इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Englandcha Hivala swadhyay question answer 9th marathi

Iyatta 9vi Vishay Marathi Englandcha Hivala swadhyay | इयत्ता 9vi मराठी इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय

Iyatta 9vi Vishay Marathi Englandcha Hivala swadhyay | 9th standard Marathi digest pdf  Englandcha Hivala swadhyay | 9th class marathi question and answer Englandcha Hivala | 9th class marathi question answer pdf download 2023 | Iyatta  9vi marathi Englandcha Hivala swadhyay

 

 

प्र. १. कारणे लिहा.


लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे.

 

उत्तर :

·    लंडनच्या पावसामध्ये रस्त्यात चिखल होत नाही.

·     वातावरणात मजेदार गारवा असतो

·      चार-पाच मैल चालूनही थकवा येत नाही.

·       परिसर हिरवागार राहतो.

 


ग्लंडचा हिवाळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता 9vi मराठी  इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf इयत्ता नववी मराठी गाईड pdf इंग्लंडचा हिवाळा मराठी स्वाध्याय ९वी इयत्ता नववी मराठी स्वाध्याय इंग्लंडचा हिवाळा इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती



प्र. २. तुलना करा.

उत्तर:

 

भारतामधील धुके

लंडनमधील धुके

१.मनाला सुखद संवेदना देते.

१.लंडनचे धुके औरच आहे.

२.धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो.

२.वर्षाचे दहा दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते.

३.सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते .

३.काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते.

४.धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते.

४.वर्षातून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते.

 

 

इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf | इंग्लंडचा हिवाळा मराठी स्वाध्याय ९वी


प्र. ३. इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.

उत्तर:


1) इंग्लंड मध्ये धुरकट वातावरणात धुके पसरल्यावर कोळशाचे कण हवेत दिसू लागतात.

2)     काळोख डोळ्यांना दिसतो आणि हातातही धरता येतो.

3)    आपण हवेच्या आव्राच्या तळाशी आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या धुक्यात येतो.

4)     समुद्राच्या तळाशी होणार्या जीवांच्या घूसमटीची कल्पना येते.

5)    ब्रिटीश खाडीमध्ये बोटीवर बोटी आपटतात.

6)     रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात.

7)      मुले रस्ता चुकतात.

 

प्र. ४. स्वमत.

 

(अ) ‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.

उत्तर: 

            गेल्याच वर्षी आम्ही सर्व कुटुंबीय महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही दोन दिवस वस्ती देखील केली. तिकडे पोहोचताच थंडी जाणवू लागली. सकाळी जाग आल्यावर बाहेर आलो. तर दाट धुक्याची चादर लपटलेली झाडे, डोंगर असे निसर्गरम्य दृश्य माझ्या निदर्शनास पडले. सूर्याची सोनेरी किरणे दाट धुक्यातून डोकावत असल्याचे सुंदर दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे माझ्या समोर उभे होते. हे दृश्य विलोभनीय होते. हिवाळ्यातील हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

 

 

 

(आ) तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्‍पष्ट करा.

उत्तर

            माझा आवडता ऋतू पावसाळा आहे. या ऋतूची वैशिष्ट्ये म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडे हिरवे हिरवे गवत , हिरवी झाडे, वेली असतात जणू काही धरतीने हिरवी शालच पांघरल्याचे दृश्य असते.आकाशात दिसणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाला सप्त रंगत भिजून जातो. निसर्ग जणू नव्या  न्व्रीसारखा नटलेला असतो. पहिला पाऊस पडला की मातीचा  येणारा सुगंध मला खूप आवडतो. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. पावसामुळे जमिनीची, वृक्षवेलींची तृष्णा भागते. नदी नाले भरून वाहतात. शेतकरी आनंदी होतो आणि सणांची रेलचेल सुरु होते. नटलेली सृष्टी पाहून कवी, लेखकांना लिखाणासाठी नवनवीन विषय सुचतात.सारा निसर्ग प्रसन्न होऊन जातो.

 

इयत्ता 9vi मराठी  इंग्लंडचा हिवाळा स्वाध्याय | इयत्ता  9vi मराठी गाईड २०२३ pdf |  इयत्ता नववी मराठी गाईड pdf | इंग्लंडचा हिवाळा मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय इंग्लंडचा हिवाळा


(इ )तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :  

            सुट्टीमध्ये आम्ही संपूर्ण कुटुंब आणि काही मित्रपरिवार थंड हवेच्या ठिकणी फिरायला गेलो. सकाळी पहिले तर सर्वत्र धुके पसरले होते. समोरचे काही दिसत नव्हते आम्ही आमच्या गाड्या तिथे थांबविले. गाडीच्या समोरच्या काचेतून काही दिसत नव्हते. सर्व परिसर दाट धुक्याने झाकून गेला होता. सूर्याची सोनेरी किरणे दाट धुक्यातून डोकावत असल्याचे सुंदर दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे माझ्या समोर उभे होते. हे दृश्य विलोभनीय होते.

 

 

प्र.५. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

उत्तर:

भौगोलिक स्थान : रत्नागिरी शहरापासून २ किमी अंतरावर. रत्नदुर्ग किल्ला.

ऐतिहासिक महत्व : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्ला.

सांस्कृतिक वैशिष्ट्ये : किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. मंदिरात दरवर्षी भव्य कार्यक्रम होतो.

उल्लेखनीय बाबी:  या किल्ल्याची  एका बाजूची तटबंधी समुद्रात उभी आहे. या किल्ल्यातून ऐतिहासिक भुयारीमार्ग देखील आहे.

नैसर्गिक वैशिष्ट्ये : सूर्योदय आणी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे निसर्गाचे मनमोहक रूप.

त्या भागातील मानवी जीवन : या किल्ल्यावर कोणीही राहत नाही. पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी दूर दूर हून येतात.

 

इयत्ता नववी मराठी स्वाध्याय इंग्लंडचा हिवाळा | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
9th class marathi question and answer pdf download |  9th std marathi digest pdf navneet | Englandcha Hivala class marathi question and answer sthaulvachan


अपठित गद्य आकलन.  

 

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.


(१)     दुष्परिणाम लिहा.

अहंकार :

१)    ज्ञानप्राप्ती होत नाही.

२)   समाधान मिळत नाही.

३)   सत्याचा अविष्कार होणे कठीण

४) सुखाचा अविष्कार होणे कठीण.





              आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते; पण तसे होत नाही.  उलट सर्वत्र पाहिले असता ‘दु:ख मणभर, सुख कणभर’ असाच अनुभव येतो; पण असे का होते? याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, त्याच्यामागे ‘अहंकार’ हा राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही. तो स्वत:जवळ आहे हे कळतही नाही, कारण तो  सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याहूनही कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच  असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व  सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही, म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष  केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका.








(२) अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्या मते कोणते गुण जोपासावेत व कोणते दोष दूर ठेवावेत, ते  लिहा.

उत्तर: 

            अहंकार ताब्यात ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तराच्या लोकांशी संपर्क ठेवावा. आयुष्यात असा कोणीतरी व्यक्ती हवाच ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊ आणि आपला सर व अहंकार गळून पडेल. अहंकार ताब्यात ठेवण्यापेक्षा तो बाळगूच नये. नेहमी समोरील व्यक्तीचा आदर राखावा.

 


-------------------------

समाप्त 

------------------------


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.