1. गतीचे नियम स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Gatiche Niyam 9vi

9 class science question answer Gatiche Niyam | इयत्ता नववी सामान्य विज्ञान गतीचे नियम स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

गतीचे नियम प्रश्न उत्तरे  गतीचे नियम स्वाध्याय  Swadhyay Gatiche Niyam   Gatiche Niyam Swadhyay Prashn Uttare


प्रश्न 1. खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा.

उत्तर :


अ.नं.

स्तंभ-1

स्तंभ-2 (उत्तर)

स्तंभ 3

(उत्तर)

1.

ऋण त्वरण

वस्तूचा वेग कमी होतो

एक वाहन 10 मी/सेकंद वेगानेजाऊन 5 सेकंदात थांबते.

2.

धन त्वरण

वस्तूचा वेग वाढतो.

एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते

3.

शून्य त्वरण

वस्तूचा वेग स्थिर असतो

एक वाहन 25 मी/सेकंद या वेगानेगतिमान आहे.प्रश्न 2. फरक स्पष्ट करा.

 

अ. अंतर आणि विस्थापन


अंतर

विस्थापन

1. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय.

1. विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूंतील सर्वांत कमी अंतर होय.

2.अंतर या राशीला दिशा नसते.

2.विस्थापन या राशीला दिशा असते.

3.एखाद्या वस्तूने कापलेले अंतर शून्य असताना विस्थापन देखील शून्य असते.

3.एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असताना  त्या वस्तूने कापलेले अंतर शून्य नसू शकते.

 

आ. एकसमान गती आणि नैकसमान गती

 

एकसमान गती

नैकसमान गती

१.वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एकसमानगती म्हणतात.

१. वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास, तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात.

२. एकसमान गतीमध्ये वस्तूची चाल बदलत नाही.

२.नैकसमान गतीमध्ये वस्तूची चाल बदलते.

 

 

प्रश्न 3. खालील सारणी पूर्ण करा.

उत्तर :

u (m/s)

a (m/s2)

t (sec)

v = u + at (m/s)

2

4

3

14

10

5

2

20

 

u (m/s)

a (m/s2

t (sec)

s = ut + 1/2at2 (m)

5

12

3

69

7

8

4

92

 

u (m/s)

a (m/s2)

s (m)

v 2 = u2 + 2as (m/s)2

4

3

8

8

4

5

8.4

10

 


प्रश्न 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

 

अ. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे ........ म्हणतात.

उत्तर : वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे विस्थापन  म्हणतात.

            अंतर म्हणजे दोन बिंदुंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय.

 

आ. अवत्वरण म्हणजे................त्वरण होय.

उत्तर : अवत्वरण म्हणजे ऋण त्वरण होय.

            जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्या त्वरणास ऋण त्वरण असे म्हणतात. ऋण त्वरण हे वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. याच त्वरणास आवत्वरण असे म्हणतात.

 

इ. जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीनेजाते तेव्हा तिचा...........प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.

उत्तर : जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीनेजाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.

            घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल सतत अस्थिर असते. परंतु त्याची विस्थापनाची दिशा सतत बदलत असल्याने त्याचा वेगही सतत बदलत असतो.

 

ई. टक्कर होताना .........नेहमी अक्षय्य राहतो.

उत्तर : टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय्य राहतो.

            न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाच्या उपसिद्धांतानुसार जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.  म्हणजेच टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय्य राहतो. त्यामध्ये बदल होत नाही.

 

ए. अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या ............ नियमावर आधारित आहे.

उत्तर : अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या  नियमावर आधारित आहे.

            न्युटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रत्येक क्रिया बालास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अग्नीबाणाचे कार्य न्युटनच्या या तिसऱ्या नियमावर आधारित आहे.

 

Swadhyay Gatiche Niyam | Gatiche Niyam Swadhyay Prashn Uttare


प्रश्न 5. शास्त्रीय कारणे लिहा.


अ. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे  जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते.

उत्तर :

        जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडत असते तेव्हा तिच्यावर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल एकसमान असते. त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही एकसमान असते.


आ. क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत.

उत्तर :

        क्रिया बल व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूंवर कार्यरत असल्याने त्यांचे परिमाण समान व दिशा परस्परविरुद्ध असल्या तरी ती बले एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत.

 

इ. समान वेग असणाऱ्या चेंडूंपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते.

उत्तर :

        वस्तूचा वेग = वस्तूचे वस्तुमान X  वस्तूचा वेग

       या सूत्रानुसार टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान जास्त असते.  त्यामुळे दोन्ही चेंडूंचा वेग समान असताना क्रिकेटच्या चेंडूचा संवेग टेनिसच्या चेंडूच्या संवेगापेक्षा जास्त असतो. तसेच क्रिकेटचा चेंडू टेनिसच्या चेंडूपेक्षा कडक सतो. त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूंपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते.

 

ई. विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.

उत्तर :

        ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते, तिला एकसमान गती म्हणतात. विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम शून्य असते. म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान असते. म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.


गतीचे नियम इयत्ता नववी स्वाध्याय pdf | इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय


प्रश्न 6. तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित  स्पष्टीकरण लिहा.

