2. इयत्ता दहावी निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय | Nivadnuk Prakriya swadhyay PDF

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय 10th Rajyashashtra Chapter 2 Question Answer इयत्ता दहावी राज्यशास्त्र दुसरा धडा स्वाध्याय Std 10 Rajyashashtra Chapter 2
Admin

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय  प्रश्न उत्तरे | Class 10 Rajyashashtra exercise Marathi PDF- Maharashtra Board

 

Class 10 Rajyashashtra Marathi Maharashtra Board इयत्ता दहावी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर PDF Maharashtra Board Class 10 Rajyashashtra Notes Download. Nivadnuk Prakriya PDF Class 10

 

. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

 

() निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.

() राष्ट्रपती

() प्रधानमंत्री

() लोकसभा अध्यक्ष

() उपराष्ट्रपती


उत्तर: निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

 


() स्वतंत्र भारतातील पहि ले मुख्य नि वडणूक आयुक्त म्हणून ........... यांची नेमणूक झाली.

() डॉ.राजेंद्रप्रसाद

() टी.एन.शेषन

() सुकुमार सेन

() नीला सत्यनारायण


उत्तर: स्वतंत्र भारतातील पहि ले मुख्य नि वडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची

 

() मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ....... समिती करते.

() निवड

() परिसीमन

() मतदान

() वेळापत्रक


उत्तर: मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.


Nivadnuk Prakriya in Marathi PDF    | दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय प्रश्नोत्तर निवडणूक प्रक्रिया

२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

 

(१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

उत्तर:  हे विधान बरोबर आहे;

कारण-

(१) आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात.

(२) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.

(३) धाक, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळतो त्यामुळे  तो मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क पार पाडू शकतो.

म्हणून निवडणूक आयोग निवडनुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

 

(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर: हे विधान बरोबर आहे

कारण-

(१) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.

(3) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.

(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो.

म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

 

दहावी राज्यशास्त्र  पाठ स्वाध्याय | History Guide class 10 pdf 


(३) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

उत्तर:  हे विधान चूक आहे.

कारण-

(१) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.

(२) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.

(३) महणूनच संविधानाने हो जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडनुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.


Rajyashastra Class 10 Maharashtra Board Marathi PDF | SSC Board Nivadnuk Prakriya Study Material

३. संकल्पना स्पष्ट करा.

 

(१) मतदारसंघाची पुनर्रचना

उत्तर:

(१) विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ  निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.

(२) निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उदयोग-व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.

(३) खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखादया मतदार संघातील मदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत.

म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते.

(४) हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती पार पाडते.

 

इयत्ता दहावी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर PDF | दहावी निवडणूक प्रक्रिया प्रश्नोत्तर

(२) मध्यावधी निवडणुका

उत्तर:

1) विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या (पाच वर्षे) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात.अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात.

2) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.

3) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आधाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात पेते.

4) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते.

अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.

उत्तर:

मतदार (भूमिका)

१) आचारसंहितेचे पालन करणे .

२) प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.

३) मतदान करणे .

 

निवडणूक आयोग (भूमिका)

१) मतदारसंघांची निर्मिती करणे .

२) मतदार यादया निश्चित करणे .

३) निवडणुका घोषित करणे .

४) उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे

५) मतदानाची व्यवस्था करणे .

६) मतमोजणी व निकाल जाहीर करणे.

 

राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका )

१) उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे .

२) उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे .

३) निवडणुकीचा प्रचार करणे .

४) निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर कर

५) निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे.

 

 

Maharashtra Board Class 10 Rajyashashtra Notes Download. | Nivadnuk Prakriya PDF Class 10

५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

 

(१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर:  निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो :

(१) मतदार याद्या तयार करणे व त्या अद्ययावत करण्याचे काम.

(२) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.

(३) उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.

(४) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्वकामे करणे.

(५) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.

(5) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारीचे निवारण करणे.

 

(२) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

उत्तर:

१) भारतीय निवणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही सामान अधिकार असतात.

(२) या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.

(३) संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधीच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.

(४) निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही.


Class 10 Rajyashashtra Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी राज्यशास्त्र प्रश्नोत्तर PDF


(३) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

उत्तर:

(1) निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष उमेदवार  व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावती निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात.


***********

महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.

Post a Comment