८.उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Upyukt v Upadravi Sukshmajiv 9vi

9 class science question answer Upyukt v Upadravi Sukshmajiv | इयत्ता नववी सामान्य विज्ञान उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्य प्रश्न उत्तरे

 

प्रश्न 1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड  करून विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.

(मायकोटॉक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)

 

अ. यीस्ट ..............पद्धतीनेअलैगिक प्रजनन करते.

उत्तर : यीस्ट कलिकायन पद्धतीनेअलैगिक प्रजनन करते.

    यीस्ट अलैंगिक पद्धतीने प्रजनन करते. अनुकूल परिस्थिती मिळताच कलिकायन पद्धतीने यीस्ट भराभर वाढते.


आ. बुरशीजन्य विषारी रसायनांना.......... म्हणतात.

उत्तर : बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटॉक्झीन्स म्हणतात.

            कवकांच्या विविध प्रजाती हे विषारी द्रव्य तयार करतात. कवके विघटनाचे काम करताना अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेतात आणि त्याच वेळी मायकोटॉक्झीन्स अन्नपदार्थात मिसळतात.

 

इ. शिंबावर्गीय वनस्पती .............. मुळेजास्त  प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

उत्तर : शिंबावर्गीय वनस्पती रायझोबिअम मुळे जास्त  प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

            रायझोबिअम हा जीवाणू शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांत सहजीवी म्हणून राहतो. हवेतील आणि मातीतील नायट्रोजन वनस्पतीला त्याच स्वरूपात घेता येत नाही. मात्र हे जीवाणू नायट्रोजनच्या जैविक स्थिरीकरणाने त्याचे रूपांतर संयुगात करतात. त्यामुळे वनस्पतींना पोषक द्रव्ये मिळतात.


उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव प्रश्न उत्तरे  उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय  Swadhyay Upyukt v Upadravi Sukshmajiv Upyukt v Upadravi Sukshmajiv



प्रश्न 2. खालील पदार्थांमध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आढळतात. त्यांची नावे लिहा. दही, पाव, कडधान्यांच्या मुळांवरील गाठी, इडली, डोसा, खराब झालेली बटाट्याची भाजी.

उत्तर :

दही - लॅक्टोबॅसिलाय

पाव – यीस्ट

इडली - यीस्ट

डोसा – यीस्ट

कडधान्यांच्या मुळांवरील गाठी - रायझोबिअम

खराब झालेली बटाट्याची भाजी - क्लॉस्ट्रिडिअम

 

Swadhyay Upyukt v Upadravi Sukshmajiv | Upyukt v Upadravi Sukshmajiv Swadhyay Prashn Uttare



प्रश्न 3. वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे ?

 

अ. न्युमोनिया, घटसर्प, कांजिण्या, कॉलरा.

उत्तर : कॉलरा

कारण इतर सर्व श्वसनसंस्थेचे रोग आहेत.

 

आ. लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व  क्लॉस्ट्रीडिअम.

उत्तर : क्लॉस्ट्रीडिअम

कारण इतर सर्व उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत.


इ. मुळकूज, तांबेरा, रूबेला, मोझॅइक.

उत्तर : रूबेला

रूबेला हा मानवात होणारा विषाणूजन्य रोग आहे.  इतर सर्व वनस्पतीला होणारे रोग आहेत.

 

प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा.


अ. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

उत्तर :

1) उन्हाळ्याच्या दिवसांत जीवाणू आणि कवक यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आणि तापमान असते. अशा वेळी त्यांचे प्रजनन झपाट्याने होते.

2) खूप वेळ ठेवलेले वरण संसर्गाने यामुळेच खराब होते.

3) यात किण्वनाची प्रक्रिया होऊ लागते. त्यामुळे त्यात कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसतो.

 

आ. कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

उत्तर :

1) डांबराच्या गोळ्यांमध्ये नॅफ्थॅलिन हा रासायनिक पदार्थ असतो.

2) नॅफ्थॅलिन या पदार्थामुळे कपड्यांना कसर किंवा वाळवी लागत नाही. तसेच कवकांपासून देखील नॅफ्थॅलिन संरक्षण देतो.

3) कपडे चांगले राहावेत आणि टिकावेत यासाठी कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

 

प्रश्न 5. कवकजन्य रोगाच्या प्रसाराची माध्यमे व प्रतिबंधक  उपाय लिहा.

उत्तर :

1) नायटा, गजकर्ण, त्वचारोग यांसारख्या कवकजन्य रोगांचा प्रसार रोग्याच्या संपर्कात राहिले तर होतो.

2) रोग्याच्या वापरलेल्या वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरूण इत्यादीमधून कवकाचे तंतू किंवा बीजाणू संक्रमित झाले की रोगाचाही प्रसार होतो.

3) वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी योग्य नसणे या गोष्टींमुळे कवकजन्य रोग वेगाने पसरले जातात.

4)  त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

 

प्रश्न 6. जोड्या जुळवा.

