वाघ प्राण्याची माहिती | Tiger information in marathi

2] Information about Tiger in Marathi | वाघाची संपूर्ण माहिती


मराठी नाव : वाघ

हिंदी नाव : बाघ

इंग्रजी नाव : TIGER

 

वाघ माहिती मराठी  Vagh vishay mahiti  Waghachi mahiti marathi  Tiger information in marathi for student  Tiger information for school project   Tiger information in marathi

            जंगलचा राजा सिंह याच्यानंतर  कोणत्या प्राण्याचे नाव घेतले जात असेल तर ते वाघोबाचे होय. सिंह हा जंगलचा राजा आहे, तर वाघ हा प्राणी जंगलचा प्रधान मानला जातो.


वाघाचे वर्णन :

वाघ या प्राण्याचा रंग तांबूस पिवळसर असतो. त्यांच्या अंगावर काळे पट्टे असतात. वाघाचे डोळे तपकिरी रंगाचे असून त्यात लालसर छटा असते; त्यामुळे त्याचे डोळे निखाऱ्यासारखे धगधगीत दिसतात. वाघाला चार पाय, दोन डोळे, दोन छोटे कान व एक शेपटी असते.


वाघाचे अन्न  :

वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. तो सांबर, हरिण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस खातो.


वाघाचे इतर वर्णन :

वाघाचा जबडा मोठा असतो. वाघाच्या नाकाजवळ काटेरी मिश्या असतात. वाघाचे शरीर सहा-सात फूट लांब, शेपटी तीन-चार फूट लांब असते. त्याच्या पायाला पंजे म्हणतात. पंजाला दणकट  टोकदार नखे असतात. त्याच्या तोंडात सुळे असतात. वाघाचे चे वजन किमान ६०० ते ७०० पौंड असते.


 शिकार :

एकदा हा वाघाच्या बळकट सुळ्यांमध्ये एखादा प्राणी सापडला तर त्याचा प्राण वाचणे कठीण असते. वाघ हा प्राणी दिसायला क्रूर असतो. वाघाला ताजे मांस हवे असते. एकदा शिकार करून पोट भरले की वाघ शांतपणे झोपून राहतो.


वाघाची इतर माहिती :

वाघाच्या मादीला 'वाघीण' म्हणतात. वाघाच्या पिलांना 'बछडे' म्हणतात. एक वाघ आपल्या हद्दीत दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही. वाघिणीला एका वेळी दोन ते तीन बछडी होतात. वाघाचे बछडे लहानपणी अगदी मांजरीच्या पिलांसारखी दिसतात. शिकार शोधणे, शिकार पकडणे, आपल्या भक्ष्यावर हल्ला कसा करायचा ?  या गोष्टी वाघीण आपल्या बछड्यांना शिकविते.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हा प्राणी मांजर कुळातला मानला जातो. वाघांच्या अनेक जाती व अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पांढरा वाघ, बिबट्या वाघ, ढाण्या वाघ अशा काही जाती आहेत. बिबट्या वाघाच्या अंगावर पिवळसर मखमली केस असतात. त्याच्या अंगावर काळे ठिपके असतात. बिबट्या वाघ हा भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक इथे आढळतो.

काही वाघ हे नरभक्षक असतात. वाघ हा प्राणी म्हातारा होऊ लागला की त्याचे दात, नखे गळून पडतात. स्नायूपण शिथिल होऊ लागतात. शक्ती कमी होते. परंतु हाच वाघ जंगलातून एकदा मनुष्य दिसल्यास त्यांच्यावर झडप घालतो.

वाघाची आणखी एक जात म्हणजे पांढरा वाघ. या प्रकारचे वाघ रेवाच्या जंगलांमध्ये आढळतात. या वाघांच्या कातडीचा मूळ रंग पांढरा किंवा थोडा राखी असतो. त्यावर थोडे मळकट रंगाचे पट्टे असतात. पांढऱ्या वाघाचे ओठ गुलाबी असतात व डोळे निळे असतात, हे वाघ फारच रुबाबदार व ताकदवान दिसतात. 'रेवा' हे जंगल मध्य प्रदेशात आढळते.

Tiger information in marathi for student | Tiger information for school project | Tiger information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :