७. परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Parisansthetil Urjapravah 9vi


9
class science question answer Parisansthetil Urjapravah | इयत्ता नववी सामान्य विज्ञान परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्रश्न १.कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :



जैव-भू- रासायनिक चक्र

जैविक प्रक्रिया

अजैविक प्रक्रिया

1.कार्बन चक्र

प्रकाश-संश्लेषण आणि श्वसन विघटकांकडून

ज्वलन, पाण्यात शोषण

2.ऑक्सिजन चक्र

प्रकाश-संश्लेषण आणि श्वसन विघटकांकडून अपघटन

ज्वलन, ओझोन निर्मिती, ऑक्साइडस् निर्मिती

3.नायट्रोजन चक्र

विघटकांकडून अपघटन, जैविक स्थिरीकरण (जीवाणू) अमोनीकरण (जीवाणू)

औद्योगिक स्थिरीकरण (कारखाने), भौतिक स्थिरीकरण (विजा), नायट्रीकरण, विनायट्रीकरण



स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान | परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह इयत्ता नववी स्वाध्याय pdf



प्रश्न 2. खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा  व तुमच्या विधानाचे समर्थन करा.


अ. अन्नसाखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्‌वितीय पोषण पातळी असते.

उत्तर :

प्रथम पोषण पातळी ही स्वयंपोषी उत्पादक वनस्पतींची असते. शाकाहारी प्राणी त्यांच्यापासून पोषणद्रव्ये घेतात. या प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, त्यामुळे या मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही तृतीय पोषण पातळी असते.



आ. पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.

उत्तर :

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह ही एकेरी वाहतूक नसते.

परिसंस्थेतील ऊर्जेची एकेरी वाहतूक गणली जाते. परिसंस्थेतील निरनिराळ्या पोषण पातळ्यांमधून ऊर्जाप्रवाह एकाच दिशेने होत असतो. सूर्याच्या ऊर्जेपासून ते थेट सर्वोच्च भक्षकांपर्यंत ऊर्जा संक्रमित होत असताना उलट्या दिशेने कधीच येत नाही. पोषणद्रव्य मात्र उत्पादकाकडून भक्षकाकडे जातात. भक्षकापासून विघटकांच्या साहाय्याने पुन्हा पोषणद्रव्ये उत्पादकांना मिळू शकतात.

 

इ. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात.

उत्तर :

परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाहीत. (परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात).

सूर्याच्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश-संश्लेषण करून वनस्पती या स्वयंपोषी उत्पादक असतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाहीत.

 

प्रश्न 3. कारणे लिहा.


अ. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.

उत्तर :

1) ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत सूर्य आहे.

2) सर्वच परिसंस्थांसाठी उत्पादक हरित वनस्पती सौर ऊर्जा काही प्रमाणात अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते.

3) विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते.

4) मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे उलट्या दिशेने परत जात नाही. म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.

 

आ. विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.

उत्तर :

1) निसर्गातील विविध जैव-भू-रासायनिक चक्रे अव्याहतपणे संतुलित स्वरूपात चालू असतात.

2) त्यामुळे सेंद्रिय पदार्थांपासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात परत येतात.

3) मातीतले जीवाणू आणि इतर विघटक या चक्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.

4) जर ही जैव-भू-रासायनिक चक्रे असंतुलित झाली तर त्याचे परिणाम परिसंस्थेचे असंतुलन घडवून आणतील. परिसंस्था नष्ट होईल.

म्हणून विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.

 

इ. पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय  स्वरूपाचा असतो.

उत्तर :

1) उत्पादक विविध पोषणद्रव्ये मातीतून मिळवून प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्माण करतात. या प्रक्रियेत ते असेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय कार्बनी पदार्थांत रूपांतर करतात.

2) भक्षक हे अन्न खातात. भक्षकांच्या विविध पोषण पातळींतून अन्नरूप ऊर्जा संक्रमित केली जाते.

3) ज्या वेळी उत्पादक किंवा भक्षक मृत पावतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील कार्बनी सेंद्रिय पदार्थ पुन्हा विघटक सजीवांकडून मातीत मिसळले जातात.

4) तसेच प्राण्यांच्या मल-मूत्र इत्यादींचे देखील विघटन करून त्यातून पोषणद्रव्ये निर्माण करण्याचे कार्य विघटक करतात.

अशा रीतीने पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.

 

इ. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात.

उत्तर :

1) परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाहीत. (परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात).

2) सूर्याच्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश-संश्लेषण करून वनस्पती या स्वयंपोषी उत्पादक असतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणत नाहीत.


Swadhyay Parisansthetil Urjapravah | Parisansthetil Urjapravah Swadhyay Prashn Uttare

प्रश्न 4. आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.


अ. कार्बन चक्र

उत्तर :


इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय  परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह प्रश्न उत्तरे

1) कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय.

2) अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते.

3) हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बनडाय ऑक्साइडचे कर्बोदकात रूपांतर करतात, तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात.

4) शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो.

4) शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या विघटकांकडून अपघटन होऊन कार्बनडाय ऑक्साइड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो.

5) अशाप्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवांकडे जातो.


 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह प्रश्न उत्तरे | परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय

आ. नायट्रोजन चक्र

उत्तर :

Swadhyay Parisansthetil Urjapravah

1) निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांतून नायट्रोजन वायूचे वेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय.

2) सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्र

3) थिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

4) इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही.

5) बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीत नायट्रोजन वापरता येत नाही.

नायट्रोजन चक्रातील महत्त्वाच्या प्रक्रिया

1) नायट्रोजनचे स्थिरीकरण- नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट व नायट्राइट यांमध्ये करणे.

2) अमोनीकरण - सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे.

