११. गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी | Goshta Arunimachi Swadhyay Iyatta Dahavi

Goshta Arunimachi question answer 10th marthi Goshta Arunimachi swadhyay Class 10 marathi Goshta Arunimachi question answer गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय
Admin

Goshta Arunimachi swadhyay | दहावी मराठी गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय



प्र. (१)   आकृती पूर्ण करा.


अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती

उत्तर:


1)   फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.

2)   खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

 

११. गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी मराठी |  Goshta Arunimachi Swadhyay Iyatta Dahavi

प्र.(२) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.


(अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.

उत्तर: वडीलधारया व्यक्तीचा आदर


(आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

उत्तर: धाडसी वृत्ती


(इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.

उत्तर:ध्येयवादी


(उ) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.

उत्तर: व्यवहारीपणा

 

प्र.(३) कोण ते लिहा.


(अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला-

उत्तर: बाचेन्द्र पाल


(आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर-

उत्तर: स्वतःच


(इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे-

उत्तर: भाईसाब


(ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन-

उत्तर:अरुणिमा


Related Posts


प्र.(४) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

उत्तर:

1.   ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.

2.   मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.

3.   आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.

4.   मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.

 

प्र.(५) अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

 

(अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.

उत्तर:

समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.


Class 10 marathi Goshta Arunimachi question answer | 10th std marathi digest
इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download | दहावी मराठी गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय


(आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.

उत्तर:

अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.


प्र.(६) पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

उत्तर:

१)    पराकोटीचे धैर्य

२)   अमाप सहनशक्ती असणारी

३)   जबरदस्त आत्मविश्वास असलेली

४) अन्यायाविरुद्ध लढणारी

५)  ध्येयवादी

६)   जिद्दी

 

प्र.(७) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.

 

(१) नॅशनल

उत्तर: राष्ट्रीय


2) स्पॉन्सरशिप

उत्तर: प्रायोजकत्व


3) डेस्टिनी

उत्तर: नियती


(४) कॅम्प

उत्तर: छावणी


(५) डिस्चार्ज

उत्तर: मोकळीक


(६) हॉस्पिटल

उत्तर: दवाखाना


इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | गोष्ट अरुणिमाची या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी


प्र.(८) पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.


(१) Now or never!

उत्तर : आत्ता नाही तर कधीच नाही !


(२) Fortune favours the braves

उत्तर: शूर माणसाला नशीब नेहमी साथ देत.

 

प्र.(९)   ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचेखडतर अनुभव लिहा.

उत्तर:

(अ) धोकादायक पर्वत चढणे.

(आ) मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे.

(इ) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.

(ई) अरुणिमाची अवस्था पाहून शेरपाचा निश्चय डळमळायचा.

 

प्र.(१०)  खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थन बदलता वाक्ये पुन्हा लिहा.


(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.

उत्तर: प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही.


(आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

उत्तर: सूर्यास्ताचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.


(इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.

उत्तर: खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर नसावीत.


(ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

उत्तर : प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.



प्र.(११)  खालील वाक्यांतील क्रियापदेओळखा.


(अ) सायरा आज खूप खूश होती.

उत्तर: होती.


(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

उत्तर: टाकला


(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.

उत्तर: आवडले


(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.

उत्तर: सुचली.


प्र.(१२)  खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

(खालील तक्ता पाहण्पायासाठी  मोबाईल आडवा करा.) 


शब्द

मूळ शब्द

लिंग

वचन

सामान्य रूप

विभक्ति प्रत्यय

विभक्ति

कामपत्राचे

कामपत्र

नपुंसकलिंग

अनेकवचन

कामपत्र

चे

षष्ठी

गावात

गाव

पुल्लिंग

एकवचन

गाव

सप्तमी

प्रसार-माध्यमांनी

प्रसार-माध्यम

नपुंसकलिंग

अनेकवचन

प्रसार-माध्यम

नी

तृतीया

गिर्यारोहणाने

गिर्यारोहण

नपुंसकलिंग

एकवचन

गिर्यारोहण

ने

तृतीया



Goshta Arunimachi swadhyay pdf download | Goshta Arunimachi swadhyay pdf | Swadhyay class 10 marathi | Goshta Arunimachi question answer


प्र.(१३)  स्वमत.

 

(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला  समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:

आपले ध्येय साध्य करताना केलेले प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नव्हे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एडिसन. विजेचा दिवा शोधण्यासाठी एडिसन यांनी हजाराहून अधिक प्रयोग केले. शेवटी त्यांना यश मिळाले. जर विचार केला तर यशस्वी प्रयोगाच्या आधीचे ते हजारो प्रयत्न अपयशी ठरले असे म्हणता येईल; परंतु ते म्हणणे चुकीचे ठरेल. कारण त्या प्रत्येक प्रयोगातून एडिसन यांना नवे ज्ञान, मौल्यवान अनुभव आणि पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळत गेले.

 


(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर:

कोणतीही व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते. कोणाला नृत्याची आवड असते, कोणाला गाण्याची, तर कोणाला इतरांना मदत करण्याची. प्रत्येकाने आपल्या आत दडलेला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधून त्याची जोपासना केली पाहिजे. त्या गुणाची योग्य निगा राखली, तर आपल्या हातून आपोआपच उल्लेखनीय कार्य घडते. अरुणिमाने हेच दाखवून दिले. अपंगत्वामुळे आयुष्यात काहीच करता येणार नाही असे वाटत असतानाही तिने हार मानली नाही. जिद्दीने स्वतःतील खास सामर्थ्य ओळखले, आपली क्षमता शोधली आणि अशक्य वाटणारे यश साध्य केले. खरं तर, प्रत्येकामध्ये अशीच एक "अरुणिमा" दडलेली असते; फक्त तिचा शोध घेणे आवश्यक आहे. हाच जीवनाचा खरा महामंत्र आहे.


(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.

उत्तर:

आपण दिवसभर सतत काही ना काही कृती करत असतो आणि प्रत्येक कृतीमागे एखादा हेतू दडलेला असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती घडूच शकत नाही. हाच हेतू म्हणजे आपले ध्येय होय. उदाहरणार्थ, ज्याचे सर्वोच्च ध्येय जास्तीत जास्त पैसे मिळवणे आहे, तो मनुष्य नेहमी पैशांबद्दलच विचार करेल आणि नकळत त्याला पैसे मिळवून देणाऱ्या कृतींकडे आकर्षित होईल. त्यामुळे आपल्या जीवनात ध्येयाला खूप महत्त्व आहे, कारण तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवते. म्हणून आपण आपले ध्येय नीट समजून घेतले पाहिजे आणि निश्चित केले पाहिजे. जसे पर्वतरांगांमध्ये एव्हरेस्ट हा सर्वांत उंच शिखर आहे, तसेच आपले ध्येय हे आयुष्यातील सर्वांत उंच, सर्वांत महत्त्वाचे शिखर असावे. हेच शिखर म्हणजे आपल्या मनातील एव्हरेस्ट होय. त्या एव्हरेस्टचा शोध घेऊन तो सर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.


*********

Post a Comment