हरीण प्राण्याची माहिती | Deer information in marathi

3] Information about Deer in Marathi | हरीण संपूर्ण माहिती


मराठी नाव : हरीण

हिंदी नाव : हीरन

इंग्रजी नाव : DEER

 

हरीण माहिती मराठी  हरीण संपूर्ण माहिती  Harin vishay mahiti  Harin mahiti marathi  Deer information in marathi for student  Deer information for school project   Deer information in marathi

हरिण हा प्राणी जंगलात आढळतो. हा प्राणी चपळ परंतु स्वभावाने मित्रा असतो. दिसायला छान असून लहान मुलांना फार आवडतो. हरणाला 'सारंग मृग' असेही म्हणतात. पुराणात हरणाच्या अनेक कथा आहेत. भारतात हरणांच्या एकूण चार जाती आहेत. त्या म्हणजे सांबर, चितळ, काळवीट आणि नीलगाय होय.


हरणाचे अन्न : 

        हरणाला झाडपाला तसेच गवतसुद्धा आवडते.


हरणाची इतर माहिती :

    हरणे जंगलात तसेच गवताळ प्रदेशातही आढळतात. सर्वसाधारणपणे मादी हरणाला शिंगे नसतात. सांबर नावाचे हरिण आकार आणि उंचीने मोठे असते. त्याची पाठ तांबूस तपकिरी रंगाची असते. पोटाचा भाग पांढरा असतो. सांबराची शिंगांचा औषध म्हणून वापर केला जातो.

    चितळ जातीचे हरिण अतिमृदू स्वभावाचे, दिसायला मनमोहक व सुंदर असते. रंग तांबूस तपकिरी असतो. या जातीच्या नर हरणाला शिंगे असतात, मादीला नसतात. शिंगांना एक-दोन फुटांचे फाटे फुटलेले असतात. ही हरणे महाराष्ट्र कर्नाटकात पहायला मिळतात.

    काळवीट ही हरणाची आणखी एक जात. या जातीतील हरणांचा रंग काळसर तांबूस असतो. हे फार वेगाने धावू शकते. नर काळविटाची शिंगे पिळे-पिले असल्यासारखी असतात. काळवीट कळपाने राहतात. काळविटाची मादीएका वेळी एक-दोन पिल्लांनाच जन्म देते. त्यांच्या संरक्षणासाठी ती त्यांना गवतात लपवते.

    नीलगाय ही हरणांची एक जात. या जातीचे हरिण धड गाईसारखे किंवा धड घोड्यासारखेही दिसत नाही. रंग निळसर असल्यामुळे त्याला 'नीलगाय' असे म्हणतात. उंची चार-साडेचार फूट असते.

    कस्तुरीमृग हा हरणांचा अजून एक दुर्मिळ प्रकार. या प्रकारचे हरिण हिमालयाच्या उंच प्रदेशात पहायला मिळते. त्याच्या अंगावर राठ व लांब केस असतात. या हरणाला सुळे असतात, त्या सुळ्यांचा उपयोग ते स्वतःच्या रक्षणासाठी करते. या जातीच्या नर हरणांच्या पोटात कस्तुरीच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींना सुवास येतो. या ग्रंथींपासून एक प्रकारचा स्राव येतो. त्याचा ताजा असताना फार घाणेरडा व तीव्र वास येतो. परंतु तो स्राव सुकल्यावर मात्र त्याचा वास मंद व मनाला सुखद, आल्हाददायक, वाटतो. हीच कस्तुरी होय. साधारणपणे एका नर जातीच्या मृगाकडून २८ ग्रॅम कस्तुरी मिळते. या कस्तुरीपासून अत्तरे, सुगंधी तेल, अगरबत्त्या, सुगंधी उटणे, साबण अशा अनेक वस्तू बनवतात. म्हणून कस्तुरी फार मौल्यवान समजली जाते. त्यासाठी पुष्कळ लोक कस्तुरीमृगाची हत्या करतात. त्यामुळे ही हरणांची जात दुर्मिळ होत चालली आहे.

हरणांच्या सर्व जातींमध्ये फक्त नर जातीलाच शिंगे असतात. दरवर्षी विणीच्या हंगामानंतर नर जातीच्या हरणांची शिंगे गळून पडतात. पुन्हा विणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी नरांना शिंगे येतात. प्रथम ती नरम असतात. त्यांची लव गळून गेल्यावर ती शिंगे कडक बनतात व त्यांचा उपयोग ते आत्मसंरक्षणासाठी करतात.

Harin mahiti marathi | Deer information in marathi for student | Deer information for school project | Deer information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :