चिंच फळाची माहिती मराठी | Chinch Fruit Information in Marathi

चिंच फळाची माहिती मराठी | Tamarind Information in Marathi

            चिंच हा एक सदाहरित वृक्ष आहे. चिंच या फळाचे नाक घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते . लाल चिंच आणि साधी चिंच असे चिंचेचे दोन प्रकार पडतात.

 

Tamarind Information in Marathi Esay  Chinch  information in marathi pdf  Tamarind Information  चिंच फळाची संपूर्ण माहिती.  चिंच झाडाविषयी माहिती  चिंच या फळाविषयी माहिती.  चिंच झाडाची माहिती मराठी  Chinch zadachi Mahiti

चिंचेच्या झाडाचे वर्णन :

साध्या चिंचेचे झाड हे मोठे असते. या चिंचेच्या झाडाला खूप फांद्या फुटून, डेरेदार वृक्ष तयार होतो. या झाडाच्या फांद्यांच्या बारीक देठाला छोटी-छोटी हिरवीगार पाने येतात. ही पाने खाल्यास चवीला आंबट असतात.

Chinch  information in marathi pdf | Tamarind Information | चिंच फळाची संपूर्ण माहिती.

चिंचेच्या येणाऱ्या फुलांना 'चिगोर' असे म्हटले जाते. याच फुलांना नंतर फळे म्हणजेच चिंच हे फळ तयार होते. चिंचेचा आकार आकड्यासारखा असतो. कोवळ्या चिंचा हिरव्यागार असतात, चिंच तयार झाल्यावर आतील गराला चॉकलेटी रंग येतो, व बाहेरचा रंग देखील फिकट चॉकलेटी रंग येतो.


चिंचेच्या झाडाची लागवड :

            चिंचेच्या फळामध्ये असलेल्या बियांची लागवड करून चिंचेची रोपे तयार केली जातात आणि त्यांची लागवड केली जाते. चिंच या झाडाची लागवड करण्यासाठी  कोणत्याही प्रकारची जमीन चालते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चिंचेच्या झाडाला  फळे येतात.

    लाल चिंच या प्रकारातील चिंचेची पाये बारीक व गोलाकार असतात. आणि या प्रकारातील चिंचेच्या झाडाला थोडे काटे असतात. या चिंचेचा वापर फक्त खाण्यासाठी केला जातो. वरून पोपटी साल व आतमध्ये पांढऱ्या रंगाचा गर असतो. त्याच्या आतमध्ये बारीक काळ्या रंगाचे बी असते. पिकल्यावर ही चिंच लाल रंगाची दिसते. या चिंचेची चव गोड लागते.

चिंच या फळाविषयी माहिती. | चिंच झाडाची माहिती मराठी | Chinch zadachi Mahiti


चिंचेचे औषधी उपयोग :

साध्या चिंचेचा वापर औषध म्हणून केला जातो. चिंचेचा उपयोग कफ व वातनाशक म्हणून होतो. चिंचेची साल लकवा रोगावर उपयुक्त ठरते. त्वचारोगांवर चिंचेचा पाला उपयोगी आहे. विंचू चावला तर चिंचोका उगाळून त्या भागावर लावावा.

 

चिंचेची इतर माहिती :

चिंचेची चव आंबट असल्याने आमटी, भाजीमध्ये चिंचेचा वापर केला जातो. मीठ लावून चिंच वर्षभर टिकवता येते. चिंचेची बी म्हणजे चिंचोके भाजून खाण्यास चांगले लागतात. चिंचेच्या बिया पीठ खळ, रबर, रंग, स्टार्च पावडर यांसारख्या उत्पादन कारखान्यात वापरले जाते. घोंगडी ताठ राहण्यासाठी धनगर लोक चिंचोक्याची खळ वापरतात. चिंचेच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग रंगासाठी केला जातो. या झाडाच्या लाकडाचा उपयोग जळण, शेतीची अवजारे तयार करण्यासाठीही होतो. थंडगार सावलीसाठी रस्त्याच्या कडेने चिंचेची झाडे लावतात.

**********

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

हे नक्की पहा :