3. धाराविद्युत स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान। Dharavidyut 9vi

9 class science question answer Dharavidyut | इयत्ता नववी सामान्य विज्ञान धाराविद्युत स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय गतीचे नियम  स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान  धाराविद्युत इयत्ता नववी स्वाध्याय pdf  इयत्ता नववी विज्ञान स्वाध्या


प्रश्न 1. शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत, त्यावरून  खालील प्रश्नांची उत्तरे द्या.


धाराविद्युत इयत्ता नववी स्वाध्याय pdf  इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय


अ. घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या  जोडणीत जोडली आहेत?

उत्तर घरातील विदयुत उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहेत.


आ. सर्व उपकरणांतील विभवांतर कसे असेल?

उत्तर :  सर्व उपकारणांतील विभवांतर समान असेल.


इ. उपकरणांतून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल का? उत्तराचे समर्थन करा.

उत्तर :  वेगवेगळ्या उपकारणांतून जाणारी विद्युतधारा सारखीच असेल असे नाही.

I = V / R

यावरून असे दिसते की विभावंतर (V) समान असेल तरी रोध (R) वेगळा असल्यास विद्युतधारा (I) वेगळी असते.

 

ई. घरामधील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने का केली जाते?

उत्तर : एखादे उपकरण बंद पडले तरी इतर उपकरणे चालू राहावी म्हणून घरातील विद्युत परिपथाची जोडणी या पद्धतीने केली जाते.

 

उ. या उपकरणांतील T.V. बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडित होईल काउत्तराचे समर्थन करा.

उत्तर: T.V. बंद पडल्यास संपूर्ण विद्युत परिपथ खंडीत होणार नाही, कारण उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहेत.

 

प्रश्न 2. विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची  चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा.      

धाराविद्युत इयत्ता नववी स्वाध्याय pdf  इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय

 उत्तर :

 

धाराविद्युत प्रश्न उत्तरे  धाराविद्युत स्वाध्याय


वरील परीपथाच्या सहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल.


प्रश्न 3. उमेशकडे 15 W व 30 W रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक  असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर


अ. त्याला बल्ब जोडतअसताना कोणत्या पद्धतीने  जोडावे लागतील?

उत्तर : त्याला बल्ब जोडत असताना समांतर जोडणी पद्धतीने जोडावे लागतील.


आ. वरील प्रश्नाच्या उत्तरानुसार बल्ब  जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा.

उत्तर रोधांच्या समांतर जोडणीच्या पद्धतीचे गुणधर्म

१. समांतर जोडणीत प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभावंतर समान असते.

२. परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधांतून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारांच्या बेरजेइतकी असते.

३. जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज ही जोडणीच्या परिणामी रोधाच्या व्यस्तांकांइतकी असते. 

४. समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो.

५. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही त्या रोधाशी व्यस्तानुपाती असते.

६. ही जोडणी परीपथातील रोध कमी करण्यासाठी वापरता येते.


धाराविद्युत इयत्ता नववी स्वाध्याय pdf | इयत्ता नववी विज्ञान स्वाध्याय

इ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल?

उत्तर :


प्रश्न 4. खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व  विभवांतर (V मध्ये) दिले आहे.

V

I

4

9

5

11.25

6

13.5


अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.

उत्तर :

R1 = 4V/9A = सुमारे  0.44 Ohm

R2 = 5V / 11.25A = सुमारे 0.44 Ohm,

R3 = 6V / 13.5 = सुमारे 0.44 Ohm

सरासरी रोध = 0.444  ओहम


आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे  स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)

उत्तर : हा आलेख (0,0) या आरंभ बिंदुतून जाणारी सरळ रेषा असेल.


इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा

उत्तर: येथे ओहमचा नियमन स्पष्ट होतो.

 

प्रश्न 5. जोड्या लावा.


'' गट

''गट (उत्तर)

1. मुक्त इलेक्ट्रॉन

क्षीण बलाने बद्ध

2. विद्युतधारा

V/ R

3. रोधकता

VA/L I

4. एकसर जोडणी

परिपथातील रोध वाढवणे

 

प्रश्न 6. ‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’  त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात?

