Iyatta 9vi Vishay Marathi Hasare Dukh swadhyay | इयत्ता ९वी मराठी हसरे दु:ख स्वाध्याय
प्र. १. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
(१)
प्र. २. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
घटना |
परिणाम |
(१) चार्लीने जॅक जोन्स म्हणाथला सुरुवात केली. |
वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागला. |
(२) प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. |
सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. |
(३) प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. |
स्टेज मॅनेजर धावतपळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी
उभा राही. गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला. |
प्र. ३. (अ) कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा.
(अवेहलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)
(१)
आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैन्या पाडणाऱ्या मुलांच्या
चेहन्यावर भीती पसरली.
उत्तर: आंब्याच्या
झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत
पडले.
(२) शालेय
स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
उत्तर: शालेय स्नेहसंमेलनात
प्राचीने स्टेजवर पदार्पण केले.
(३) दिव्यांग
मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रभुख पाहुणे थक्क झाले.
उत्तर: दिव्यांग
मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्मिमित झाले.
(४) गुणवान
माणसांचा अनादर करू नये.
उत्तर: गुणवान
माणसांची अवहेलना करू नये.
(ब) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग
बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) तिच्यावर
आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
उत्तर: तिच्यावर
आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला.
(२) तिच्या
गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
उत्तर: त्याच्या
गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
(३) नर्तकीचे
नृत्य प्रेक्षणीय होते.
उत्तर: नर्तकाचे
नृत्य प्रेक्षणीय होते.
(४) सवाई
गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
उत्तर: सवाई
गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला.
Iyatta 9vi Vishay Marathi Hasare Dukh swadhyay
9th standard Marathi digest pdf Hasare Dukh swadhyay
प्र. ४. स्वमत.
(१)
चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर:
चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. त्या दिवशी
आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता. यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या
विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. पैशांचा पाऊस पडला,
तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या
मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. कलेची उर्मी त्याच्यात होती. म्हणून त्याने नाचून
दाखवले. नकला करून दाखवल्या . हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षणक्षमता
अफाट होती.
9th class marathi question answer pdf download 2024
(२) स्टेज
मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते
सविस्तर लिहा.
उत्तर:
स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सदर करायला सांगितले,
हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता, हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच.
मात्र, मॅनेजर ची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही. लिलीवर अनवस्था प्रसंग
ओढवला, तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला.
त्याने प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही. मी त्याच्या जागी असतो, तर
पुढे झालो असतो. प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. लिलीला धीर दिला असता.
(३) 'हसरे दुःख' या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ
तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती.
कलावंत म्हणून जे मोठेपण असते, ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा,
कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे
सर्वस्वच गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती. त्याच रात्री लिलीचा पाच वर्षांचा
हूरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला
धावून आला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या
कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. आपल्या मुलाचा हा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च
बिंदू होता. एका बाजूला सुख होते. त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या
पाठाचे शीर्षक आहे. ‘हसरे दुःख ‘ .
अपठित
गद्य आकलन.
•खालील उतारा
काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
(अ) चौकटी
पूर्ण करा.
अश्मयुगातील
माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू-
चुली |
भांडीकुंडी |
औते-हत्यारे |
दागदागिने |
अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.
(अ) माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
उत्तर:
अश्मयुगात माणसाने खडक कोरून आणि दगडाच्या
भिंती रचून त्यांच्या निवाऱ्याची सोय केली.
मान्सास्च्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याने त्यांच्या सृजनशिल्तेला वाव देणे सुरु
केले. फुरसद मिळाली तशी त्यांनी लेणी खोदायला सुरुवात केली. शिल्प कोरु लागले,
घरांना कलात्मक आकार देऊ लागले. एक सबंध दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे
आणि माणसाच्या सृजनशिलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्यांना दगडच देव
वाटून त्यांनी तो पुजला.
******