१०. बदलते जीवन : भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी | Badalate Jivan Bhag 2 Swadhyay

बदलते जीवन : भाग २ प्रश्न उत्तरे इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf इयत्ता नववी इतिहास धडा सहावा स्वाध्याय इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय
Admin

बदलते जीवन : भाग २इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 6 question answers

बदलते जीवन : भाग २ प्रश्न उत्तरे इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf इयत्ता नववी इतिहास धडा सहावा स्वाध्याय इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय


१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१) भारताने......... च्या नेतृत्वाखाली विश्वचषक  क्रिकेट स्पर्धा जिंकली.

(अ) सुनील गावसकर

(ब) कपिल देव

(क) सय्यद किरमाणी

 (ड) संदीप पाटील

उत्तर: भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक  क्रिकेट स्पर्धा जिंकली.

History class 9 chapter 6 solution| 9th history chapter 6 question answers

(२) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात......... भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

(अ) पंजाबी

(ब) फ्रेंच

(क) इंग्रजी

 (ड) हिंदी

उत्तर: जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

 

२. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

क्र.

विषय

तपशील/उदाहरणे

1

भारतातील महत्वाच्या भाषा

हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु, मराठी, उडिया, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी इत्यादी.

2

ऑलंपिक स्पर्धमध्ये पदक प्राप्त खेळाडू

कर्नाम मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, राज्यवर्धन साईन राठोड, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, सुशील कुमार, साक्षी मलिक.

3

तुम्ही पाहिलेले बालचित्रपट

तारे जमीन पर, स्टॅनले का डब्बा, फेरारी की सवारी.

4

विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वत्तवाहिन्यांची नावं

दूरदर्शन, एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, सीएनएन आयबीएन७, टाईम्स नाऊ, रिपब्लिक टीव्ही.

 

Badalate Jivan Bhaag 2   Swadhyay Iyatta Navavi  \ Class 9 history questions and answers

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

उत्तर:

1. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोंठी लोकप्रियता मिळाली.

2. याच वर्षी सुनील गावसकर यांनी कसोटींमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.

3. 1985 मध्ये भारताने 'बेन्सन अँड हेजेस' क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.

4. याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला.


(२) चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

उत्तर:

1. चित्रपटगृह संकल्पनेने चित्रपटांचे अर्थकारण बदलले आहे.

2. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले.

3. पूर्वी 3-4 तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला. एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली.

4. यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला.

5. हा उद्योग कोट्यवधी लोकांना सामावुन घेऊ लागला, चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला. यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले.

 

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.


(१) भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

उत्तर:

1. भारतीय भाषा या आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे भांडार आहेत, या भाषांची प्रत्येक बोली स्वतःच अद्वितीय आहे आणि समाजाची प्रतिनिधी आहे.

2. सध्या इंग्रजी भाषा भारतात लोकप्रिय होत आहे. शिक्षण, चित्रपट, सार्वजनिक व्यवहार इत्यादींपासून भारतीयांच्या जवळपास सर्वच क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे.

3. त्यामुळे भारतीय भूमीतच भारतीय बोली नामशेष होत आहेत.

4. बोलीभाषेशीच संबंधित समूहाच्या परंपरा, चालीटीती, परंपरा. विचार आणि संस्कृतीची ओळख होते. बोलीभाषा हा आपला सांस्कृतिक आणि भाषिक वारसा आहे. म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.

 

बदलते जीवन : भाग २ इयत्ता नववी स्वाध्याय | Badalate Jivan Bhaag 2  swadhyay prashn uttare

(२) वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर:

1. या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रें टंगीत झाली.

2. पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाय्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरुपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. वृत्तपत्रे आता अधिकच सक्रीय होऊ लागली आहेत.

3. दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, अशा विविध मार्गानी वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत.

 

(३) दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत.

उत्तर:

1. भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचे आगमन झाले. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे टंगीत झाले.

2. सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरुप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे; बातम्या असे एक- एक उपक्रम वाढत गेले.

3. 1991 च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्ताकन सीएनएन वाहिनीने जगभर दाखवले. या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले.

4. 1998 मध्ये सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खासगी उद्योगसमूह भारतात आला. यामुळे भारतातील मुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले.

5. भाषा, सादरीकरणाचे तंत्र, तंत्रसज्ज स्टूडिओ आणि आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन्सचा वापर यांमुळे या वाहिन्यांनी विस्तार घडवून आणला.

*******

Post a Comment