तरस प्राण्याची माहिती | Hyena information in marathi

16] Information about Hyena in Marathi | तरस संपूर्ण माहिती


मराठी नाव : तरस

हिंदी नाव : लकडबग्धा, बिज्जु

इंग्रजी नाव : HYENA

 

तरस माहिती मराठी  Taras vishay mahiti  Taras mahiti marathi  Hyena information in marathi for student  Hyena information for school project   Hyena information in marathi

            कोल्हा, लांडगा वगैरेंसारखा तरस हा जंगली प्राणी होय.


तरस प्राण्याचे वर्णन :

तरसाला चार पाय, दोन डोळे असतात. मानेवर लहानसर आयाळ असते. अंगावरही केस असतात. गळ्याखाली थोडे-लांब केस असतात. त्याची शेपटी केसाळ असते.


तरस प्राण्याचे अन्न :

तरस मांसाहारी आहे. तरस वाघ व सिंह या प्राण्यांनी खाऊन उरलेल्या मांसावर उपजीविका करतो.


तरस प्राण्याची वैशिष्ट्ये :

तरसाचे मागचे दोन पाय वाकलेले असतात; त्यामुळे तो खुरडत चालल्यासारखा वाटतो. हा प्राणी स्वतःहून कोणत्याही प्राण्याची शिकार करत नाही.


तरस प्राण्याची इतर माहिती :

 तरस हा एक सस्तन प्राणी आहे. हा प्राणी दिसायला साधारण, रंगाने काळा असतो. भारतातील तरसाच्या अंगावर काळे पट्टेः तर आफ्रिकन तरसाच्या अंगावर गोलाकार खुणा असतात.

तरस या प्राण्याचे मागचे पाय कमकुवत असल्यामुळे त्याला अजिबात पळता येत नाही. तरसाचा जबडा खूप भक्कम असतो त्यामुळे तो प्राण्यांची हाडेसुद्धा कडाकडा मोडून खातो. या प्राण्याला जनावरांचे नासके-कुजके मांसदेखील चालते. त्याच्या खाण्यापिण्याच्या घाणरेड्या सवयींमुळे पर्यावरण मात्र स्वच्छ राहते. तरस कोल्ह्याप्रमाणे 'कुई कुई' असा आवाज करतो; तर कधी खदाखदा हसतो. हा प्राणी माणसाळलेला असेल तर विश्वासू कुत्र्याप्रमाणे घराची राखणही करतो.

Taras mahiti marathi | Hyena information in marathi for student | Hyena information for school project | Hyena information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.