Iyatta 9vi Vishay Marathi Matichi Savali swadhyay | इयत्ता ९वी मराठी मातीची सावली स्वाध्याय
प्र. १. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
उत्तर: उन्हाळा
जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो.
मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील
वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
Iyatta 9vi Vishay Marathi Matichi Savali swadhyay | 9th standard Marathi digest pdf Matichi Savali swadhyay
9th class marathi question and answer Dupar | 9th class marathi question answer pdf download 2025
(आ) आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
उत्तर: आईचा
पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व
हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
(इ) वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
उत्तर: चिंचेची
बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात
तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.
प्र. २. खालील तक्तापूर्ण करा.
घटना |
परिणाम/प्रतिक्रिया |
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. |
सून येऊन डाफरली |
(२) मनूला फरसूने शिकवले. |
मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला
लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. |
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. |
आठवड्याभरातच कोसू मरण पावली. |
(४) मनूने जमीन विकायला काढली. |
फरसूने बैलासारखी मान डोलावली. |
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
(अ) फरसुचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट करणाऱ्या कृती
उत्तर:
1. भातपिकांवर फरसू वांगी दुधी, कारली वगैरे भाज्यांचे दुबार पिक घ्यायचा. त्यामुळे जमीन अधिक कसदार बनते.
2. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या मते ते खत होते.
3. पान न पान जमा करून तो शेतात पसरवायचा.
4. या खतामुळे शेत कसदार बनायचे.
इयत्ता 9vi मराठी मातीची सावली स्वाध्याय | इयत्ता 9vi मराठी गाईड २०२६ pdf
इयत्ता नववी मराठी गाईड pdf | मातीची सावली मराठी स्वाध्याय ९वी
(आ) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.
उत्तर:
1. छंद:- फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायारीअवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता.
2. मेहनत : फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान न पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पिक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पिक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची.
3.दुःख : त्याचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो टर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला व सुनेला कदर नव्हती.
4.माणूसपण: फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींचे लग्न करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा दुःखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहानी मनाला व्याकूळ करून टाकते.
प्र. ४. ओघतक्ता तयार करा.
1. मनूची आई प्रार्थना करायची.
2. -------------------
3. --------------------
4. घासागणिक पोटात माया उतरायची.
उत्तर:
1. मनूची आई प्रार्थना करायची.
2. एकसुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे
3. जेवता जेवता मनू बहिणींशी मस्ती करायचा
4. घासागणिक पोटात माया उतरायची.
प्र. ५. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(अ) "आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोड वायीट वाटते."
उत्तर: “आमचा
जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते.”
(आ) "त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी."
उत्तर: “त्यांचीच
पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.”
प्र. ६. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) टकळी चालवणे-
(१) सूत कातणे. (२) सतत बोलणे. (३) वस्त्र विणणे.
उत्तर: सतत
बोलणे.
(आ) नाळ तुटणे-
(१) मैत्री जमणे. (२) संबंध न राहणे. (३) संबंध जुळणे.
उत्तर: संबंध
न राहणे.
प्र. ७. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले-
उत्तर: बापजाद्यांची
कमाई रे पोरांनो !
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
उत्तर: तरारून
वाढलेल्या गुबगुबीत केळीच अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला
संसार होत्याचा नव्हता झाला.
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
उत्तर:पोटच्या
पोरांइतक्या प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं
नाही, हा त्याचा निश्चय होता.
प्र.८. स्वमत.
(अ) 'मातीशी नाळ तुटली, की
माणूसपण तरी कसं राहणार?' या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत
असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
उत्तर:
मातीशी
नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार? या या फरसूच्या विधानाशी मी सहमत आहे.
माणूस
स्वतःच्या इच्छा आकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दलही त्याला सहानुभूती,
प्रेम, वाटते. हा बंधुभाव होय. बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्ये आहे. बंधुभाव नष्ट
झाला, तर माणूसपण नष्ट होते. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा
कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे.
साहजिकच आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.
(आ) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
फरसू
हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. मातीत कष्ट करणे हे त्याच्या दृष्टीने खरे जीवन
होते. त्यातच खरे सुख होते. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत.
मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. मला हा विचार खूप
महत्वाचा वाटतो. अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशी बनत चालले
आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. कोणत्याही कारणासाठी
झाडे सहज तोडली जातात. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती
निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. यामुळे माणूस स्वतःचेच जीवन धोक्यात आणीत आहे.
यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टीकोन अंगिकारला पाहिजे.
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय मातीची सावली | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
(इ) 'भातीची सावली' या पाठाच्या
शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
शहरीकरणाच्या
प्रभावामुळे लोक शहरांकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे घरांची मागणी वाढली आहे.
बिल्डरांना यामुळे अधिक फायदा होत असून, त्यांची नजर जमिनींवर पडली; आहे. नवीन
पिढीला याची गंभीरता लक्षात येत नाही आहे आणि त्यांचे लक्ष्य फक्त पैश्यावर असते.
त्यांना असे वाटते की पैसा मिळवून सर्व काही मिळवता येईल. दीड एकर जमिनीवर
बांधलेली उंच इमारत फरसूला एक भयानक राक्षसाप्रमाणे वाटतात.
9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Matichi Savali class marathi question and answer sthaulvachan
भाषा
सौंदर्य
आपली
मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे.
शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टीवरून
आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील
प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा.
शरीर अवयवावर |
प्राणी व पक्षी यांवर |
मानवी भावभावना |
अन्नघटक |
इतर घटक |
आधारित |
आधारित |
|||
चेहरा काळवंडणे. |
पोटात कावळे ओरडणे. |
जिवाची उलघाल होणे. |
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. |
दगडापेक्षा वीट मऊ. |