१५. निरोप स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Nirop swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi marathi Nirop swadhyay Nirop swadhyay Iyatta 9vi marathi guide निरोप स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी निरोप स्वाध्याय
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Nirop  swadhyay | इयत्ता ९वी मराठी निरोप   स्वाध्याय

9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet Nirop   class marathi question and answer sthaulvachan

 

प्र. १. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.

(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण------------

(१) मुलाचा वाढदिवस आहे.

(२) तो रणांगणावर जाणार आहे.

(३) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.

(४) त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.

 

उत्तर: (अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण तो रणांगणावर जाणार आहे.

 


इयत्ता नववी मराठी गाईड pdf | निरोप   मराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय निरोप  | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती

प्र. २. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा.


(अ) अशुभाची साऊली

उत्तर: जेव्हा सैनिक शत्रूशी लढण्यासाठी निघतात, त्यांचे प्राण सुरक्षित राहण्याची कोणतीही खात्री नसते. लढाईत कधी त्यांना आपले प्राण गमवावे लागतील, हे निश्चित नसते. कवयीत्रींनी या परिस्थितीला अशुभ किंवा वाईट सावली म्हणून संबोधले आहे.


(आ) पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण

उत्तर: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे. म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतिक म्हणून ‘पंच प्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयीत्रींनी कवितेत केला आहे.

 

प्र. ३. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.


शब्दांशिवाय मानलेले आभार

स्पर्शाने

कटाक्षाने

ऑपरेशन च्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो.

आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्र-मैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष.



प्र. ४. काव्यसौंदर्य.


(अ) 'तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी', या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:

        जेव्हा रणांगणात जाणाऱ्या आपल्या बाळाला आई धीर देते, ती त्याला सांगते कि तुझ्यावर कोणतीही अशुभ छाया पडणार नाही. तिने त्याला आठवण दिली की लढताना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवावे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तिने त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या शास्त्रांना आणि अस्त्रांना भवानी मातेची शक्ती प्राप्त होईल, जसे भवानीने शिवरायांना आशीर्वाद दिला होता. या शब्दांतून एका वीरमातेचे अदम्य भावना आणि मनोकामना व्यक्त होतात, ती आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची आणि विजयाची प्रार्थना करत आहे.

 

9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet
Nirop   class marathi question and answer sthaulvachan



(आ) 'धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन', या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर:

            रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळाला पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की येईल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दुधभात भरावयाची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तुत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

 

प्र. ५. अभिव्यक्ती.


(अ) कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

        रणांगणावर लढायला जाणान्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते -तुझ्या पराक्रमी बाहुंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

 

 
Iyatta 9vi Vishay Marathi Nirop   swadhyay | 
9th standard Marathi digest pdf  Nirop   swadhyay

9th class marathi question and answer Dupar|    9th class marathi question answer pdf download 2025


(आ) 'भारतभू ही वीरांची भूमी आहे', याबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर:

            भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली, पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

*********

Post a Comment