उपयोजित इतिहास
स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10
History exercise Marathi PDF- Maharashtra Board
१.
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१)
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ............या शहराचे उत्खनन करताना सापडले.
(अ)
दिल्ली
(ब)
हडप्पा
(क)
उर
(ड)कोलकाता
उत्तर:
जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.
(२)
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार............येथे आहे.
(अ)
नवी दिल्ली
(ब)
कोलकाता
(क)
मुंबई
(ड) चेन्नई
उत्तर:
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
(ब)
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१)
कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२)
रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(३)
रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
(४)
कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर:
रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
इयत्ता दहावी इतिहास तिसरा धडा स्वाध्याय | Std 10 History Chapter 3 Swadhyay
दहावी इतिहास पाठ 3 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
२.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) उपयोजित इतिहास
उत्तर:
(1)
एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे
म्हणजे उपयोजन होय.
(2)
इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे,यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे
म्हणतात.
(3)
इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग
वर्तमानात
आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित
इतिहासात केला जातो.
(4)
इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला,
स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसे या
विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.
(२) अभिलेखागार
उत्तर:
(1)
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करुन ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे
म्हणतात.
(2)
अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तटे, जुने चित्रपट,जागतिक कटारांचे ऐवज इत्यादी जतन करुन
ठेवले जाते.
(3)
अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा
अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना
करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित कटता येतो.
(4)
भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे
अभिलेखागार आहे.
भारतातील
प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे.
३.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:
मूर्त
:
(1)
प्राचीन स्थळे
(2)
प्राचीन वास्तू
(3)
प्राचीन वस्तू
(4)
हस्तलिखिते
(5)
प्राचीन शिल्पे
(6)
प्राचीन चित्रे
अमूर्त
:
(1) मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा
(2)
पारंपरिक ज्ञान
(3)
सणसमारंभाच्या सामाजिक पद्धती
(4)
कला सादरीकरणाच्या पद्धती
(5)
पारंपरिक कौशल्ये
(6)
परंपरा,पद्धती,कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट
४.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
उत्तर:
तंत्रज्ञानाचा
इतिहास अभ्यासावा लागतो कारण,
(१) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
(२)
दगडांपासून हत्यारे तयार करणे शेतीचेतंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला
(३)
कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी
इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती
समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Itihas Upayojit Itihas in Marathi PDF | दहावी इतिहास स्वाध्याय प्रश्नोत्तर
उपयोजित इतिहास स्वाध्याय | 10th History Chapter 3 Question Answer
(२)
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे
जाहीर केली जाते.
उत्तर:
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे
जाहीर केली जाते कारण,
(1) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
(2) हा
वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे अत्यंत आवश्यक
असते.
(3) काळाच्या
ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन करण्यासाठी जागतिक वारशाच्या पदास
पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर
केली जाते
५.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१)
पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट
करा.
(अ)
विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
उत्तर:
वरील सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती खालीलप्रमाणे उपयुक्त ठरते.
अ) विज्ञान : मानवी गरजांची पूर्तता आणि जीज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
ब) कला : कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
क) व्यवस्थापनशास्त्र: उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे है व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.
(२)
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?
उत्तर:
इतिहासाद्वारे
भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग
वर्तमान
आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित
इतिहासात केला जातो. या इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो.
1) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
2) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल
त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी
निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित
इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते.
उपयोजित
इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
3) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना घेणे
शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय
घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन
आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
(३) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
उत्तर:
(1)
किल्ले,
स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची
नियमित डागडुजी केली पाहिजे.
(2)
वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे
टाळण्याबाबत उपाय योजावेत.
(3)
ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादीची चोरी होणार नाही याची काळजी
घ्यावी.
(4) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करुन ते लिखि स्वरुपात आणावे.
(5)
प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे.
(6)
सर्व साधनांचे जतन करण्यासाठी अनुभवी तज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
(7) ऐतिहासिक
साधनांचे जतन करण्यासाठी कडक कायदे करावेत.
(8)
या साधनांचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन
कटावे.
(9)
या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण
केली पाहिजे. हा आपला प्राचीन वासा आहे, त्याचे महत्त्व
पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
(10) उपलब्ध
स्त्रोतांचे संगणकीय संवर्धन करावे.
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF
Maharashtra Board Class 10 History Notes Download. | Upayojit Itihas swadhyay PDF Class 10
(४)
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य
होतात ?
उत्तर:
नैसर्गिक
आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून खालील गोष्टी साध्य होतात:
1) प्रकल्पांतर्गत
वारसास्थळाच्या मूळ स्वरुपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
2) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे
वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा
आढावा घेता येतो.
3) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या
भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक
लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
4) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य
नियोजन करणे शक्य होते.
********
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.