१४. काळे केस स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Kale Kes swadhyay question answer

Swadhyay class 10 marathi Kale Kes question answer 10th marthi Kale काळे केस या धड्याचे प्रश्न उत्तर
Admin

Iyatta Dahavi Kale Kes Marathi  Swadhyay | काळे केस स्वाध्याय इयत्ता दहावी




प्र. (१)  आकृत्या पूर्णकरा.


घेणाऱ्या गोष्टी

उत्तर:

1)नव्या नव्या कल्पना

2) अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द

 

 

तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये

उत्तर:


1)   भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्याआडव्या रांगा समोर दिसतात.

2)   पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.

3)   कधी कधी पाऊस रिमझिमतो.

4)   कधी कधी पाऊस धोधो कोसळतो.



Swadhyay class 10 marathi Kale Kes question answer                            10th marthi Kale काळे केस या धड्याचे प्रश्न उत्तर

 

प्र. (२)    कारणेशोधा.

 

(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण..........

उत्तर:

लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही ; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

 

(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण..........

उत्तर:

लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता ; कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि त्याला लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

 

इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | दहावी मराठी काळे केस स्वाध्याय | काळे केस स्वाध्याय १०वी



प्र.  (३)    खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

 

(अ) केसभर विषयांतर

उत्तर: अगदी थोडेसुद्धा विषयांतर

 

(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण

उत्तर: केस पांढरे होणे.

 

(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड

उत्तर: प्रकाशामुळे चमकणारे झाड

 

 

प्र.  (४)   खालील शब्दसमूहांचेअर्थ लिहून तक्ता पूर्णकरा.

 

वाक्प्रचार अर्थ


(अ) गुडघे टेकणे.

उत्तर: शरण येणे.

 

(आ) खनपटीला बसणे.

उत्तर: सारखे विचारत राहणे.

 

(इ) तगादा लावणे.

उत्तर: पुन्हा पुन्हा विचारणे

 

(ई) निकाल लावणे.

उत्तर: संपवणे

 

(उ) पिच्छा पुरवणे.

उत्तर: एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे.

 

 

प्र.  (५) खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

1) निष्णात

उत्तर: रामू कबड्डी खेळ्यात निष्णात आहे.


2)   झिलई

उत्तर: झिलई दिली कि जुनी भांडी सुद्धा नवीन दिसतात.


3)नित्यनेम

उत्तर: मी नित्यनेमाने अभ्यास करते.

 

4) लहरी

उत्तर: लहान मुले लहरी असतात.

 

५) तगादा

उत्तर: रामूने आईकडे सायकल घेऊन देण्यासाठी तगादा लावला.

 

 

Related Posts

प्र. (६) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

 

(अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात.

उत्तर: उपमा अलंकार


(आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.

उत्तर: चेतनागुणोक्ती अलंकार

 

(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.

उत्तर: उपमा अलंकार

 


प्र. (७) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना  करण्याचा प्रयत्न करा.

 

(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात.

उत्तर: सुख x दु:ख

 

(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.

उत्तर: गर्भित x उघड

 

(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.

उत्तर: स्तुती x निंदेची

 

(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

उत्तर: प्रश्न x उत्तर

 

परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना

(१)परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.

(२) खेळात हार-जीत आलीच.

(३) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

 


प्र.  (८) विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर:


(अ) अवरोह x आरोह

(आ) अल्पायुषी x दीर्घायुषी

(इ) सजातीय x विजातीय

(ई) दुमत x एकमत

(उ) नापीक x सुपीक

 

प्र. (९) स्वमत.

 

(अ) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर:

खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्यांच्या केसांच्या रंगाबद्दल थट्टा करत चर्चा केली. या चर्चेमुळे माझ्या मनात एक ठाम मत निर्माण झाले आहे की, लोक आपले वय लपवण्यासाठी आणि आपण अजून म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दिवसागणिक आपले वय वाढतच जाणार आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, हे सत्य आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने आपल्या आयुष्यात एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच व्हायला हवी. लहानपणापासूनच आपली आवडनिवड बारकाईने तपासली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपली खरी क्षमता कळेल.