 

‘अ’ समूह

‘ब’ समूह (उत्तर )

1. रायझोबिअम

आ.नायट्रोजन स्थिरीकरण

2. क्लॉस्ट्रिडीअम

अ. अन्न विषबाधा

3. पेनीसिलिअम

ई.प्रतिजैविक निर्मिती

4. यीस्ट

इ. बेकरी उत्पादने

 

प्रश्न 7. उत्तरे लिहा.

 

अ. लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या  जातात? का?

उत्तर : लहान मुलांची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना लसीकरण केले जाते.

1) सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात बी.सी.जी.म्हणजे क्षयरोग प्रतिबंधक लस दिली जाते.

2) नंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या महिन्यांत त्रिगुणी लस दिली जाते. त्यात घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात.

3) त्रिगुणी लसीच्या वेळी पोलिओचा डोस मुखावाटे देण्यात येतो.

4) नंतर नऊ महिन्यांच्या बाळाला MMR म्हणजे गालगुंड, गोवर आणि रूबेल्ला या रोगांच्या प्रतिबंधक लसी एकत्रितपणे देण्यात येतात.

5) शाळेत जाणाऱ्या मुलांना टायफॉइड, कॉलरा, हिपाटायटीस या लसी दिल्या जातात.



इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय | उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव प्रश्न उत्तरे | उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव स्वाध्याय


आ.लस कशी तयार केली जाते?

उत्तर :

१) पूर्वीच्या काळी रोगकारक जीवाणू माकड, घोडे अशा प्राण्यांत टोचले जात. या रोगजंतूच्या प्रतिबंधासाठी हे प्रयोगशाळेतील प्राणी काही प्रथिने तयार करीत. त्यांना प्रतिपिंडे म्हणतात.

२ ) असे पदार्थ त्या प्राण्यांच्या रक्तातून वेगळे करून त्यापासून लस बनवली जात असे.

३) आता जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या साहाय्याने ठराविक रोगाची लस बनवता येते. यासाठी त्या रोगाच्या जंतूंचा सखोल अभ्यास करण्यात येतो.

४) त्यातील जनुके आणि डीएनए यांची रचना समजून घेतली जाते.या माहितीच्या आधारे त्याच्यावर प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने तयार केली जातात. या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार करण्यात येते.

५) काही प्रकारच्या लसी या प्रत्यक्ष रोगजंतूंनीच बनवलेल्या असतात. हे रोगजंतू थोडे क्रियाहीन आणि सुप्त करण्यात येतात.

६) असे रोगजंतू लस म्हणून एखाद्याच्या अंगात टोचले की ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात.

७) जेव्हा याच माणसाला खरोखरच त्या रोगाची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात अगोदरच प्रतिकार करणारी रसायने तयार असतात.

 

इ. प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?

उत्तर :

१) रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय.

२) प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूंविरूद्ध कार्य करतात.

३)  प्रतिजैविकाने ठराविक प्रकारच्या जीवाणूंचा नाश होऊन रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व रोगनिवारण होते.

४)  काही प्रतिजैविके आदिजीवांना नष्ट करतात. काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.

५)  जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात.

 

ई. मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का ? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?

उत्तर :

१) मानवाप्रमाणे प्राण्यांना देखील प्रतिजैविके दिली जातात. त्यांना देखील रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांनाही जीवाणू, विषाणू आणि रोगकारक कवक यांच्यापासून रोग होतात. त्यांनाही काही प्रतिजैविके देण्यात येतात.

२) परंतु मानवाला बाधित करणारे जीवाणू वेगळे असल्याने त्यांची काही प्रतिजैविके वेगळी असतात. काही प्रतिजैविके मात्र मानवाच्या प्रतिजैविकां  समानच असतात.

 

उ. विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या  रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?

उत्तर :

१) काही प्रकारच्या लसी या प्रत्यक्ष रोगजंतूंनीच बनवलेल्या असतात. हे रोगजंतू थोडे क्रियाहीन आणि सुप्त करण्यात येतात.

२) असे रोगजंतू लस म्हणून एखाद्याच्या अंगावर टोचले की ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात.

३) जेव्हा याच माणसाला खरोखरच त्या रोगाची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात अगोदरच प्रतिकार करणारी रसायने तयार असतात.

४)  याचसाठी विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे जतन करावे लागतात.

 

प्रश्न 8. थोडक्यात उत्तरे लिहा.

 

अ. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?

उत्तर :

१) जी प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध एकाच वेळी उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.

२) ज्या वेळी रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा अशा प्रतिजैविकांचा वापर करून रोग बरा करण्याचा प्रयत्न केला जातो.

३) उदा. अॅम्पीसिलीन, अॅमॉक्झीसीलीन, टेट्रासायक्लीन इत्यादी.

                    

आ. किण्वन म्हणजे काय ?

उत्तर :

ज्या प्रक्रियेत स्वतःचे पोषण करताना पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये करतात त्या प्रक्रियेला किण्वन म्हणतात.

 

इ. व्याख्या लिहा. 'प्रतिजैविक'

उत्तर :

सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत.


********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.