Iyatta 9vi Vishay Marathi Maharashtravaruni Tak Ovalun Kaya swadhyay | इयत्ता ९वी मराठी महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया स्वाध्याय
प्र. १. वैशिष्ट्ये लिहा.
(अ) महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये
प्र.2. असत्य विधान ओळखा.
(१) धुरंधर शिवरायांना स्मरावे.
(२) असत्यास्तव शिंग फुंकावे.
(३) स्वातंत्र्याची आण घ्यावी.
(४) जन्मभूमीचे उपकार फेडावे.
उत्तर:
(२) असत्यास्तव शिंग फुंकावे.
इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती | 9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet
प्र. ३.
कवितेतून व्यक्त झालेली 'महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता' हा विचार स्पष्ट करा.
उत्तर:
महाराष्ट्र हे एक पवित्र स्थान आहे, जिथे यशाचा
दीप प्रज्वलित होतो. महाराष्ट्राची माती हे समृद्ध आणि उपजाऊ आहे. महाराष्ट्राचे गडकिल्ले
महाराष्ट्राच्या गौरवाची कथा सांगतात. अरबी समुद्र तिच्या चरणांशी लीन आहे.
महाराष्ट्र हा शूर शासनकर्त्यांचा , शाहिरांचा, साधूसंतांचा, मेहनती शेतकऱ्यांचा,
धुरंदर शिवरायांचा आणि त्यागाच्या सामर्थ्याचा आहे. मी या प्रिय महाराष्ट्रासाठी जीवनाची
आहुती देण्यास सज्ज आहे. अशा प्रकारे, या कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त
झाली आहे.
प्र. ४. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
या पवित्र अशा महाराष्ट्र मंदिरात, यशाचा दीप
निरंतर प्रकाशित होत आहे. निळ्या आकाशाच्या छत्राखाली, महाराष्ट्राची भूमी ही सोन्यासारखी
उत्पादनशील आहे. तिच्या कीर्तीची गाथा गडकिल्ल्यांनी गायली आहे. शूर, पराक्रमी,
महारथी योद्ध्यांना या भूमीला गौरव आणि प्रतिष्ठा प्रदान करून दिली आहे. ही भूमी धाडसी
नेत्यांची, परिश्रमी शेतकऱ्यांची, संतांची आणि कवींची आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत
छत्रपती शिवाजी महारांच्या प्रेरणेने प्रकाशित झालेला हा महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्राची
बलस्थाने आहेत.
प्र. ५. काव्यसौंदर्य.
(अ) 'धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची'
या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
उत्तर:
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली,
तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली, परंतु मराठी मानाने
संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती.
त्यांच्या एकजूटीट फुट पडू नये; म्हणून शाहीर म्हणतात, की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या.
अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊ या.
Iyatta 9vi Vishay Marathi Maharashtravaruni Tak Ovalun Kaya swadhyay
9th standard Marathi digest pdf Maharashtravaruni Tak Ovalun Kaya swadhyay
(आ) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
उत्तर:
या कवितेत जागोजागी वीररसाची
प्रचीती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत होण्यासाकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर
केला आहे. कंबर बांधून उठ घाव झेलाया | माराष्ट्रावारुनी टाक ओवाळून काया’ या पहिल्या
दोन ओळींत शाहिरांनी मर्दमराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे.
करी कंकण बांधून साचे’ धार ध्वज करी ऐक्याची , अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगुण ओतप्रोत
भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे.
9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2025 | Iyatta 9vi marathi Maharashtravaruni Tak Ovalun Kaya swadhyay
प्र. ६. अभिव्यक्ती.
(अ) तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
उत्तर:
महाराष्ट्र हे राज्य दऱ्याखोऱ्यांची भूमी आहे,
जी संतांच्या उपदेशांनी पवित्र झाली आहे. येथील इतिहास शौर्य आणि त्यागाच्या गाथांनी
भरलेला आहे. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा अशा नद्यांनी समृद्ध असलेली ही
जमीन आहे. येथे शौर्य आणि वैराग्य एकत्रितपणे अस्तित्वात आहेत. विद्यापीठाचा उदय आणि
विस्तार महाराष्ट्रातून सुरू झाला. भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकासाचा पाया
महाराष्ट्राने रचला आहे. औद्योगिक आणि सामाजिक क्रांतीचे माहेरघर म्हणून महाराष्ट्र
प्रसिद्ध आहे.
*********