आपली कुवत काय आहे, कोणते कार्य आपण झेपवू शकतो आणि कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो याचा शोध घेऊन त्यानुसार ध्येय निश्चित केले पाहिजे. असे केल्यास त्या क्षेत्रात आपले नाव कमावणे शक्य होईल. तेव्हा वय वाढण्याचे दुःख होणार नाही; उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला सदैव तरुण समजतील.


Kale Kes  swadhyay pdf download | Kale Kes swadhyay pdf | Class 10 marathi Kale Kes question answer


(आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जात असत. तिथे गेल्यावर लहानपणी वर्गात असलेले, खेळले-बागडलेले, जुन्या परिचयाचे लोक त्यांना भेटत. अशी जुनी माणसे भेटली की एकमेकांची विचारपूस होत असे, आणि कोण काय करतो याची माहिती दिली-घेतली जायची.

लेखकांकडे एक आकर्षक बाब होती – त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे त्यांच्या केसांच्या काळेपणावरून प्रश्न विचारत. यात वय जाणून घेण्यापेक्षा वेगळाच हेतू असे. कारण बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात, पण त्यांचा हा प्रयत्न बहुतेक वेळा अपयशी ठरतो, आणि त्यामुळे त्यांचे रूप अगदी केविलवाणे दिसते.

लेखकांच्या एका स्नेह्याची अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे लेखकांनी केस काळे ठेवण्यासाठी कोणती युक्ती वापरली असेल, याबद्दल त्या गृहस्थाला प्रचंड कुतूहल होते. ते कुतूहल शमविण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला येऊन बसला. लेखकांनी थट्टामस्करी करत त्याची बोळवण केली.

 

(इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

उत्तर:

मला माझा अभ्यास रात्री करायला फार आवडतो. त्या वेळी संपूर्ण जग शांत आणि निवांत झालेले असते. कुठेही आवाज नसतो—फक्त मी आणि माझा अभ्यास. त्यामुळे कितीही उशिरापर्यंत जागरण करावे लागले तरी मला त्याचा कधीच त्रास होत नाही.

माझी एक मैत्रीण आहे, जिला सकाळी लवकर उठून, आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. ती सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सलग आणि शांतपणे अभ्यास करू शकते.

आमच्या एका मित्राला मात्र संध्याकाळी जोरदार खेळून आल्यावर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करणे सोयीचे वाटते, कारण त्या वेळी सकाळी शिकवलेले धडे मनात ताजेतवाने असतात. विशेष म्हणजे, प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार अभ्यास उत्तम होतो. म्हणूनच विचार करण्याची सवय आणि अभ्यासाची वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते, हेच खरे.

10th std marathi digest | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


भाषाभ्यास

 

तत्पुरुष समास


खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

उत्तर:

 

सामासिक शब्द

विग्रह

विभक्ती

(अ) सभागृह

सभेसाठी गृह

चतुर्थी

(आ) कलात्कुशल

कलेत कुशल

सप्तमी

(इ) ग्रंथालय

ग्रंथांचे आलय

षष्ठी

(ई) कथासाध्य

कथाने साध्य

तृतीया

(उ) रोगमुक्त

रोगापासून मुक्त

पंचमी

 

विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये-

 

(अ) समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.

(आ) विग्रह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते.

ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदेजोडली जातात, त्यास ‘विभक्ती तत्पुरुष समास’ म्हणतात.

 

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा.


(अ) आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.

उत्तर: सूर्यप्रकाश – सूर्याचा प्रकाश

 

(आ) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.

उत्तर: देशार्पण – देशाला अर्पण

 

(इ) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

उत्तर: ऋणमुक्त – ऋणापासून मुक्त

 

(ई) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत

उत्तर: तोंडपाठ – तोंडाने पाठ

 

********

Post a Comment