१९. प्रीतम स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Pritam swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi marathi Pritam swadhyay Pritam swadhyay Iyatta 9vi marathi guide प्रीतम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी प्रीतम स्वाध्याय
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Pritam swadhyay | इयत्ता ९वी मराठी प्रीतम स्वाध्याय

 

यत्ता नववी मराठी गाईड pdf  | प्रीतम  मराठी स्वाध्याय ९वी इयत्ता नववी मराठी स्वाध्याय प्रीतम |   इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती

प्र. १. तुलना करा.


शाळेतील प्रीतम

सेकंड लेफ्टनंट प्रीतम

(१)किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रयागेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम

खूप देखणं, भरदार, स्वतः बाई त्याच्या खांद्याच्या खाली येत होत्या.

(१)            एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम.

आत्मविश्वासाने वावरणारा; स्वतःला काय वाटते, याचे स्पष्ट भान असणारा ; एनडीएसारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम.

 


इयत्ता नववी मराठी गाईड pdf  | प्रीतम  मराठी स्वाध्याय ९वी

इयत्ता नववी मराठी स्वाध्याय प्रीतम |   इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती

प्र.2. कारणे लिहा.

 

(अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ....

उत्तर: प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता.

 

(आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण ....

उत्तर: पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता.

 

प्र. ३. प्रतिक्रिया लिहा.


(अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बधून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया-

उत्तर: प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आही आईवडिलांना घेऊन यायला सांगितले.

 

(आ) अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया-

उत्तर: बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.

 

प्र. ४. लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.


उदाहरण

गुण (उत्तर)

(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले.

(४) ममत्व

(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले.

(१) कार्यनिष्ठा

(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या.

(२) संवेदनशीलता

(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला.

(३) निरीक्षण

 

 

Iyatta 9vi Vishay Marathi Pritam swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Pritam swadhyay  | 9th class marathi question and answer Dupar

प्र. ५. प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.

उत्तर:

1) प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता.

2) मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.

3) माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार.

4) तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या  बांगड्या अन अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या.

 

 

9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Pritam      class marathi question and answer sthaulvachan

 

प्र. ६. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा.

 

(अ) रया जाणे.

(१) शोभा जाणे. (२) शोभा करणे. (३) शोभा येणे.

उत्तर: शोभा जाणे.

 

(आ) संजीवनी मिळणे.

(१) जीव घेणे. (२) जीवदान मिळणे. (३) जीव देणे.

उत्तर: जीवदान मिळणे.

 

प्र. ७. कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.


(१) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)

उत्तर: मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा.

 

(२) हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)

उत्तर: व्वा ! किती सुंदर आहे हा तलाव.

 

(३) बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)

उत्तर: रस्त्यावर खूपच गर्दी आहे.

 

(४) नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)

उत्तर: कधीही खोटे बोलू नये.

 

प्र.८. स्वमत


(अ) प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.

उत्तर:

        प्रीतमच्या बाईंना प्रीतमचे नकारात्मक पैलू प्रथम दिसतात, ज्यामुळे त्याची नकारात्मक छबी त्यांच्या मनात निर्माण होते. मात्र, प्रीतमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटल्यावर , त्यांच्या मनात त्याच्याप्रती सहानुभूमी जागृत होती आणि त्या  मानसिक समर्थन देतात. इतर मुलांनी एकत्रितपणे निधी गोळा करून बाईंना एक भेट दिली. प्रीतमने आपल्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट म्हणून दिल्या, ज्यात त्याच्या आईविषयीच्या सगळ्या भावना साठवलेल्या होत्या. त्या त्याच्यासाठी अत्यंत मोल्यवान होत्या. त्याच्या या कृतीमुळे बाईंच्या हृदयात त्याच्याप्रती उंच आदर निर्माण झाला आणि त्यांनी त्याच्या भावनांचा आदर केला.

 

(आ) तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.

उत्तर:

        सर्वांच्याच जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकाचे स्थान खूप महत्वाचे आहे. मी आज जे घडले ते माझ्या आई –वडील व शिक्षकांमुळेच . बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेईपर्यंत मला विविध शिक्षक भेटले, ज्यांच्यातील सकारात्मक गुण माझ्यात उतरले. कुणाकडून मेहनतीचे महत्व समजले तर कुणाकडून देशप्रेमाचे धडे. कुणी संयम व शांतीचा पाठ शिकवला तर कुणी सत्याचा मार्ग दाखवला. प्रसंगावधान कसे राखावे हे ही शिक्षकांनीच शिकवले तर संकातून मार्ग  कसा काढावा हे पण शिक्षकांनीच शिकवले. या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची शिदोरी मला माझ्या शिक्षकांकडून मिळाली.


********

Post a Comment