8. उद्योग व व्यापार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ९वी | Udyog v Vyapar Swadhyay Prashn Uttare

इयत्ता नववी इतिहास धडा आठवा स्वाध्याय इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय Udyog v Vyapar swadhyay prashn uttare Udyog v Vyapar Swadhyay Iyatta Navavi
Admin

उद्योग व व्यापार इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 8 question answers


इयत्ता नववी इतिहास धडा आठवा स्वाध्याय इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय Udyog v Vyapar  swadhyay prashn uttare Udyog v Vyapar  Swadhyay Iyatta Navavi


१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.


(१) १९४८ मध्ये.......... या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

(अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा.

(ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(क) रोजगार निर्मिती व्हावी.

(ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.

उत्तर: १९४८ मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.


History class 9 chapter 8 solution | 9th history chapter 8 question answers

(२) भारतातील ........ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’  म्हटले जाते.

(अ) ताग

ब) वाहन

(क) सिमेंट

(ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर: भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’  म्हटले जाते.

 

(३) वस्त्रोद्योग समितीचेप्रमुख काम ...... हे आहे.

(अ) कापड उत्पादन करणे.

(ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

(क) कापड निर्यात करणे.

(ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

उत्तर: वस्त्रोद्योग समितीचेप्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.

 

(४) सायकल उत्पादनात ........ हे भारतातील  प्रमुख शहर आहे.

(अ) मुंबई

(ब) लुधियाना

(क) कोची

(ड) कोलकता

उत्तर: सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील  प्रमुख शहर आहे.

 

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ -  औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

(२) औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.

(३) वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

(४) खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील  औद्योगिकीकरणास चालना देणे.

उत्तर: वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

 

उद्योग व व्यापार प्रश्न उत्तरे | इयत्ता नववी इतिहास स्वाध्याय pdf

प्र.२ (अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.

चौकट पूर्ण करा.

भारतात आयात होणाऱ्या वस्तू

यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी

भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू

चामडे, सायकल, ट्रॅक्टर, चहा, कॉफी, साखर, सुती कापड, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी

 

Class 9 history questions and answers


(ब) टीपा लिहा.


(१) भारताची आयात-निर्यात

उत्तर:

1. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तु व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली.

2. भारताच्या आयतीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खंते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

3. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली.

4. भारताच्या निर्यातीत चहा, कॉपी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

उद्योग व व्यापार इयत्ता नववी विषय इतिहास स्वाध्याय | 9th history chapter 8 question answers

(२) भारताचा अंतर्गत व्यापार

उत्तर:

1. अंतर्गत व्यापार म्हणजे देशातील देशांतर्गत व्यापार प्रणाली.

2. भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गानी चालतो. बंदरे नेटवर्कसाठी महत्त्वाचे घटक आहेत. मुंबई, कोलकता, कोची, चेन्नई, ही बंदरे महत्त्वाची आहेत.

3. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

 

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

उत्तर:

1. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपयांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत.

2. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात.

3. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

4. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

 

(२) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

उत्तर: भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे कारण,

1. तसेच भारतातील उदयोगधंदयाच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्य अनेक संधी उपलब्ध होतात.

2. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

 

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.


(१) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते?

उत्तर:

1. ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकयांना कर्ज दिले जाते.

2. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात.

3. शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा योग्य मूल्य पुरवठाही केला जातो.

4. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडन शेतकयांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशींचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

5. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडन मार्गदर्शन होते.

6. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाउस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

 

(२) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण  होतो ?

उत्तर:

1. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपयामध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत.

2. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहुण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

3. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात.

4. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही रोजगार उपलब्ध होतो.

 

(३) भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणतेव्यवसाय चालतात ?

उत्तर:

        भारतात वनसंपत्तीर वर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र कापड़, टेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणा कच्चा माल हे व्यवसाय चालतात.

*********

Post a Comment