उत्तर :

१) पोहणे:

                पाण्यात पोहत असताना हाताने पाणी मागे लोटत असतो, त्याच वेळी पाणीसुद्धा समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपल्याला पुढे लोटत असते व त्यामुळे आपले पाण्यामध्ये विस्थापन घडून येते. हे न्युटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रिया बालास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्परविरुद्ध असतात म्हणून घडते.

 

२) गोट्या खेळणे :

            गोट्या खेळताना असे आढळते की, दोन गोट्या सारख्याच वस्तुमानाच्या व आकारमानाच्या असल्यास जेव्हा गतिमान गोटी स्थिर गोटीवर आघात करते, तेव्हा काही वेळा गतिमान गोटी स्थिर होते आणि स्थिर गोती गतिमान गोतीच्या आघातापूर्वीच्या वेगाने गतिमान होते. यामध्ये दोन गोट्यांचा एकूण संवेग कायम राहतो. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम संवेग अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार असे घडते.

 

३)  बॅटने चेंडू मारणे:

        जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो, तेव्हा चेंडूसुद्धा त्याच वेळी समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढतो, तर बॅटवरील  प्रयुक्त बलामुळे बॅटच्या पुढच्या दिशेला असलेला वेग कमी होतो. न्युटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तिवात असते व त्यांच्या दिशा परस्परविरुद्ध असत.

 

४) गतिमान मोटारीचे ब्रेक एकदम दाबल्यास प्रवासी पुढे झुकतात:

           गतिमान मोटारीतील प्रवाशांना मोटारीची गती प्राप्त झालेली असते. ब्रेक दाबून मोटारीची गती एकदम कमी केल्यास मोटारीतील आसनांशी निगडीत असलेल्या प्रवाशांच्या शरीराच्या भागाची गती मोटारीच्या गतीएवढी होते. पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीप्रमाणेच गतिमान राहतो. परिणामी प्रवासी पुढे झुकतात किंवा पडतात. हे न्युटनच्या गतिविषयक पहिल्या जडत्वाच्या नियमानुसार घडते.

 

५) दुचाकी व ट्रक यांची टक्कर झाल्यास दुचाकी दूरवर फेकली जाते:

            जेव्हा दुचाकी व ट्रक यांची टक्कर होते, तेव्हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार क्रिया व बल त्याच वेळी कार्यरत असणारे प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. परंतु दिशा परस्परविरुद्ध असतात. न्युटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार बल = वस्तुमान X त्वरण. दुचाकीचे वस्तुमान हे ट्रक च्या वस्तुमानापेक्षा खूपच कमी असल्यामुळे टक्कर झाल्यानंतर दुचाकीचे त्वरण ट्रकच्या त्वरणापेक्षा खूपच जास्त असते, म्हणून दुचाकी दूरवर फेकली जाते.

 

प्रश्न 7. उदाहरणे सोडवा.

 

अ. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जातेतर सरासरी चाल काढा.  (उत्तर : 6 m/s)

उत्तर :

दिलेले: s1= 18m , t1= 3 s,  s 2= 22, t2 = 3 s,  s 3 = 14 m, t 3 = 3 s, सरासरी चाल  = ?

सूत्र:

सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर  / लागलेला एकूण वेळ

                     = s1 + s2 + s3 / t1 + t2 + t3

                     = 18 m + 22 m + 14 m / 3 s + 3 s + 3 s

                      = 54 / 9 m/s

                      = 6 m/s

वस्तूची सरासरी चाल =   6 m/sआ. एका वस्तूचेवस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणानेगतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या

वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती? (उत्तर: 48 N, 2 m/s2)

उत्तर :

दिलेले : m1 = 16kg, a1 = 3 m/s2 , m2 = 24kg  F= ?   a2 = ?

F = m1 X a1

   = 16 X 3

    =  48 N


F = m2 X a2

a 2 = F / m2

      = 48/24

      = 2 m/s2


इ. बंदुकीच्या एका गोळीचेवस्तुमान 10 g असून ती 1.5 m/s वेगाने900 g वस्तूमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगानेगतिमान होतात. बंदुकीच्या  गोळीसह लाकडी फळी ज्या वेगानेगतिमान होते तो वेग काढा. (उत्तर : 0.15 m/s)

उत्तर :

दिलेले : m1 = 10g = 10X10-3kg  , a1 = 1.5 m/s

            m2 = 90g = 90X10-3kg  , a2 = 0 m/s

m1a1 + m2a2 = m1v1 + m2v2

येथे a2 = 0m/s  V1=V2=V

म्हणून, m1a1 = (m1+m2)V

V = m1a1/m1+m2 = 10X10-3 X 1.5 / 10X10-3  + 90X10-3

                        = 10 X 1.5 / 10 + 90

                        = 15/ 100

                        = 0.15 m/s

 

ई. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करतेव अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करतेतर सरासरी चाल काय असेल? (उत्तर:  2.25 m/s)

उत्तर :


u = 5m/s , t = 10s , V = 15 m/s

a = ? , s = ?

वस्तूचे त्वरण

a = V – u / t = (15-5) / 10 = 1 m/s2

वस्तूने कापलेले अंतर ,

S = ut + ½ at2

S = ( 5 X 10 + ½ X 1 X 100)

S = ( 50 + 50 ) m

S = 100 m

**********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.