Iyatta 9vi Vishay Marathi Olympic Vartulancha Gof swadhyay | इयत्ता ९वी मराठी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय
(२)
प्र. २. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज
......... येथे वसले.
(अ) ग्रीस (आ) मेलबोर्न (इ)
फ्रान्स (ई) अमेरिका
उत्तर: (१) पहिले ऑलिंपिक
व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.
(२)............पासून
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(अ) १८९६ (आ) १९५६ (इ) इ.स.७७६
(ई) इ.स.पूर्व ३९४
उत्तर: १८९६ पासून
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
Iyatta 9vi Vishay Marathi Olympic Vartulancha Gof swadhyay | 9th standard Marathi digest pdf Olympic Vartulancha Gof swadhyay
9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2024
प्र. ३. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला
खालील मुद्दे लागू नसतील तर
तिथे- हे चिन्ह लिहा. उदा., 'व' यासाठी लिंग,
वचन, विभक्ती सगळीकडे
- हे चिन्ह येईल.
(१) पुरुषांसाठी व
स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
अ.क्र. |
शब्द |
मूळ शब्द |
शब्दजात |
प्रकार |
लिंग |
वचन |
विभक्ती |
(१) |
पुरुषांसाठी |
पुरुष |
नाम |
सामान्यनाम |
पुल्लिंग |
अनेक |
चतुर्थी |
(२) |
व |
व |
उभयान्वयी अव्यय |
- |
- |
- |
- |
(३) |
स्त्रियांसाठी |
स्त्री |
नाम |
सामान्यनाम |
स्त्रीलिंग |
अनेक |
चतुर्थी |
(४) |
वेगवेगळे |
वेगवेगळे |
विशेषण |
गुणविशेषण |
पुल्लिंग |
अनेक |
- |
(५) |
सामने |
सामना |
नाम |
सामान्यनाम |
पुल्लिंग |
अनेक |
प्रथम |
(६) |
होतात |
होणे |
क्रियापद |
- |
- |
- |
- |
प्र.४. स्वमत.
(१) 'ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व' ही संकल्पना स्पष्ट
करा.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे
खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे
लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. ज्यांत जातीभेद. धर्मभेद व वर्णभेद नसतो.
सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी
वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला. त्या खेळाडूला अमेरिकेला केवढा अभिमान
वाटला. या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील
द्वेष, वैर या भावना नास्थ होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधूभावाने वागतात.
म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.
ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ मराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
*******