प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
Maharashtra Board Class 10 History Notes Download. | prasarmadhyame Aani Itihas PDF Class 10
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१)
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र …………यांनी सुरू केले.
(अ)
जेम्स ऑगस्टस हिकी
(ब)
सर जॉन मार्शल
(क)
अॅलन ह्यूम
(ड)
बाळशास्त्री जांभेकर
उत्तर:
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू
केले.
(२)
दूरदर्शन हे …………माध्यम आहे
(अ)
दृक्
(क)
दृक्-श्राव्य
(ड)
स्पर्शात्मक
उत्तर:
दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम आहे
(ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१)
प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे
(२)
दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
(३)
दीनबंधु - कृष्णराव भालेकर
(४)
केसरी - बाळ गंगाधर टिळक
उत्तर:
प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे
२.
टीपा लिहा.
(१) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
उत्तर:
1) वर्तमानपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात लोकजागृती आणि लोकशिक्षण केले. भारतीय सांस्कृती व इतिहासाची थोरवी वर्तमान पत्राच्या माध्यमातून वर्णन केली गेली.
2) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठींबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.
3) पाश्च्यात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहचवून समाजप्रबोधनाचे काम केले.
4) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.
5) वृत्तपत्रांनी समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवले.
(२) प्रसारमाध्यमांची आवश्यकता
उत्तर: खालील कारणांसाठी प्रसारमाध्यमाची आवश्यकता असते.
1) प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचते.
2) लोकांना घटना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहता येतात. माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो.
3) प्रसारमाध्यमांमुळे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसती आवश्यक असलेलेई माहिती ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली जाते.
4) प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक मजबूत होण्यास मदत होते. म्हणून प्रसार माध्यमांची आवश्यकता अत्यंत महत्वाची आहे.
इयत्ता दहावी इतिहास पाचवा धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 5 Swadhyay
(३) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
उत्तर:
मुद्रित
माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक
व्यावसायिक क्षेत्रे असतात.
1) वृत्तपत्रांत
अग्रलेख,
विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात.
(२)
बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते.
(३)
इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते.
(४)
या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.
३.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(1)मिळणाऱ्या चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
उत्तर:
(१) प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी
माहिती वास्तवाला धरून असेलच अस नाही.
(२)
ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतु सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
(३)
प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हे देखील त्या माहितीत दडलेले असतात. (५)
जर्मनीतील 'स्टर्न' साप्ताहिकाने हिटलरने
लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध
झाले.
म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
दहावी इतिहास पाठ 5 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
(२) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
उत्तर
:
(१)
एखादया बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.
(२)
दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.
(३)
वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात, अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.
(४)
वृतापत्रे भूतकाळातील घटना, मुद्दे, नेते
आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या
काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो.
म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते
(३) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
उत्तर:
१)
दूरदर्शन हे दृक-श्राव्य मध्यम आहे. दूरदर्शन च्या माध्यमातून माहितीबरोबरच
त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा
खजिनाच होय.
(२)
सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा राजकी
घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व
घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
(३)
खेळाडू,
नेते, किल्ले, युद्ध
इत्यादी गोष्टींवरील माहितीपर दूरदर्शनवर पाहायला मिळतात.
(४)
रंगीत संच, रिमोटचा वापर, घटनांचे सजीव
दृश्यरूप व प्रत्यक्ष प्रसारण, बातम्या यांमुळे दूरदर्शनच्या
लोकप्रियतेत वाढ झाली आहे. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय
लोकप्रिय माध्यम आहे.
४.
पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आकाशवाणी
: स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी'
(आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी
रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे 'इंडियन
स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' (आयएसबीएस) असे नामकरण केले.
८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ'
(एआयआर) असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व
उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते.
ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार 'आकाशवाणी'
हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे
शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी
विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. 'विविधभारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम
सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.
(१)
आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते ?
उत्तर:
आकाशवाणी AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा अंतर्गत
येते.
(२) IBC चे नामकरण काय झाले ?
उत्तर:
IBC
म्हणजे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी
रेडीओ केंद्राचे ब्रिटीश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉड कास्टिंग सर्व्हिसेस
असे नामकरण केले. नंतर ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल
इंडिया रेडिओ' (एआयआर) असे झाले.
(३)
विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात ?
उत्तर:
विविधभारतीवरून २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात.
(४)
आकाशवाणी हे नाव कसे पडले ?
उत्तर:
ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार 'आकाशवाणी' हे नाव दिले गेले
History Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board prasarmadhyame Aani Itihas Study Material
५. संकल्पनाचित्र तयार करा.
|
वर्तमानपत्रे |
आकाशवाणी |
दूरदर्शन |
सुरुवात/ पार्श्वभूमी |
जेम्स ऑगस्टस हिकी यांनी २९ जानेवारी १७८० रोजी
'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. |
१९२४ साली मद्रास (चैन्नई) येथे 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' हे पहिले खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. ज्याला नंतर 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले. |
१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली
दूरदर्शन केंद्र सुरू झाले. |
माहितीचे/कार्यक्रमांचे स्वरूप |
मुख्यत: बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध
सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. |
विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर
आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. |
जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती
इ. कार्यक्रम सादर होतात. |
कार्ये |
१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे. २) लोकशिक्षण व लोकजागृती करणे ३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे. ४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना
प्रसिद्धी देणे. |
१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे. २) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन
करणे. ३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण
व लोकजागृती करणे. ४) व्याख्यानांद्वारे, चर्चेद्वारेपर्यावरण-संस्कृती संवर्धनाविषयीचे
कार्यक्रम सादर करणे. |
१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती
प्रक्षेपित करणे. २) लोकशिक्षण व लोकजागृती करणे. ३) समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे. ४) सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी परंपराविरुद्ध
समाजप्रबोधन करणे. |
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रश्नोत्तर
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.