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
उत्तर:
मराठी विषयातील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी
मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान ,
क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य
मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची व्युतपत्ती, तिचा इतिहास,
वेदांपासून ते अद्ययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे
सहज सोपे झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे.
मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेक रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा
उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत
होईल.
भाषा
सौंदर्य
विश्वकोश
अकारविल्हयांनुसार (अनुज्ञेय) पाहावा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णभाला
(आता अॅ व ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्था योग्य
वर्णांची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण
आकलनही
असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी,
व्यंजन, महाप्राण, मृदू
व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).
खालील कोडे सोडवा व त्याच्या
शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल
भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप
जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्चान्न.
पोळ्या,
मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
फु |
क |
ट |
x |
मा |
ठ |
रे |
ता |
ड |
x |
गु |
ढ |
पु |
र |
ण |
वरील कोडे वैशिष्ट्यपूर्णआहे. त्याचे उत्तर तुम्हांला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्यव गंमत लक्षात येईल. अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घ्याव अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वत: प्रयत्न करा.
********