भाषाभ्यास
· खालील
वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा. उदा., तलावातील नीलकमल किती शोभून
दिसते आहे!
नीलकमल - नील असे कमल.
(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध
आहे.
उत्तर: महान असे राष्ट्र
(आ) या पुस्तकाचे भाषांतर
चांगले झाले आहे.
उत्तर: अन्य अशी भाषा
(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग
तरंगत आहे.
उत्तर: पंधरा असा शुभ्र
कर्मधारय समास
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये.
(अ)
दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
(आ)
कधी पूर्वपद विशेषण असते. उदा., नीलकमल
(इ)
कधी उत्तरपद (दुसरे पद) विशेषण असते. उदा., घननीळ
(ई)
कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा., श्यामसुंदर
(उ)
कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा., कमलनयन, नरसिंह
(ऊ)
कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा., विद्याधन
ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत
असतात, त्याला
‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह
करा.
(अ) रक्तचंदन-
उत्तर: रक्तासारखे चंदन
(आ) घनश्याम-
उत्तर: घनासारखा श्याम
(इ) काव्यामृत-
उत्तर: काव्य हेच अमृत
(ई) पुरुषोत्तम –
उत्तर: उत्तम असा पुरुष
खालील वाक्येवाचून त्यातील
सामासिक शब्द ओळखा.
उदा., नेत्रांच्या पंचारतींनी
सैनिकांना ओवाळावे.
पंचारती - पाच आरत्यांचा समूह.
(अ) असा माणूस त्रिभुवन शोधले
तरी सापडायचा नाही.
उत्तर:
त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
(आ) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा
नृत्य चालते.
उत्तर:
नवरात्र -नऊ रात्रींचा समूह
(इ) शाळेत आता हिंदी सप्ताह
चालू आहे.
उत्तर:
सप्ताह - सात दिवसांचा समूह
द्विगू समास
द्विगू समासाची वैशिष्ट्ये
(अ) द्विगू समासात पूर्वपद
संख्यावाचक असते.
(आ) हा समास नेहमी एकवचनात
असतो.
(इ) सामासिक शब्दावरून एका
समुच्चयाचा बोध होतो.
ज्या
समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा
अर्थ दर्शवला जातो तेव्हा, त्यास द्विगू समास असे म्हणतात.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह
करा.
(अ) अष्टाध्यायी -
उत्तर : आठ अध्यायांचा समुदाय
(आ) पंचपाळे-
उत्तर: पाच पाळ्यांचा समुदाय
(इ) द्विदल-
उत्तर: दोन दलांचा समुदाय
(ई) बारभाई –
उत्तर: बारा भावांचा समुदाय
(उ) त्रैलोक्य-
उत्तर: तीन लोकांचा समुदाय
*******
महत्वाचे
वीरांगना (स्थूलवाचन) या पाठाखालील अपठीत गद्य आकलन पान नं. ६४ वरील प्रश्न उत्तरे पुढील भागात देण्यात आली आहेत. पुढील उत्तरे पाहण्यासाठी खालील view बटनावर क्लिक करा.