मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board
१.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१)
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार…………………. यांना मानतात.
(अ)
संत ज्ञानेश्वर
(ब)
संत तुकाराम
(क)
संत नामदेव
(ड)
संत एकनाथ
उत्तर:
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.
(२)
बाबुराव पेंटर यांनी ...............हा चित्रपट काढला.
(अ)
पुंडलिक
(ब) राजा हरिश्चंद्र
(क) सैरंध्री
(ड) बाजीराव-मस्तानी
उत्तर:
बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री
हा चित्रपट काढला.
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
(ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१)
रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२)
टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३)
साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४)
एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
उत्तर:
एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
Maharashtra Board Class 10 History Notes Download. | Manoranjanachi Madhyame Aani Itihas PDF Class 10
२.
पुढील तक्ता पूर्ण करा.
|
भजन |
कीर्तन |
लळीत |
भारुड |
गुणवैशिष्ट्ये |
(1) टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे
गुणगान. (2) अभंग व भक्ति-कवनांतून ईश्वरस्तुती. |
(1) नमन, निरूपणाच
अभंग व निरूपण हा पूर्वरंग. (2) आख्यान हा उत्तररंग. |
(1) उत्सवप्रसंगी देवतेकडे 'मागणे' मागितले जाते. (2) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या
कथा सादर करणे. |
(1) आध्यात्मि व नैतिक शिकवण. (2) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. |
उदाहरणे |
संत तुलसीदास. संत नामदेव यांची भजने. |
(1) नारदीय कीर्तने. (2) महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने. |
(1) गोवा, कोकण या
भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित. |
(1)ज्ञानेश्वर, नामदेव
यांची भारुडे. (2) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय
आहेत. |
इयत्ता दहावी इतिहास सहावा धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 6 Swadhyay
३.
टीपा लिहा.
(१) मनोरंजनाची आवश्यकता
उत्तर:
1)
मनोरंजन हा एक मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक माणसाला मनोरंजनाची आवश्यकता
असते.
2)
चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक
असते.
3)
मनोरंजनामुळे मन उत्साही आणि अधिक कार्यक्षम होते.
4)
मनोरंजनातून माणसाचे छंद वाढीस लागतात आणि त्यातूनच व्यक्तीमत्व विकास होतो.
५)
मनोरंजन मनावरील ताण हलका होतो आणि मनाला विरंगुळा मिळतो.
(२) मराठी रंगभूमी
उत्तर:
1) रंगभूमी हे व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान आहे.
2) मराठी रंगभूमीचा एकोणिसाव्या शतकात उदय झाला.
3) विष्णुदास भावे हे ‘मराठी रंगभूमीचे जनक होत.
4) सुरुवातीच्या कळत ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबर प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
5)‘थोरले माधवराव पेशवे’ या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरु झाली.
6) एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरु झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
7) मराठी रंगभूमीच्या पदत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि.वा.शिरवाडकर, विजय तेंडूलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
दहावी इतिहास पाठ 6 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
(३) रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
उत्तर:
रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत:
1) रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ञांची आवश्यकता असते.
2) दिग्दर्शाक , कलाकार, छाया व प्रकाशयोजना जपणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते . लेखक त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यानातील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते.
3) चित्रपट निर्मितीसाठी देखील या सर्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर संवादलेखक, कथालेखक, नृत्यदिग्दर्शक , गीतकार अशा तज्ञांची आवश्यकता असते ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहेत.
History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Manoranjanachi Madhyame Aani Itihas Study Material | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
४.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
उत्तर:
1) ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घेणे आवश्यक असते.
2) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरण निर्मिती करावी लागते.
3) पात्रांच्या तोंडाची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहित असाव्या लागतात.
4) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते.
5) एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यामात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्वाचे आहेत.
(२) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
उत्तर:
1) लोकशिक्षणाच्या हेतूने संत एकनाथांनी अनेक भारुडे लिहिली.
2) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा , उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.
3) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत.
4) व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
५.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१)
भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ?
उत्तर:
(१) १८८५ मध्ये भारतात चलतचित्रपटाचा प्रारंभ
महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी केला.
(२) १८१९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर
उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानाव दाखवला.
(३) दादासाहेय तोरणे, करंदीकर, पाटणकर य दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंयईत दाखवला.
(४) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रशज्ञान वापरून स्वत: दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.
अशा
रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान
महाराष्ट्राकडे जातो. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती
आहे.
(२) पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
उत्तर:
1) ‘पोवाडा’ म्हणजे घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना होय.
2) पोवाडा हा गद्य-पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
3) तो पूर्वी राजदरबारात व लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
4) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रितीरिवाजांचे वर्णन केलेले असते.
दहावी मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास प्रश्नोत्तर | Manoranjanachi Madhyame Aani Itihas in Marathi PDF | दहावी इतिहास स्वाध्याय प्रश्नोत्तर
*********
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.