१३. थोडं ‘आ’ भारनियमन करूयास्वा ध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Thod aa bharniyaman karuya swadhyay question answer 9th marathi

Thod aa bharniyaman karuya swadhyay Iyatta 9vi marathi guide थोडं ‘आ’ भारनियमन करूयास्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी थोडं ‘आ’ भारनियमन करू
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Thod aa bharniyaman karuya swadhyay | इयत्ता ९वी मराठी थोडं ‘आ’ भारनियमन करूया स्वाध्याय
 
Thod aa bharniyaman karuya    swadhyay Iyatta 9vi marathi guide थोडं ‘आ’ भारनियमन करूयास्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी  थोडं ‘आ’ भारनियमन करू

प्र. १. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.


(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास...........

उत्तर: आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो.

 

(आ) खूप जवळच्या गहिन्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास...........

उत्तर: खूप जवळच्या गहिन्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उनावून नुसती औपचारिकता उरते.

 

(इ) मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास..........

उत्तर: मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि ‘जड आगाऊपणा केलास तर याद राख’ अशी धमकीही मिळते.

 

(ई) लेखिकेच्या मते '' भारनियमन केल्यास.............

उत्तर: लेखिकेच्या मते '' भारनियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची उब संपून जाणार नाही.

 

9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2025 | Iyatta  9vi marathi Thod aa bharniyaman karuya     swadhyay


प्र. २. पाठातील उदाहरणे शोधा.


शब्दांशिवाय मानलेले आभार

स्पर्शाने

कटाक्षाने

ऑपरेशन च्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो.

आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्र-मैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष.

 

 

इयत्ता नववी मराठी गाईड pdf | थोडं ‘आ’ भारनियमन करूयामराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय थोडं ‘आ’ भारनियमन करूया | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती


प्र. ३. चूक की बरोबर ते ओळखा.


(अ) आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.

उत्तर: बरोबर


(आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.

उत्तर: चूक

 

(इ) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.

उत्तर: बरोबर

 

(ई) आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.

उत्तर: बरोबर

 

प्र. ४. कारणे लिहा.

9th class marathi question and answer pdf download 9th std marathi digest pdf navneet Thod aa bharniyaman karuya    class marathi question and answer sthaulvachan


प्र. ५. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.

उत्तर:

1.    साध घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात.

2.    थँक्यू म्हणता येण हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, अस काही काळ वाटून गेलं.

3.    तू कसली ग माझी थँक्यू ? मीच तुझी थँक्यू.

4.    त्याला थँक्यू दिलेस का पण ?

5. तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच.

6.    आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता

7.    ‘थँक्स फॉर मॅरिंग हं.

 

प्र. ६. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.


(१) कॅप्शन – घोषवाक्य

(२) टेन्शन – ताणतणाव

(३) आर्किटेक्ट – वस्तूविशारद

(४) ऑपरेशन – शस्त्रक्रिया

 

प्र. ७. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


(१) सुसंस्कृतपणाचा कडेलोट

उत्तर: 

            इंग्रज म्हणजे सुसंकृतच; ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणचे लक्षणच होय; असे बऱ्याच लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आढळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते, थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव ‘सुसंस्कृतपणाचा कडेलोट’ या शब्दांतून व्यक्त होतो.

 

(2) घाऊक आभार

उत्तर: 

            सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे ‘घाऊक आभार’ मानणे होय.

 

9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Thod aa bharniyaman karuya    class marathi question and answer sthaulvachan


प्र.८. स्वमत.


(अ) 'आभार मानणे', या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.

उत्तर: 

            आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपल्याला कुणाकडून ना कुणाकडून मदत मिळत असते. ती मदत मोठी असो वा लहान, त्यामागे असलेले प्रेम, काळजी, अथवा सद्भावना हीच खरी मौल्यवान गोष्ट असते. अशा वेळी "धन्यवाद" किंवा "आभार" मानणे ही केवळ औपचारिकता नसून एक सुंदर शिष्टाचार आहे.

            माझ्या मते, आभार मानल्याने नात्यांमध्ये आपुलकी वाढते. दुसऱ्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होते आणि त्याला पुढेही मदतीची प्रेरणा मिळते. आभार मानणारा व्यक्ती नम्र, कृतज्ञ आणि संवेदनशील आहे, हे त्यातून दिसून येते.

            आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा लोक मदत घेतात पण 'धन्यवाद' देणे विसरतात. हे केवळ शिष्टाचाराचे उल्लंघन नसून, थोड्या प्रमाणात अहंकाराचेही लक्षण वाटते. उलट जे लोक मनापासून आभार मानतात त्यांच्याविषयी आदर आपोआप वाढतो.

             त्यामुळे माझ्या मते, 'आभार मानणे' हा छोटा दिसणारा पण अतिशय महत्त्वाचा शिष्टाचार आहे. तो आपल्याला सभ्य, नम्र आणि सजग बनवतो. "आभार" हे दोन शब्द लहान असले तरी त्यांचा परिणाम नात्यांवर खूप मोठा असतो.

 

(आ) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: 

            भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. काटकसर, भारनियमन हे सौम्य शब्द झाले. वास्तविक स्थिती मात्र खूप गंभीर आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा १० ते १५ तास बंद राहतो. शासन या समस्येवर उपाय न करता यास भारनियमन असे आकर्षक नाव देते.

            दुसरीकडे, लोक सुसंस्कृततेच्या भ्रमामुळे आभार , सॉरी अशा शब्दांचा अतिरेकी वापर करतात. वीजपुरवठ्यातील अपर्याप्तता आणि आभार हे दोन वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत परंतु त्यांचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून  ‘भार’ – आभार या शब्दाची कोटी करीत लेखिकांनी ‘आभारनियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे.


Iyatta 9vi Vishay Marathi Thod aa bharniyaman karuya    swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Thod aa bharniyaman karuya    swadhyay

**********

Post a Comment