3) नायट्रीकरण - अमोनिआचे नाइट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे.

4) विनायट्रीकरण - नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे.



इ. ऑक्सिजन चक

उत्तर :

७. परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Parisansthetil Urjapravah 9vi


1) जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय.

2) या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते. तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो.

3) ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मुलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो.

4) रेण्वीय ऑक्सिजन, पाणी, कार्बन डायऑक्साइड व असेंद्रिय संयुगे अशा स्वरुपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.

5) प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो.

 

5. विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल  राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?

उत्तर :

1) वनस्पती, वृक्षवल्ली अशा सर्व उत्पादक स्तरांचे संवर्धन करणे. जंगलतोड थांबवणे. झाडांची, वनस्पतींची नासधूस झाल्यास परिसंस्थेची उत्पादकता कमी होईल म्हणून वनस्पर्तीची काळजी घेणे.

2) परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अन्नसाखळ्या टिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना त्रास देणे व त्यांच्या अवयवांचा चोरट्या पद्धतीने व्यापार करणे हे पूर्णपणे बंद करणे.

3) कोणत्याही सबबीखाली सर्वोच्च भक्षक मारणे अयोग्य आहे. अशा शिकारीमुळे प्राणी-जाती अस्तंगत होतील. तसेच शाकाहारी प्राण्यांच्या नैसर्गिक लोकसंख्येवर बंधन राहणार नाही. सर्वोच्च भक्षकांचा संहार केल्यास निसर्गातल्या अन्नसाखळ्यांतील आंतरक्रिया योग्य पद्धतीने चालणार नाहीत.

4) प्रदुषण, जंगलतोड, अतिप्रमाणातील बांधकामे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर अशा मानवनिर्मित घडामोर्डींना तात्काळ अटकाव घालणे.

 

 

6. अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध  सविस्तर स्पष्ट करा.

उत्तर :

1) प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात.

2) प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा चार वा पाचहून अधिक कड्या असतात. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्याचे अन्नजाळे तयार होते.

3) उदा. किडे (प्राथमिक भक्षक), गवत (उत्पादक) कुरतडतात. बेडूक (द्वितिय भक्षक) किडे खातो. साप बेडकाला खातो. ही सरळ अन्नसाखळी आहे. किडे चिमणी देखील खाते. चिमणीला घुबड मारतो. घुबड सापही मारून खातो. सर्वोच्च भक्षक ससाणा किंवा घार चिमणीला, बेडकाला, सापाला कोणालाही अन्नासाठी मारतो. अशा रीतीने छोट्या अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या जाऊन अन्नजाळे तयार होते.

 


7. जैव-भू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून  महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर :


Swadhyay Parisansthetil Urjapravah


1) जैव व-भू-रासायनिक चक्र : जैव म्हणजेच सजीव आणि भू म्हणजे जमीन. जैव-भू-रासायनिक चक्र म्हणजेच पोषणद्रव्यांचा सजीवांकडून माती, पाणी, हवा अशा ठिकाणी होणारा व तेथून पुन्हा सजीवांकडे येणारा चक्रीय प्रवाह. जैव-भू-रासायनिक चक्रांचे दोन प्रकार आहेत.

1) वायुचक्र 2) अवसादन किंवा भू-चक्र.

2) प्रत्येक परिसंस्थेत सौर ऊर्जा वापरून उत्पादक अन्न तयार करतात. त्यावेळी ते जमीन, माती, हवा, पाणी अशा माध्यमांतून पोषणद्रव्ये शोषून घेतात.

3) वायुचक्रात अजैविक वायुरूप पोषकद्रव्ये हवेत असतात तर अवसादन चक्रात ती जमिनीत असतात. या उत्पादकांना अन्न म्हणून खाणारे भक्षक ही पोषण द्रव्ये स्वतःच्या शरीरात प्रवाहित करतात.

 

8. खालील प्रश्नांची उत्तरे सोदाहरण स्पष्ट करा.


अ. वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो?

उत्तर :

वनस्पतींमध्ये खूप जास्त ऊर्जा असते. सौर ऊर्जेचे रूपांतरण करून वनस्पती ही ऊर्जा कर्बोदके आणि प्रथिने या स्वरूपात साठवतात. यांतील काही ऊर्जा प्राथमिक भक्षक, शाकाहारी प्राण्यांकडे संक्रमित होते. त्यावेळी त्या ऊर्जेचे प्रमाण कमी होते. प्राथमिक भक्षकाकडून द्वितीय आणि नंतर तृतीय भक्षकाकडे ऊर्जेचे संक्रमण होत असताना ऊर्जा प्रमाण कमी कमी होत जाते. ही ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पातळीत जाताना उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. सर्वोच्च भक्षकाकडे सर्वांत कमी ऊर्जा पोहोचते.

 

आ. परिसंस्थेमधीलऊर्जाप्रवाहआणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?

उत्तर :

1) परिसंस्थेत ऊर्जा प्रवाहाची वाहतूक ही एकेरी असते, तर पोषक द्रव्यांची वाहतूक ही चक्राकार असते.

2) परिसंस्थेत सौर ऊर्जा, उत्पादक ते विविध भक्षक पातळीतून पुढे पुढे संक्रमित होते. ती परत सुरूवातीच्या पातळीकडे येत नाही, तर पोषकद्रव्ये उत्पादकाकडून प्राथमिक भक्षक आणि तेथून पुढच्या भक्षक पातळ्यांत संक्रमित होते. मात्र विघटक सजीव पोषणद्रव्यांना चक्रकार स्वरूपात पुन्हा उपलब्ध करून देतात.

3) परिसंस्थेतील सौरऊर्जेचा विनियोग न होता ती वातावरणात फेकली जाते परंतु पोषकद्रव्ये परिसंस्थेतून नष्ट होत नाहीत.


********


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.