कोल्हा प्राण्याची माहिती | Fox information in marathi

7] Information about Fox in Marathi | कोल्हयाची संपूर्ण माहिती


मराठी नाव : कोल्हा

हिंदी नाव : लोमडी

इंग्रजी नाव : FOX


कोल्हा माहिती मराठी  Kolhaya vishay mahiti  Kolha mahiti marathi  Fox information in marathi for student  Fox information for school project  Fox information in marathi


            आपल्याला अनेक रानटी प्राण्यांची नावे माहीत आहेत त्यापैकीच एक रानटी प्राणी म्हणजे कोल्हा होय.


कोल्ह्याचे वर्णन :

कोल्ह्याचा रंग पिवळसर, भुरकट, पिंगट असा असती. कोल्ह्याला चार पाय, दोन डोळे व दोन कान असतात. कोल्ह्याचे तोंड, डोळे हे कुत्र्यासारखेच असतात. त्याची शेपटी छान झुपकेदार असते.


कोल्ह्याचे अन्न : 

            कोल्हा हा मांसाहारी, तसेच शाकाहारीही आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून तो ऊस, काकडी, मका, हरभरा, शेंगा खातो. तसेच कोंबड्या, ससा, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या प्राण्यांचे मांस पण खातो.


कोल्ह्याचे इतर वर्णन :

कोल्ह्याची लांबी दोन-तीन फूट व उंची एक ते दीड फूट असते. हा प्राणी वेगवेगळ्या रंगांचाही असतो, याचे कान नेहमी उभे असतात. कोल्ह्याची वयोमर्यादा किमान अकरा ते बारा वर्षे असते.


कोल्ह्याची इतर माहिती :

    कोल्हा हा प्राणी 'कुँई कुँई' असा आवाज काढतो, त्याला 'कोल्हे-कुँई' असे म्हटले जाते. एका कोल्ह्याने आवाज काढला तर त्याच्या मागोमाग सगळे कोल्हे ओरडतात. हा प्राणी कळप किंवा टोळ्या करून राहतो. दिवसा झाडाझुडपात निवांत झोपतो आणि रात्र झाली की हा शिकारीच्या शोधात बाहेर पडतो.

            कोल्ह्याच्या मादीला कोल्हीण म्हणतात. ही जमिनीत खड्डा तयार करून त्यात एका वेळी तीन ते चार पिलांना जन्म देते. त्यांचे पालनपोषण करते. कोल्हा धूर्त, लबाड तसेच चतुर पण आहे. कोल्ह्याला संस्कृतमध्ये 'जंबूक' असे म्हणतात. कोल्हा हा प्राणी भारत, आशिया, श्रीलंका व दक्षिण-पूर्व युरोप येथेही आढळतो.

 Fox information in marathi for student | Fox information for school project | Fox information in marathi

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.