उत्तर :

R = p × L / A किंवा P = RA / L

येथे, R = r, A = a  L = x

रोधाकता  p = RA / L

p = ra/x

रोधकतेचे एकक ओहम मीटर आहे.

 

प्रश्न  7. रोध R1 , R2 , R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2  या  दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी  चर्चा करा.

अ. कळ S1 व S 2 दोन्ही बंद केल्या.

आ. दोन्ही कळ उघड्या ठेवल्या.

इ. S1 बंद केली व S2उघडी ठेवली.

धाराविद्युत प्रश्न उत्तरे  धाराविद्युत स्वाध्याय

उत्तर :


१) खालील आकृती पहा.

 

Swadhyay Dharavidyut  Dharavidyut Swadhyay Prashn Uttare


R4 च्या समांतर जोडणीत FG चा जवळजवळ शून्य रोध असल्याने या जोडणीच्या परिणामी रोध जवळजवळ शून्य होईल व सगळी विद्युतधारा PQ मार्गाने जाईल.

 समांतर जोडणीत आहेत.  






2) खालील आकृती पहा.

 

Swadhyay Dharavidyut  Dharavidyut Swadhyay Prashn Uttare


3) खालील आकृती पहा.

 

Swadhyay Dharavidyut  Dharavidyut Swadhyay Prashn Uttare









प्रश्न 8. x1, x2, x3 परीमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. (I – विद्युतधारा, V– विभवांतर,  x - परिणामी रोध).

 

अ. x1, x2, x3मधून I एवढी विद्युतधारा वाहते.

उत्तर : एकसर जोडणी


आ. x हा x1, x2, x3 पेक्षा मोठा असतो.

उत्तर : एकसर जोडणी


इ. x हा x1, x2, x3 पेक्षा लहान असतो.

उत्तर : समांतर जोडणी


ई. x1, x2, x3यांच्या दरम्यानचे विभवांतर Vसारखेच आहे.

उत्तर : समांतर जोडणी


उ. x = x1+ x2+ x

उत्तर : एकसर जोडणी


ऊ. x = 1 /1/ x 1 + 1/ x 2 + 1/ x3

उत्तर: समांतर जोडणी


Swadhyay Dharavidyut | Dharavidyut Swadhyay Prashn Uttare


प्रश्न 9. उदाहरणे सोडवा.


अ. 1mनायक्रोमच्या तारेचा रोध 6 W आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल? (उत्तर : 4.2 W )

उत्तर :

दिलेले: L1 = 1m , R1 = 6 Ohm, L2 = 70 cm = 0.7 m, R2 =?

R = p × L / A

R1 = p × L1 / A  आणि  R2 = p × L1 / A 

R2 / R1 = L2 / L1

= 0.7/ 1 = 0.7

R2 = 0.7 R1 = 0.7 × 6 Ohm

= 4.2 Ohm

तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध 4.2 Ohm असेल


आ. जर दोन रोध एकसर जोडणीनेजोडलेतर त्यांचा परिणामी रोध 80 W होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडलेतर त्यांचा परिणामी रोध 20 W होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा. (उत्तर: 40 W , 40 W )

उत्तर :

दिलेले : Rs  = 80 Ohm, Rp = 20 Ohm

R1 = ? R2 = ?

एकसार जोडणी  : Rs = R1 + R2 = 80 Ohm … (1)

समांतर जोडणी : 1/Rp = 1/R1 + 1/R2  = 1 / 20 Ohm  … (2)

(1) आणि  (2) एकत्र केले आणि रोधकचे एकक काढले तर आपल्याला मिळेल:

R1 ( 80 – R1 )/ 80 = 20 Ohm


 

 







इ. एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल? (उत्तर : 1.4 A)

उत्तर :

दिलेले : Q = 420 C, t = 5 minutes = 5 × 60 s = 300s,  I =?

I = Q / T

I = 420/300

I = 1.4 A

तारेतून जाणारी विद्युतधारा 1.4 A इतकी असेल.

***********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.